आजचे राशीभविष्य - २१ जुलै २०२० - मेषसाठी काळजीचा, तूळसाठी आनंदाचा दिवस

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2020 06:56 AM2020-07-21T06:56:33+5:302020-07-21T06:57:03+5:30

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

Today's horoscope - 21 July 2020 | आजचे राशीभविष्य - २१ जुलै २०२० - मेषसाठी काळजीचा, तूळसाठी आनंदाचा दिवस

आजचे राशीभविष्य - २१ जुलै २०२० - मेषसाठी काळजीचा, तूळसाठी आनंदाचा दिवस

Next

मेष
आज आपण अधिक हळवे आणि संवेदनशील बनाल. साध्या घटनांनी मनाता ठेच लागून मन दुःखी होईल. आईच्या तब्बेतीची काळजी लागून राहील. विद्यार्जनासाठी दिवस मध्यम फलदायी राहील. आणखी वाचा

वृषभ
आज आपल्या चिंता कमी होतील व उत्साह वाढेल. मन आनंदी राहील. जास्त भावूक आणि हळवे बनाल. आपली कल्पनाशक्ती विकसित होईल. आणखी वाचा

मिथुन
आज थकवा, कार्यमग्नता आणि प्रसन्नाता यांचा संमिश्र अनुभव घ्याल. निर्धारित कामे पूर्ण कराल. धनप्राप्तीची योजना बारगळेल असे आधी वाटेल पण नंतर यश मिळेल असेही वाटेल. आणखी वाचा

कर्क
शारीरिक व मानसिक दृष्ट्या स्वस्थ व आनंदी राहाल. आप्तेष्ट व कुटुंबीयांकडून सुख व आनंद मिळेल. त्यांच्याकडून काही भेटवस्तू मिळतील.  आणखी वाचा

सिंह
आरोग्याची काळजी राहील. त्यामुळे शारीरिक, मानसिक स्वास्थ्य बिघडेल. नाहक वादविवाद टाळा. कोर्ट- कचेरीतील कामे जपून करा. विदेशातून वार्ता येतील. वर्तनाम संयम सोडू नका.  आणखी वाचा

कन्या
विविध पातळ्यांवर यश, कीर्ति व लाभ होतील. धनप्राप्तीसाठी शुभ दिवस. मैत्रिणींकडून लाभाचे संकेत आहेत. प्रियव्यक्तींशी भेट आनंददायी राहील. व्यापारात धनवृद्धीची शक्यता. आणखी वाचा

तूळ
आजचा दिवस शुभ फलदायी आहे. घरात व कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल राहील. नोकरदारांना बढतीच्या संधी मिळतील. कौटुंबिक जीवनात आनंद व उत्साहाचे वातावरण असेल. आणखी वाचा

वृश्चिक
व्यवसायात अडचणी येतील. संततीशी मतभेद होतील. त्यांच्या तब्बेतीची काळजी राहील. प्रतिस्पर्ध्यांशी वादविवाद करू नका अनावश्यक खर्च वाढतील. आणखी वाचा

धनु
कोणतेही नवीन काम औषधोपचार सुरू करू नका. आत्यंतिक संवेदनशीलतेमुळे मनःस्थिती दुःखी राहील. पाण्यापासून जपा. उक्ती व कृती यांत संयम बाळगा.  आणखी वाचा

मकर
विविध कारणांनी आपल्या व्यापाराचे विस्तृतीकरण होऊन त्यात वाढ होईल. दलाली, कमिशन, व्याज ई. मार्गांनी उत्पन्नात वाढ होईल. धनलाभाचे योग आहेत. आणखी वाचा

कुंभ
कार्य सिद्धीच्या दृष्टीने आजचा दिवस शुभ आहे. कार्यातील यशाने आपली प्रसिद्धी होईल. कुटुंबीयांसमवेत वेळ चांगला जाईल. घरातील वातावरण चांगले राहील.  आणखी वाचा

मीन
विद्यार्जन करणार्‍यांना चमक दाखविता येईल. प्रणयाच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. पाण्यापासून जपा. स्वभाव सांभाळा. आणखी वाचा

Web Title: Today's horoscope - 21 July 2020

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.