राशीभविष्य- २० फेब्रुवारी २०२१; 'या' राशीच्या व्यक्ती कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ शकणार नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2021 07:23 AM2021-02-20T07:23:45+5:302021-02-20T07:24:04+5:30
Today's Horoscope: जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस
मेष - श्रीगणेश आज आपल्याला आर्थिक बाबी आणि देणे-घेणे या मुद्दयांवर जागरूक राहायला सुचवतात. वादविवादापासून दूर राहा अन्यथा कुटुंबातील सदस्या बरोबर भांडणे होतील. आणखी वाचा
वृषभ - श्रीगणेश कृपेने आपला आजचा दिवस फायद्याने भरलेला जाईल. शरीर व मनाने आज तुम्ही स्वस्थ राहाल. तसेच पूर्ण वेळ ताजेतवाने राहाल. आपल्यात असलेली कलात्मकता व सृजनात्मकता यांचा उपयोग कराल. आणखी वाचा
मिथुन - आज आपण आपल्या बोलण्यावर व व्यवहारात सावधान राहा असे श्रीगणेश सांगतात. आपल्या बोलाचालीत काही गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या. आपले स्वास्थ्य खराब असू शकेल. आणखी वाचा
कर्क - श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस तुम्हाला लाभदायक जाईल. नोकरी धंद्यात अनुकूल वातावरण असेल. धनलाभाची शक्यता आहे. मित्रांकडून विशेषतः स्त्रीवर्गाकडून फायदा होईल. आणखी वाचा
सिंह - आपल्या दृढ आत्मविश्वास व मनोबल याच्या मदतीने सगळी कामे यशस्वी कराल, असे श्रीगणेश सांगतात. व्यवसाय धंदयात आपली बौद्धिक चुणूक दिसेल. नोकरीत पदोन्नतीचे योग येऊ शकतात. आणखी वाचा
कन्या - श्रीगणेश म्हणतात की, आजचा आपला दिवस आनंदात जाईल. आर्थिक फायदा होईल. तसेच परदेशात राहणार्या नातेवाईकांच्या वार्ता समजतील, त्यामुळे तुम्ही आनंदात असाल. आणखी वाचा
तूळ - कोणत्याही नवीन कामाचा आज आरंभ न करण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. आपले बोलणे आणि वर्तन नियंत्रणात ठेवा नाहीतर गैरसमज होऊ शकतात, ज्यामुळे नुकसान होऊ शकते. आणखी वाचा
वृश्चिक - श्रीगणेश सांगतात की आज आपण सगळा दिवस आनंद उल्हासात घालवाल. रोजच्या कामातून वेळ काढून स्वतःसाठी थोडा वेळ मिळवाल. मित्राबरोबर कुठे तरी प्रवासास जाल. आणखी वाचा
धनू - श्रीगणेशांच्या आशीर्वादाने आजचा आपला दिवस शुभ जाईल. स्वास्थ्य चांगले राहील. यश, कीर्ती, आनंद यांची प्राप्ती होईल. कुटुंबिया समवेत आनंदात वेळ घालवाल. प्रतिस्पर्धी आणि शत्रूवर विजय मिळवाल. आणखी वाचा
मकर - आज आपण मनाने खूप अशांत व असमंजसपणाने राहाल. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ शकणार नाही, त्यामुळे तणावात राहाल. श्रीगणेश सल्ला देतात की कोणताही महत्त्वपूर्ण निर्णय आज घेऊ नका. आणखी वाचा
कुंभ - श्रीगणेश म्हणतात की अधिक संवेदनशील झाल्याने आपले मन बेचैन आणि अस्वस्थ होईल. जीद्दी बनाल. सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होणार नाही याची काळजी घ्या. आणखी वाचा
मीन - श्रीगणेश म्हणतात की महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी आज शुभ दिवस आहे. विचारात दृढता राहील. कामे पूर्ण होतील. सृजनात्मक आणि कलात्मक शक्ती वाढेल. मित्र, परिवारासोबत प्रवासाला जाल. आणखी वाचा