आजचे राशीभविष्य- 18 ऑगस्ट 2020; 'या' राशीच्या व्यक्तींना आवडत्या व्यक्तींसोबत वेळ घालवता येईल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 07:13 AM2020-08-18T07:13:41+5:302020-08-18T07:13:55+5:30

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

Todays horoscope 18 August 2020 | आजचे राशीभविष्य- 18 ऑगस्ट 2020; 'या' राशीच्या व्यक्तींना आवडत्या व्यक्तींसोबत वेळ घालवता येईल

आजचे राशीभविष्य- 18 ऑगस्ट 2020; 'या' राशीच्या व्यक्तींना आवडत्या व्यक्तींसोबत वेळ घालवता येईल

Next

मेष - श्रीगणेश सांगतात आज आपला स्वभाव हळूवार बनेल ज्यामुळे कोणतीही बातमी ऐकून किंवा व्यवहारातून आपल्या भावना दुखावतील. आईच्या तब्येतीमुळे आपण खूप चिंतित राहाल. आणखी वाचा.

वृषभ - चिंता कमी झाल्याने हायसे वाटेल. आज तुम्ही भावुक आणि संवेदनशील राहाल, ज्यामुळे कल्पनाशक्ती आणि सृजनशक्ती डोके वर काढतील.आणखी वाचा.

मिथुन - श्रीगणेश सांगतात की सुरवातीच्या त्रासानंतर तुम्ही ठरवलेली कामे पार पडतील ज्यामुळे मन प्रसन्न होईल. आर्थिक योजनांमुळे तुमचे कीतीतरी त्रास कमी होऊ लागतील. आणखी वाचा.

कर्क - आपले मित्रपरिवार व कुटुंबीय यांच्याबरोबर आजचा दिवस चांगला जाईल. त्यांच्याकडून मिळालेल्या भेटवस्तू आनंदात भरच घालतील. बाहेर फिरायला मिळेल तसेच स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद मिळेल. आणखी वाचा.

सिंह - श्रीगणेश आज आपल्याला कोर्ट कचेरीच्या बाबींपासून दूर राहण्याचा सल्ला देतात. मन चिंतीत असेल व बेचैनही असेल. शारीरिक स्वास्थ्य बिघडेल. आणखी वाचा.

कन्या - श्रीगणेशांचा आशीर्वाद आज आपल्याला यश, कीर्ती व लाभ मिळवून देईल. लक्ष्मीची कृपा आज आपल्याला मिळेल. वाडवडील आणि मित्र यांच्याबरोबर आपला दिवस आनंदात जाईल. आणखी वाचा.

तूळ - आज आपले घर आणि कामाचे ठिकाण येथील वातावरण चांगले असल्यामुळे तुम्ही प्रसन्न राहाल. स्वास्थ्य चांगले राहील. नोकरी करणार्‍यांना बढतीचा योग आहे. आणखी वाचा.

वृश्चिक - श्रीगणेश म्हणतात की आज शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवेल, आळस वाढेल व उत्साह कमी होईल. त्याचाच परिणाम व्यावसायिक क्षेत्रात जाणवेल. त्यामुळे त्रास वाढेल. आणखी वाचा.

धनु - श्रीगणेश म्हणतात की, आज आपण नवीन कामाची सुरुवात करू नका तसेच तब्येतीकडे लक्ष द्या. कफ किंवा पोटाचे विकार आपल्याला सतावतील. शस्त्रक्रिया आजच्यासाठी टाळा. आणखी वाचा.

मकर - रोजचे काम सोडून आज आपण मनोरंजन आणि गाठी भेटी यात वेळ घालवाल. स्वादिष्ट भोजन मिळेल. मित्रांबरोबर फिरायला जाल. भिन्नलिंगी व्यक्तीबरोबर चांगला वेळ घालवाल असे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा.

कुंभ - कामात यश मिळवण्यासाठी उत्तम दिवस असल्याचे श्रीगणेश सांगतात. केलेल्या कामातून यश व कीर्ती मिळेल. कौटुंबिक वातावरण सौहार्दपूर्ण राहील. आणखी वाचा.

मीन - आज आपली कल्पनाशक्ती चमकेल. साहित्यनिर्मितीसाठी देखील आजचा दिवस चांगला आहे. विद्यार्थी अभ्यासात चांगली प्रगती दाखवतील. आणखी वाचा.

 

Web Title: Todays horoscope 18 August 2020

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.