आजचे राशीभविष्य - 22 जून 2020; वृषभ राशीच्या व्यक्तींच्या हातून संधी निसटण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 07:33 AM2020-06-22T07:33:46+5:302020-06-22T07:34:08+5:30

जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस

Todays horoscope 22 June 2020 | आजचे राशीभविष्य - 22 जून 2020; वृषभ राशीच्या व्यक्तींच्या हातून संधी निसटण्याची शक्यता

आजचे राशीभविष्य - 22 जून 2020; वृषभ राशीच्या व्यक्तींच्या हातून संधी निसटण्याची शक्यता

Next

मेष - श्रीगणेशांच्या दृष्टीने आजचा आपला दिवस संमिश्र फलदायी आहे. नवे कार्य करण्याची प्रेरणा मिळेल व नवीन कार्याचा आरंभ कराल. मनात शीघ्र बदल होतील व मन द्विधा बनेल. आणखी वाचा.

वृषभ - हाती आलेली संधी अनिर्णायकतेमुळे आपण आज गमावून बसाल आणि संधीचा लाभ घेता येणार नाही असे श्रीगणेश सुचवितात. विचारांत व्यस्त राहाल. आणखी वाचा.

मिथुन - श्रीगणेश यांना वाटते की आज आपल्या दिवसाची सुरुवात प्रफुल्लित मन आणि स्वस्थचित्ताने होईल. मित्र आणि नातलगांसोबत सहभोजनाचा आनंद लुटाल. सुंदर वस्त्रे परिधान कराल. आणखी वाचा.

कर्क - मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. कोणताही अंतिम निर्णय घेऊ शकणार नाही. असमंजसपणामुळे मनाला यातना होतील. संबंधितांचे गैरसमज होतील. कौटुंबिक बाबींवर खर्च होईल. आणखी वाचा.

सिंह - आजचा दिवस फार चांगला जाईल असे श्रीगणेश सांगतात. तरीही द्विधा मनःस्थितीमुळे हातची संधी गमावाल असा इशारा श्रीगणेश देतात. मन विचारात गढून जाईल. नवे कार्य हाती घेऊ नका. आणखी वाचा.

कन्या - गणेशजी म्हणतात की आजचा दिवस आपल्यासाठी शुभ आहे. नवीन कार्ये आज सफल होतील. व्यापारी व नोकरदार वर्गासाठी फायद्याचा दिवस. त्यांना पदोन्नती मिळू शकते. आणखी वाचा.

तूळ - आज आपण बौद्धिक व लेखन कार्यात व्यग्र असाल, असे गणेशजी म्हणतात. नवीन कार्यारंभास शुभ दिवस. दूरचा प्रवास, धार्मिक स्थळांना भेटीचा आज योग आहे. आणखी वाचा.

वृश्चिक - आजचा दिवस सावधतेने घालविण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. नवीन कार्याची सुरुवात करु नका. तसेच रागावर नियंत्रण ठेवा. अनैतिक कामकृत्या पासून दूर राहा. राजकीय गुन्ह्यापासून दूर राहा. आणखी वाचा.

धनु - आजचा आपला दिवस आनंदात व समाधानात जाईल असे श्रीगणेश सांगतात. मनोरंजन, पार्टी, पिकनिक, प्रवास, सुग्रास भोजन व सुंदर वस्त्र प्रावरणेही आजच्या दिवसाची विशेषता असेल. आणखी वाचा.

मकर - व्यापार धंद्यात वाढ होईल असे श्रीगणेश सांगतात. त्यादृष्टीने पुढे वाटचाल करा. पैशाचे व्यवहार सहज होतील. घरातील वातावरण आनंदी असेल. आवश्यक ठिकाणीच पैसा खर्च होईल. आणखी वाचा.

कुंभ - आज कोणत्याही नवीन कामाची सुरुवात न करण्याची सूचना श्रीगणेश देतात. आज विचारात बदल दिसून येईल. महिलांनी बोलण्यावर संयम ठेवावा. प्रवास शक्यतो टाळावेत. आणखी वाचा.

मीन - नावडत्या घटनांमुळे आजचा दिवस उत्साहात जाणार नाही असे श्रीगणेश सांगतात. कुटुंबात वादविवाद होतील. आईचे स्वास्थ्य बिघडून चिंता निर्माण होईल. मन नाराज राहील. आणखी वाचा.

Web Title: Todays horoscope 22 June 2020

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.