राशीभविष्य- १७ फेब्रुवारी २०२१; 'या' राशीच्या व्यक्तींसाठी आजचा संपूर्ण दिवस साफल्याचा अन् आनंदाचा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2021 07:17 AM2021-02-17T07:17:48+5:302021-02-17T07:18:07+5:30
Todays Horoscope 17 February 2021: जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस
मेष - श्रीगणेशांच्या आशीर्वादाने आजचा दिवस आपल्याला पूर्ण अनुकूल आहे. सगळ्या कामात यश मिळाल्याने आपण खूप आनंदी व प्रसन्न असाल. आर्थिक क्षेत्रातही लाभ होईल. आाणखी वाचा
वृषभ - आज सावधगिरीने राहण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. आपले मन अनेक प्रकारच्या चिंतांनी व्यग्र असेल. स्वास्थ्यही जरा नरमच राहील. विशेषतः डोळ्यांचा त्रास संभवतो. आणखी वाचा
मिथुन - आपला आजचा दिवस विविध लाभ प्राप्त करून देणारा ठरेल असे श्रीगणेश सांगतात. कुटुंबात पत्नी आणि मुलांकडून फायद्याच्या बातम्या कळतील. मित्रांच्या भेटी आनंद देऊन जातील. आणखी वाचा
कर्क - नोकरी व्यवसाय करण्यार्यांना आजचा दिवस खूप लाभदायक आहे असे श्रीगणेश म्हणतात. नोकरीत पदाधिकारी तुमच्यावर खूश असतील त्यामुळे पदोन्नती होऊ शकते. आणखी वाचा
सिंह - श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस मध्यम फल देणारा जाईल. धार्मिक आणि मंगलकार्यात हजेरी लावाल. न्यायी व्यवहार कराल. धार्मिक प्रवास ठरवाल. स्वास्थ्य साधारणच राहील. आणखी वाचा
कन्या - आज नवीन कामे सुरू न करण्याचे श्रीगणेश सांगतात. बाहेरचे खाद्य पदार्थ खाऊन स्वास्थ्य बिघडू शकते. मन रागीट बनेल. म्हणून बोलण्यावर ताबा ठेवा. कुटुंबातील व्यक्तींबरोबर मतभेद संभवतात. आणखी वाचा
तूळ - आजचा संपूर्ण दिवस साफल्याचा व आनंदाचा असेल ज्यामुळे पूर्ण दिवस आनंदच अनुभवाल. सार्वजनिक जीवनासंबंधीच्या कार्यात सफलता मिळवाल. भिन्नलिंगी व्यक्तीचा आज तुमच्यावर प्रभाव राहील. आणखी वाचा
वृश्चिक - आज अचानक काही घटना घडतील. ठरलेल्या मुलाकाती रद्द झाल्याने निराश व क्रोधीत बनाल. हाती आलेली संधी सुटून जात असल्याचे दिसेल. कुटुंबीयांशी मतभेद होतील. आणखी वाचा
धनू - श्रीगणेश आजचा मिश्रफलदायी दिवस असल्याचे सांगतात. पोटाच्या समस्या त्रास देतील. संततीचे स्वास्थ्य आणि अभ्यास यामुळे चिंतित राहाल. कार्य सफल न झाल्याने निर्माण होण्यार्या रागावर नियंत्रण ठेवा. आणखी वाचा
मकर - श्रीगणेश सांगतात की आजचा आपला दिवस प्रतिकूलतेने भरलेला आहे, त्यामुळे मन खिन्न राहील. शारीरिक स्फूर्ती, तरतरी यांचा अभाव राहील. सार्वजनिक जीवनात मानहानी होण्याचा संभव आहे. आणखी वाचा
कुंभ - आज आपण तना-मनाने प्रसन्न असाल. मनात असलेले चिंतेचे मळभ दूर होऊन उत्साह वाढेल. भाऊबंदा बरोबर एकत्र येऊन नवीन योजना ठरवाल. त्यांच्या बरोबर आनंदात वेळ जाईल. आणखी वाचा
मीन - श्रीगणेश आज तुम्हाला बोलण्यावर संयम ठेवायला सांगतात. रागामुळे कोणाशी तक्रार किंवा मतभेद होण्याची शक्यता आहे. शारीरिक कष्ट वाढतील. विशेषतः डोळ्याकडे लक्ष द्या. आणखी वाचा