आजचे राशीभविष्य - 23 डिसेंबर 2019
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2019 07:08 AM2019-12-23T07:08:47+5:302019-12-23T07:09:30+5:30
कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...
मेष - आज संपूर्ण दिवस आप्तेष्टांसमवेत हर्षोल्हासात घालवाल असे श्रीगणेश सांगतात. नव्या वस्त्रांची आणि अलंकाराची खरेदी कराल. सामाजिक क्षेत्रात मानसन्मान मिळेल. आणखी वाचा
वृषभ - व्यावसायिकांना आजचा दिवस लाभदायक आहे असे श्रीगणेश सांगतात. कुटुंबातील वातावरण सुख शांतिपूर्ण असेल. प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल. आणखी वाचा
मिथुन - गणेशजी सांगतात की आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. नवे काम सुरू करू नका. बौद्धिक चर्चेसाठी दिवस चांगला नाही. संतती विषयक काळजी राहील. आणखी वाचा
कर्क - आपली निराशा शारीरिक आणि मानसिक दृष्टया व्यस्त बनवेल. शक्यतो प्रवास टाळा. स्थावर संपत्तीचा व्यवहार स्थगित करणे आपल्या हिताचे ठरेल. आणखी वाचा
सिंह - आज धार्मिक यात्रेचा संकेत श्रीगणेश देतात. नवीन कार्यारंभ कराल. परदेशातून लाभदायक वार्ता मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणूक करणारांना काळ लाभदायक आहे. आणखी वाचा
कन्या - कोणत्याही प्रकारे निर्णयाप्रत पोहोचण्याची स्थिती नसल्याने नवीन कार्य हाती घेऊ नका. आज मौन पाळून दिवस घालवण्यात हुशारी आहे. अन्यथा कोणाशी मतभेद होऊ शकतात. आणखी वाचा
तूळ - आजच्या दिवसाचा प्रारंभ समतोल आणि दृढ वैचारिकतेने होईल असे श्रीगणेश सांगतात. शारीरिक व मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष द्या. आणखी वाचा
वृश्चिक - अध्यात्म आणि ईश्वर भक्तीने मनाला शांतता लाभेल असे श्रीगणेश सांगतात. मनात येणार्या नकारात्मक भावनांवर नियंत्रण ठेवावे लागेल. आणखी वाचा
धनु - आजचा दिवस उत्पन्नात वाढ आणि लाभ देण्याची सूचना देणारा आहे. सामाजिक कार्यात भाग घेतल्याने मन प्रसन्न राहील. आणखी वाचा
मकर - स्थावर संपत्तीच्या व्यवहारासाठी आजचा दिवस शुभ आहे असे श्रीगणेश सांगतात. व्यवसायिक क्षेत्रात यश मिळेल. आणखी वाचा
कुंभ - आज व्यावसायिकांना जपून वागणे आवश्यक आहे. वरिष्ठांशी बोलताना विवेक राखा. संततीच्या आरोग्याची काळजी राहील. आणखी वाचा
मीन - कोणाशी वादविवाद किंवा भांडण करू नका असा सल्ला श्रीगणेश देतात. क्रोधावर ताबा ठेवा. गूढ विद्येचे आकर्षण राहील. आणखी वाचा