राशीभविष्य- २२ फेब्रुवारी २०२१ : मकरसाठी आनंदाचा अन् मीनसाठी काळजीचा दिवस

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2021 06:43 AM2021-02-22T06:43:09+5:302021-02-22T07:05:50+5:30

Today's Horoscope: जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस

Todays Horoscope 22 February 2021 | राशीभविष्य- २२ फेब्रुवारी २०२१ : मकरसाठी आनंदाचा अन् मीनसाठी काळजीचा दिवस

राशीभविष्य- २२ फेब्रुवारी २०२१ : मकरसाठी आनंदाचा अन् मीनसाठी काळजीचा दिवस

Next

मेष - आज तुमचे मन चंचन राहील. त्यामुळे निर्णय घेणे कठीण जाईल. त्यामुळे महत्त्वपूर्ण काम पुरे करू शकणार नाही. प्रतिस्पर्ध्यांशी सामना करावा लागेल पण नवीन काम करण्याची प्रेरणा मिळेल. आणखी वाचा  

वृषभ - आज अगदी स्थिर होऊन काम करण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. तसे न केल्यास चांगल्या संधी हातातून निसटून जाऊ शकतात. आज हट्ट न करता समाधानी राहिलात तर चांगले होईल. आणखी वाचा  

मिथुन - आजचा आपला दिवस आर्थिक दृष्ट्या लाभदायक असल्याचे श्रीगणेश सांगतात. शारीरिक व मानसिक दृष्ट्या तुम्हाला प्रसन्नता व उत्साह यांचा अनुभव येईल. स्वादिष्ट भोजन आणि चांगले कपडे घालायला मिळतील. आणखी वाचा  

कर्क - आज आपण खिन्नता आणि भय अनुभवाल. कुटुंबात मतभेद झाल्याने कौटुंबिक वातावरण तणावपूर्ण असेल. मन द्विधा असेल त्यामुळे बेचैन असाल. बोलण्यावर ताबा ठेवा नाहीतर मतभेद होऊ शकतात. आणखी वाचा  

सिंह - आज व्यापारात लाभ व मिळकतीत वाढ होईल. उत्तम भोजन प्राप्त होईल. मित्रांबरोबर रम्य स्थळाला भेट देऊ शकता. स्त्री मित्रांचे विशेष सहाय्य मिळेल. मुलाची भेट होईल.  आणखी वाचा  

कन्या - आज आपण नव्या कामाची जी योजना बनवली आहे ती पूर्ण होईल. व्यापार व नोकरी असलेल्यांना आजचा दिवस फायद्याचा आहे. वरिष्ठ अधिकार्‍यांची कृपादृष्टी असेल त्यामुळे पदोन्नतीची संधी मिळेल. आणखी वाचा  

तूळ - आज नव्या कामाची सुरूवात करण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. बौद्धिक काम व साहित्यलेखन यात गुंतून राहाल. तीर्थयात्रेला जाण्याची संधी मिळेल. परदेशात राहणार्‍या मित्र आणि सगे सोयरे यांच्या वार्ता समजल्याने तुम्ही प्रसन्न राहाल. आणखी वाचा  

वृश्चिक - कफ, श्वास, किंवा पोट यांचा त्रास होऊ शकतो. शरीराने व मनाने आज अस्वस्थ राहाल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. कोणतेही अनैतिक काम किंवा सरकारी काम यापासून दूर राहा नाहीतर संकटात सापडाल. आणखी वाचा  

धनु - श्रीगणेशांच्या आशीर्वादाने तुमचा आजचा दिवस सुखशांती व आनंदात व्यतित होईल. मित्रांबरोबर चांगला दिवस. स्वादिष्ट भोजन, नवे कपडे प्राप्त होतील. विरुद्ध लिंगी व्यक्तींबरोबर आकर्षण वाढेल. आणखी वाचा  

मकर - आज आपले स्वास्थ्य चांगले राहील. यश, कीर्ती आणि आनंद प्राप्त होतील. कुटुंबीयांसमवेत आनंदात दिवस जाईल. व्यापारात प्रगती होण्यासाठी दिवस यश देणारा आहे असे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा  

कुंभ - आजचा दिवस हा आपला दिवस नाही. वैचारिक दृष्ट्या गर्क राहिल्याने कोणताही महत्त्वपूर्ण निर्णय न घेणे हेच बरे. प्रवासात त्रास संभवतो. ठरलेली कामे पूर्ण न झाल्याने खूप निराशा होईल. आणखी वाचा  

मीन - आजच्या दिवसात उत्साह आणि स्फूर्ती यांचा अभाव राहील. आईची तब्येत खराब होऊ शकते. मित्र आणि नातेवाईक यांच्या बरोबर वाद-विवाद होईल. काही त्रास किंवा विरोधी परिस्थितीमुळे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य खराब होऊ शकेल. आणखी वाचा 

Web Title: Todays Horoscope 22 February 2021

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.