आजचे राशीभविष्य - २३ सप्टेंबर २०२० - कन्येसाठी आर्थिक लाभाचा अन् वृश्चिकसाठी आनंदाचा दिवस
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2020 07:03 AM2020-09-23T07:03:35+5:302020-09-23T07:04:04+5:30
कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...
मेष
सरकार विरोधी कृत्यांपासून शक्यतो दूर राहा. दुर्घटनेपासून जपा. बाहेरचे खाण्या-पिण्याच्या सवयीमुळे स्वास्थ्य बिघडेल. वेळेवर कामे पूर्ण होणार नाहीत. आणखी वाचा
वृषभ
आवडते मित्र आणि स्वकीयांसह हिंडण्या- फिरण्यामुळे आनंद मिळेल. सुंदर वस्त्राभूषणे आणि स्वादिष्ठ भोजनाची संधी मिळेल. आणखी वाचा
मिथुन
शारीरिक स्फूर्ती आणि मानसिक प्रसन्नता लाभेल. अपूर्ण कामे पूर्णत्वास गेल्याने आनंदात वाढ होईल. व्यवसायात अनुकूल वातावरण राहील. आर्थिक लाभाची शक्यता. आणखी वाचा
कर्क
भविष्यासाठी आर्थिक योजना आखण्यासाठी काळ चांगला आहे. एकाग्रतेने काम केल्यामुळे कामात यश जरूर मिळेल. कोणाशी वादविवाद करू नका. विद्यार्थ्यांना अनुकूल कालावधी. आणखी वाचा
सिंह
आज शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या अस्वस्थ राहाल. आईच्या तब्बेतीची चिंता राहील. आर्थिक हानी होऊ शकते. तरीही दुपारनंतर आर्थिक योजनांवर विचार कराल. परिश्रमानुरूप फळ मिळेल. आणखी वाचा
कन्या
गूढ रहस्य व आध्यात्मिकता याचे जास्त आकर्षण राहील. आर्थिक लाभ होतील. नवीन कार्याचा आरंभ करायला शुभ दिवस. प्रिय व्यक्तींशी सुसंवाद घडतील. विरोधकांवर विजय मिळवाल. आणखी वाचा
तूळ
सकाळच्या प्रहरी तब्बेत बिघडू शकते. मानसिक थकवा जाणवेल. कुटुंबातील व्यक्तींशी मर्यादेने वागा. धार्मिक कार्यावर खर्च होण्याची शक्यता. दुपारनंतर प्रसन्नतेचा अनुभव घ्याल. आणखी वाचा
वृश्चिक
आज शारीरिक तथा मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. घरात आनंद व उत्साहाचे वातावरण राहील. संताप होऊ देऊ नका. स्नेहीजनांना भेटण्याचा आनंद घ्या. दुपारनंतर नकारात्मक विचार आपणाला त्रास देतील. आणखी वाचा
धनु
कुटुंबातील व्यक्तींशी काही प्रमाणात कटुता निर्माण होईल. शारीरिक आणि मानसिक अस्वास्थ्य राहील. शस्त्रक्रिये सारख्या बाबी आज नकोत. दुपारनंतर कामे यशस्वी होतील. कुटुंबात आनंददायक वातावरण राहील. आणखी वाचा
मकर
सामाजिक दृष्ट्या प्रसिद्धी मिळाल्याने व्यावसायिक, आर्थिक व सामाजिक दृष्टीने लाभदायी दिवस. दुपारनंतर सावध राहा. तब्बेत सांभाळा. वाहन चालवताना दक्ष राहा. मानसिक अस्वस्थता जाणवेल. आणखी वाचा
कुंभ
आपला मान-सन्मान वाढेल आणि धनलाभ होईल. प्रत्येक काम सहजगत्या पूर्ण होईल. कामाच्या जागी वरिष्ठ आपल्या कामावर खुश राहतील. बढतीचे योग आहेत. आणखी वाचा
मीन
व्यवसायिक आणि व्यापार्यांना सकाळचा वेळ अनुकूल नाही. वरिष्ठ अधिकारी आणि प्रतिस्पर्धी यांच्याशी नाहक चर्चा किंवा वाद करू नका. प्रवास घडतील. दुपारनंतर कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल बनेल. आणखी वाचा