आजचे राशीभविष्य - 24 ऑगस्ट 2019
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2019 07:29 AM2019-08-24T07:29:18+5:302019-08-24T07:30:09+5:30
कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...
मेष
आज स्वतःचे खासगी विचार बाजूला ठेवून इतरांचा विचार करा. घर आणि घरातील व्यक्तींचे काम करताना समाधानकारक व्यवहार स्वीकारणे योग्य ठरेल. वाणीवर नियंत्रण ठेवा अन्यथा कोणाशी वादविवाद किंवा मतभेद होऊ शकतील... आणखी वाचा
वृषभ
आज आर्थिक जवाबदारीकडे खास लक्ष द्याल आणि योग्य आर्थिक नियोजनही कराल. आर्थिक लाभाची शक्यता आहे. उत्साही मन आणि स्थिर विचारांमुळे सर्व कामे आपण व्यवस्थित पूर्ण करू शकाल... आणखी वाचा
मिथुन
उक्ती आणि कृती यामुळे काही संकट उभे राहणार नाही याकडे लक्ष देण्याची सूचना आहे. आवेश आणि उग्रपणा यांमुळे कोणाशी भांडण होणार नाही याची काळजी घ्या. तब्बेत चांगली राहणार नाही. विशेषतः नेत्रविकार त्रास देतील... आणखी वाचा
कर्क
आजचा दिवस लाभकारी आहे. नोकरी व व्यापारात लाभाचे संकेत आहेत. मित्रांसोबत आनंदात वेळ घालवाल. अविवाहितांना विवाहयोग आहेत. उत्पन्नाच्या साधनात वाढ होईल. अचानक धन प्राप्ती होईल. आर्थिक योजना यशस्वीरीत्या पूर्ण होतील... आणखी वाचा
सिंह
आपल्या कार्यक्षेत्रात आपला प्रभाव पडेल. वरिष्ठ अधिकार्यांवर आपल्या कामाचा सकारात्मक प्रभाव पडून ते आपणावर खूष राहतील. दृढ मनोबल आणि खंबीर आत्मविश्वासामुळे आपले प्रत्येक काम यशस्वी होईल... आणखी वाचा
कन्या
आजचा दिवस प्रतिकूलतेने भरलेला असेल. मनात चिंता राहील. शारीरिक स्फूर्तीचा अभाव असेल. थकवा आणि अशक्तपणामुळे कामे मंद होतील. नोकरी व व्यवसायात सहकारी व अधिकारी नकारात्मक वागतील. संततीविषयक चिंता राहील... आणखी वाचा
तूळ
कोणाशी वादविवाद किंवा भांडण न करण्याची सूचना. रागावू नका. उक्ती आणि कृतीवर नियंत्रण हितावह ठरेल. हितशत्रूंपासून सावध राहा. तब्बेतीकडे लक्ष द्या. अचानक धनलाभ होईल. गूढ विद्या आणि रहस्यमय विषय यांचे आकर्षण राहील... आणखी वाचा
वृश्चिक
आजचा दिवस मनोरंजनाचा आहे. मित्रांसोबत पिकनिक वा पार्टी यात दिवस चांगला जाईल. वस्त्रालंकार, वाहन व भोजनसुख चांगले मिळेल... आणखी वाचा
धनु
आजचा दिवस अनुकूल आहे. घरात आनंददायी वातावरण राहील. शरीर स्वास्थ्य व मानसिक प्रसन्नता राहील नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण. सहकार्य मिळेल. माहेरहून सुवार्ता येतील... आणखी वाचा
मकर
शारीरिकदृष्ट्या आळस, थकवा आणि अशक्तपणा जाणवेल. मानसिक चिंता राहील. व्यवसायात दैवाची साथ मिळणार नाही. वरिष्ठांना तुमचे काम आवडणार नाही. द्विधा मनःस्थितीमुळे निर्णय घेण्यात अडचणी येतील... आणखी वाचा
कुंभ
स्वभावातील हट्टीपणा सोडण्याची सूचना. भावूकतेमुळे मानसिक अस्वास्थ्य राहील. सामाजिक प्रतिष्ठा भंग पावणार नाही, याकडे लक्ष द्या. घर आणि संपत्ती संबंधित कामे आज जपून करावीत. आईकडून लाभ होईल... आणखी वाचा
मीन
महत्त्वाचे निर्णय घ्यायला दिवस शुभ आहे. सृजनशक्ती वाढेल. स्थिर विचार आणि खंबीर मन यांमुळे कार्य चांगल्या प्रकारे कराल. मित्रांसोबत प्रवास- पर्यटन कराल. भावंडांशी जवळीक वाढेल... आणखी वाचा