आजचे राशीभविष्य- 21 ऑगस्ट 2020; 'या' राशीच्या व्यक्तींच्या वैवाहिक जीवनात गोष्टी विकोपाला जाण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 07:19 AM2020-08-21T07:19:02+5:302020-08-21T07:19:22+5:30
कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...
मेष - साहित्य निर्मिती आणि कलात्मक अभिव्यक्ती वाढविण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे, असे श्रीगणेश सांगतात. स्नेही भेटल्याने मन प्रसन्न राहील. आणखी वाचा.
वृषभ - आईच्या तब्बेतीविषयी आज चिंता राहील. स्थावर संपत्ती संबंधित कागदपत्रावर सह्या करणे टाळावे. नकारात्मक विचार सोडून द्या. दुपारनंतर शारीरिक व मानसिक स्वास्थ्य सुधारेल. आणखी वाचा.
मिथुन - कार्य यशस्वी झाल्याने आपले मन आज आनंदी असेल. तुमच्याकडून प्रतिस्पर्ध्यांचा पराभव होईल. परंतु दुपारनंतर घरात मतभेद होतील. कुटुंबियांशी झालेल्या वादातून मन खिन्न बनेल. आणखी वाचा.
कर्क - दीर्घकालीन योजनेच्या आयोजनासंबंधी विचार करताना मनःस्थिती द्विधा होईल. कुटुंबियांसोबतचे वातावरण तणावपूर्ण असेल. ठरवलेल्या कामात अपेक्षित यश मिळेल असे गणेशजी सांगतात. आणखी वाचा.
सिंह - आज आपल्यामनात पक्का आत्मविश्वास असेल असे श्रीगणेशजी म्हणतात. आज आपले प्रत्येक काम दृढ निर्णयशक्तिनी पूर्ण असेल. तरीही मनात क्रोधाची भावना अधिक असेल, म्हाणून मन शांत ठेवा. आणखी वाचा.
कन्या - आज आपले मन खूप भाऊक बनेल. भावनेच्या आहारी जाऊन काही अविचारी काम आपल्या हातून होऊ नये यासाठी सावध रहा. वादविवाद टाळा. तरीसुद्धा एखाद्या बरोबर उग्र वर्तन घडू शकते. आणखी वाचा.
तूळ - आजचा दिवस आपल्याला प्रवास- सहलीला जाण्याचा तसेच मित्रांकडून फायद्याचा आहे. व्यापारात लाभ होईल. मुलाबाळांबरोबर चांगले संबंध राहतील. परंतु, दुपारनंतर शारीरिक व मानसिक स्वास्थ्य बिघडेल. आणखी वाचा.
वृश्चिक - मनोबल आणि आत्मविश्वासाच्या जोरावर आज प्रत्येक काम सहजपूर्ण होईल. व्यापार- धंदयात आपल्या बुद्धिमत्तेची प्रशंसा होईल. आपल्या कामामुळे वरिष्ठ आनंदित होतील व त्यामुळे पदोन्नतीची शक्यता वाढेल. आणखी वाचा.
धनु - आज आपली वृत्ती धार्मिक बनेल. एखाद्या धार्मिक किंवा मंगलकार्यात सहभागी व्हाल. न्यायप्रिय बनाल हानिकारक कामापासून दूर रहा. रागावर ताबा ठेवा. आणखी वाचा.
मकर - आजचा दिवस सांभाळून रहा, असे श्रीगणेश सांगतात. प्रकृतीविषयी निष्काळजी राहू नका व नकारात्मक विचारांना वरचढ होऊ देऊ नका. असे केले तरच आपण हानीतून बाहेर पडाल. आणखी वाचा.
कुंभ - आज लहानसहान गोष्टींवरुन वैवाहिक जीवनात गोष्टी विकोपाला जाऊ शकतात, असे श्रीगणेश सुचवतात. संसारातील प्रश्नांविषयी आज आपण उदासीन रहाल. कोर्ट-कचेरी पसून जरा जपूनच. आणखी वाचा.
मीन - आज मन चिंतामुक्त राहील. शंकाकुशंकामुळे प्रसन्नता जाणवणार नाही. कार्यांत विघ्ने आल्याने कार्य पूर्ण होण्यास वेळ लागेल. सहकार्यांकडून सहकार्य मिळणार नाही. आणखी वाचा.