आजचे राशीभविष्य- 20 ऑगस्ट 2020; 'या' राशीच्या व्यक्तींना सरकारी कामातून लाभ मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2020 08:35 AM2020-08-20T08:35:06+5:302020-08-20T08:36:45+5:30

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

Todays horoscope 20 August 2020 | आजचे राशीभविष्य- 20 ऑगस्ट 2020; 'या' राशीच्या व्यक्तींना सरकारी कामातून लाभ मिळणार

आजचे राशीभविष्य- 20 ऑगस्ट 2020; 'या' राशीच्या व्यक्तींना सरकारी कामातून लाभ मिळणार

Next

मेष - स्वभावातील तापटपणा आणि हट्टीपणावर संयम ठेवण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. शारीरिक आणि मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. खूप परिश्रमानंतर कमी यश प्राप्त झाल्याने नैराश्य येईल. आणखी वाचा.

वृषभ - आज प्रत्येक काम दृढ़ आत्मविश्वास आणि खंबीर मनोबलासह कराल आणि त्यात यश मिळेल. वडिलांकडून व वडिलार्जित संपत्तीचा लाभ मिळेल. सरकारकडून किंवा सरकारी कामातून आर्थिक लाभ होईल. आणखी वाचा.

मिथुन - नवीन योजना अमलात आणण्यासाठी दिवस शुभ असल्याचा संकेत श्रीगणेश देतात. नोकरदारांना वरिष्ठ अधिकार्‍याकडून किंवा सरकारकडून परिश्रमाचा यथोचित मोबदला मिळेल. आणखी वाचा.

कर्क - गैरसमज आणि नकारात्मक व्यवहार आपल्या मनात ग्लानी निर्माण करतील. तब्बेतीचा विशेषतः डोळ्यांचा त्रास होईल. कुटुंबातील सदस्यांशी मतभेद होतील. कामासंबंधी समाधानाची भावना निर्माण होईल. आणखी वाचा.

सिंह - आज कोणत्याही कामासंबंधी आत्मविश्वासाने त्वरित निर्णय घेऊ शकाल. वडील आणि वडीलधार्‍यांचा सहवास लाभेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. आणखी वाचा.

कन्या - आपल्या अहंपणामुळे आज भांडण होण्याची शक्यता आहे. शारीरिक आणि मानसिक चिंतेत दिवस जाईल. स्वभावातील उतावळेपणामुळे काम बिघडण्याची शक्यता आहे. आणखी वाचा.

तूळ - श्रीगणेशाच्या आशीर्वादाने आजचा आपला दिवस शुभफलदायी आणि लाभदायक जाईल. मित्रांशी भेट होईल आणि त्यांच्यासह फिरायला जाल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. आणखी वाचा.

वृश्चिक - गृहस्थी जीवनाची सार्थकता आज आपल्या लक्षात येईल. असे श्रीगणेश सांगतात. घरात आनंदाचे वातावरण राहील. प्रत्येक काम विनासायास पार पडेल. आणखी वाचा.

धनु - श्रीगणेश आज आपणाला तब्बेतीकडे लक्ष द्यायला सांगतात. कामात उत्साह आणि आवेशाचा अभाव राहील. मन चिंतायुक्त राहील. संततीची समस्या हे त्याचे कारण असू शकते. आणखी वाचा.

मकर - नकारात्मक विचार प्रभावी होऊ न देण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. भागीदारां बरोबर संबंध बिघडतील. अचानक प्रवास करावा लागेल. त्यावर खर्च करावा लागला. आणखी वाचा.

कुंभ - श्रीगणेश कृपेने आजचा दिवस प्रसन्नतेमध्ये जाईल. आपला आत्मविश्वास वाढेल. त्यामुळे कामात यश मिळणे सहज बनेल. स्वभावातील मौजवृत्ती मनाला स्फूर्ती देईल. आणखी वाचा.

मीन - मनाचा खंबीरपणा आणि आत्मविश्वास आपले काम यशस्वी करील. कुटुंबात सुख- शांती, आनंदाचे वातावरण राहील. राग आणि बोलण्याची उद्धट पद्धत यांवर संयम ठेवा. आणखी वाचा.

Web Title: Todays horoscope 20 August 2020

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.