आजचं राशीभविष्य- २४ एप्रिल २०२१ - जोडीदारासोबत मतभेद होणार; पण कुटुंबातील इतरांशी सुसंवाद राहणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2021 07:08 AM2021-04-24T07:08:05+5:302021-04-24T07:08:33+5:30
कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...
मेष
आज आपले शरीरस्वास्थ्य चांगले राहील तसेच मनही प्रसन्न असेल. काल्पनिक जगातून सहल करताना नवनवीन गोष्टींचा अनुभव घ्याल. साहित्य आणि कलेच्या क्षेत्रात तुम्ही नवनिर्मिती दाखवाल, विद्यार्थी अभ्यासात चमकतील. आणखी वाचा
वृषभ
आज आपण वाणी आणि वर्तन यावर संयम ठेवण्याची आवश्यकता आहे असे श्रीगणेश सांगतात. जलाशयापासून दूर रहा. जमीन आणि संपत्ति यांच्या कागद-पत्रांवर सही करताना काळजी घ्या. आणखी वाचा
मिथुन
श्रीगणेश कृपेने आजचा दिवस सुखा- समाधानात जाईल. भावंडांशी ताळमेळ साधल्याने आपला फायदा होईल. स्वजन व मित्र भेटतील. दुपारनंतर मात्र मनात नकारात्मक विचारांची गर्दी होऊन मन काळवंडेल. आणखी वाचा
कर्क
लाभ देण्यासाठी आजचा दिवस आहे, असे श्रीगणेश सांगतात. घरातील सर्वांचे सहकार्य मिळेल. बोलण्याच्या सुंदर शैलीमुळे आपली कामे सहज पार पडतील. दुपारनंतर प्रवास सहलीचा बेत आखाल. आणखी वाचा
सिंह
आज आपली कार्य पद्धती खंबीर मनोबलपूर्ण राहील असे श्रीगणेश सांगतात. मोठया लोकांकडून लाभ होतील. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. बोलण्यातील उग्रता कमी करण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. आणखी वाचा
कन्या
भावनेच्या भरात मन वाहू देऊ नका. गैरसमज दूर करणे आवश्यक आहे. कोणाशी उग्र वाद किंवा भांडण टाळा. कुटुंबातील व्यक्तींशी मतभेद टाळा. उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल. दुपारनंतर वडील आणि वडीलधार्यांचे सहकार्य लाभेल. आणखी वाचा
तूळ
श्रीगणेश सांगतात की आज नवे कार्य हाती घेऊ नका. वैचारिक पातळीवर मन अडकून पडेल आणि मनाची खंबीरता कमी होईल. मित्रांकडून विशेष लाभ होतील. व्यापारात नफा संभवतो. आणखी वाचा
वृश्चिक
व्यावसायिक क्षेत्रात आपल्या कामाची खूप प्रशंसा होईल असे श्रीगणेश सांगतात. कामे सहजगत्या पूर्ण होतील. स्थावर संपत्तीच्या व्यवहारासाठी दिवस अनुकूल आहे. सरकारी कामकाजात लाभ होईल. आणखी वाचा
धनु
आज स्वाभावात उग्रपणा आणि तब्बेत कमजोर राहील असे श्रीगणेश सांगतात. धार्मिक यात्रा किंवा प्रवासाची शक्यता. व्यवसायात अडथळा किंवा विवाद होण्याची शक्यता. दुपारनंतर मात्र कामाच्या ठिकाणी वातावरण बदलेल. आणखी वाचा
मकर
आजारपणावर खर्च करावा लागेल असे श्रीगणेश सांगतात. अचानक धन खर्चाची शक्यता. घरातील सदस्यांबरोबर खडाजंगी होणार नाही याचे भान ठेवा. शक्यतो बाहेरचे खाणे पिणे टाळा. आणखी वाचा
कुंभ
आज व्यापारी आणि भागीदार यांच्याबरोबर जपून काम करा असा सल्ला श्रीगणेश देतात. वैवाहिक जीवनात दुःखद प्रसंग अनुभवाल. विद्यार्थ्यांची प्रगती होईल. घरातील वातावरण शांततापूर्ण राहील. आणखी वाचा
मीन
श्रीगणेशांच्या मते आजचा आपला दिवस मध्यम फलदायी आहे. कुटुंबातील व्यक्तींशी सुसंवाद राहील. दैनंदिन कामास विलंब होईल. सहकार्यांचे सहकार्य अल्प प्रमाणात मिळेल. जीवनसाथी बरोबर मतभेदाचे प्रसंग उद्भवतील. आणखी वाचा