आजचे राशीभविष्य - २० जुलै २०२० - कर्कसाठी चिंतेचा, कुंभसाठी आर्थिक लाभाचा दिवस

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2020 06:33 AM2020-07-20T06:33:52+5:302020-07-20T07:03:07+5:30

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

Today's horoscope - 20 July 2020 | आजचे राशीभविष्य - २० जुलै २०२० - कर्कसाठी चिंतेचा, कुंभसाठी आर्थिक लाभाचा दिवस

आजचे राशीभविष्य - २० जुलै २०२० - कर्कसाठी चिंतेचा, कुंभसाठी आर्थिक लाभाचा दिवस

Next

मेष
सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल आहे. सरकारी लाभ होतील. व्यापार, व्यावसायात लाभ होतील. वरिष्ठ अधिकारी खुश राहतील. आपल्या विचारांत एकदम बदल होतील. आणखी वाचा

वृषभ
आजचा दिवस आपणाला मध्यम फलप्राप्तीचा जाईल. मित्र आणि स्नेह्यांशी होणारी भेट आनंददायक ठरेल. आणखी वाचा

मिथुन
आर्थिक दृष्टिकोनातून आजचा दिवस लाभदायी राहील. आज आप्तेष्टांचे सहकार्य आनंददायी ठरेल. सुंदर वस्त्रे आणि उत्तम भोजनाचा लाभ मिळेल. मनात कोणत्याही प्रकारचे निषेधार्ह विचार आणू नका. आणखी वाचा

कर्क
आर्थिक दृष्टीने उत्पन्नापेक्षा खर्च अधिक होईल. डोळ्याचे विकार बळावतील. मानसिक चिंता राहील. उक्ती व कृतीवर संयम ठेवा. कोणाशी वाद होऊ नयेत याची काळजी घ्या.  आणखी वाचा

सिंह
सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रांत आनंददायक व लाभदायक वार्ता प्राप्त होतील. मित्रांकडून शुभवार्ता. धनलाभ होऊन उत्पन्न वाढेल. दुपारनंतर आपल्या बोलण्यामुळे काही समस्या उद्भवणार नाही याकडे लक्ष द्या.  आणखी वाचा

कन्या
घरातील व्यक्तींशी प्रेमपूर्ण संबंध राहतील. आप्तेष्टांकडून भेटवस्तू मिळतील. व्यवसाय- धंदयात वरिष्ठ अधिकारी आपल्या कामावर खुश राहतील. त्यामुळे तुमचा आनंद वाढेल. आणखी वाचा

तूळ
व्यवसायात वरिष्ठ असंतुष्ट राहतील. संततीशी मतभेदाची शक्यता. दुपारनंतर कामाच्या ठिकाणी वातावरण बदलेल. अधिकारी वर्गाची कृपादृष्टी आपणास लाभ देईल व बढती मिळू शकेल. आणखी वाचा

वृश्चिक
शारीरिक आणि मानसिक अस्वास्थ्य राहील. मानभंग होणार नाही याची काळजी घ्या. बोलण्यावर संयम ठेवला तर परिस्थिती अनुकूल बनू शकेल. पोटदुखीच्या विकाराने त्रस्त व्हाल.  आणखी वाचा

धनु
सकाळी आनंद आणि मनोरंजना मध्ये गुंग राहाल. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. दुपारनंतर मात्र मनात नकारात्मक विचारांच्या भावनांचे ओझे वाढेल.  आणखी वाचा

मकर
घरातील वातावरण सुख, शांती आणि आनंदपूर्ण राहील. मान- सन्मान मिळण्याची शक्यता. आर्थिक लाभ होईल. दुपारनंतरचा काळ स्वकीय आणि मित्र यांच्या बरोबर दक्ष राहून घालवा. आणखी वाचा

कुंभ
खर्चाचे प्रमाण वाढेल. संतती विषयक प्रश्न भेडसावतील. दुपारनंतर घरातील वातावरण शांतिपूर्ण राहील. शारीरिक स्वास्थ्य सुधारेल. आर्थिक लाभ होईल.  आणखी वाचा

मीन
अधिक विचारांमुळे मानसिक थकवा जाणवेल. अपचन व पोटाच्या तक्रारी यामुळे शारीरिक अस्वास्थ्य जाणवेल. विद्यार्थ्यांना आजचा दिवस लाभदायक आहे. सहल, प्रवास यासाठी काळ अनुकूल नसल्याने शक्यतो प्रवास टाळावेत. आणखी वाचा

Web Title: Today's horoscope - 20 July 2020

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.