आजचे राशीभविष्य - 22 ऑगस्ट 2020; प्रिय व्यक्तीकडून आनंद मिळेल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2020 07:11 AM2020-08-22T07:11:37+5:302020-08-22T07:12:17+5:30
कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...
मेष - आर्थिक आणि व्यावसायिक दृष्टिकोनांतून दिवस लाभदायी असेल. धनलाभाबरोबरच दीर्घकालीन आर्थिक नियोजनही करू शकाल. आणखी वाचा.
वृषभ - वाणीच्या प्रभावाने इतरांना मंत्रमुग्ध करून लाभ मिळवाल. नवीन संबंध जुळतील असे श्रीगणेश सांगतात. वैचारिक समृद्धी वाढेल आणि मन आनंदी रहील. आणखी वाचा.
मिथुन - आज आपल्या मनात विविध विचारतरंग उमटतील असे श्रीगणेश सांगतात. त्या विचारांत गढून जाल. आज बौद्धिक कार्य कराल. पण वादविवादात पडू नका असा सल्ला श्रीगणेश देतात. आणखी वाचा.
कर्क - आजचा दिवस शुभ आहे. नवीन कार्ये सुरू करायला दिवस चांगला. मित्र व नातलग भेटतील. प्रिय व्यक्तीकडून आनंद मिळेल. आणखी वाचा.
सिंह - आजचा दिवस मध्यम फलदायी असला तरी आर्थिक दृष्टिने लाभदायी ठरेल असे श्रीगणेश सांगतात. खर्च वाढतील. सर्वदूर असणार्या लोकांचे निरोप येतील आणि व्यवहारातून लाभ होतील. आणखी वाचा.
कन्या - आजचा दिवस आपणाला मध्यम फलदायी असेल. विचार समृद्ध होतील. आपल्या वाणीमुळे आपण फायदेशीर संबंध जुळवाल. आणखी वाचा.
तूळ - आपण आपल्या तब्बेतीकडे लक्ष देण्याची सूचना श्रीगणेश देत आहेत. अविचारी वर्तन संकटात टाकेल. अशा व्यवहारांपासून जपा. दुर्घटनेपासून सावध राहा. खर्च वाढतील. आणखी वाचा.
वृश्चिक - आजचा दिवस आपणाला लाभदायक ठरेल. नोकरी व्यवसायात फायदा होईल, मित्रांच्या गाठी पडतील आणि निसर्गरम्य ठिकाणी फिरायला जाण्याचे बेत ठरतील. आणखी वाचा.
धनु - आजच्या शुभ दिवसाचे संकेत श्रीगणेश देतात. आज आपल्यात परोपकाराची भावना राहील. त्यामुळे इतरांना मदत करण्यात आपण उत्साही राहील. आणखी वाचा.
मकर - आजचा दिवस मध्यम फलदायी राहील असे श्रीगणेश सांगतात. बौद्धिक कार्य आणि लेखन कार्यात आज सक्रीय राहाल. साहित्य क्षेत्रात आणि लेखन कार्यातही आज सक्रीय राहाल. आणखी वाचा.
कुंभ - अनैतिक, निषेधार्ह काम व नकारात्मक विचारांपासून दूर राहण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. खूप विचार आणि संताप मानसिक स्वास्थ्य बिघडवेल. आणखी वाचा.
मीन - व्यापार्यांना उज्ज्वल भविष्य आहे. भागीदारीसाठी चांगली वेळ आहे. साहित्यिक, कलाकार, कारागिर आपल्या कलेला वाव देऊ शकतील. आणखी वाचा.