आजचे राशीभविष्य - 24 ऑगस्ट 2021 - मेषसाठी आर्थिक लाभाचा अन् मिथुनसाठी खर्चाचा दिवस
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 07:09 AM2021-08-24T07:09:28+5:302021-08-24T07:10:30+5:30
कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...
मेष
सामाजिक क्षेत्रात यश व प्रसिद्धी मिळेल. व्यापारात लाभ होतील. सहलीचे नियोजन कराल. दुपारनंतर मात्र मानसिक एकाग्रता राहणार नाही. तब्बेत बिघडेल. आणखी वाचा
वृषभ
कौटुंबिक जीवनात सुख- समाधानचा अनुभव घ्याल. व्यवसाय धंद्यात यश मिळेल. कामाचे कौतुक होईल आणि वरिष्ठ आपणांवर प्रसन्न राहतील. दुपारनंतर नवीन कामाचे नियोजन कराल. आणखी वाचा
मिथुन
तब्बेतीत चढ-उतार होतील. व्यवसाय- नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी नाखूष राहतील, त्यामुळे त्रास होईल. खर्च वाढेल. संततीची काळजी राहील. आणखी वाचा
कर्क
रागाला आवर घाला. अनैतिक कृत्ये आणि नकारात्मक विचारापासून दूर राहा. पैशाची चणचण भासेल. दुपारनंतर मात्र तब्बेत चांगली राहील. आणि मनःस्वास्थ्य मिळेल. आणखी वाचा
सिंह
सामाजिक सन्मान मिळेल. भागीदारांबरोबर सकारात्मक चर्चा होईल. दुपारनंतर मानसिक शैथिल्य जाणवेल. संतापाची भावना वाढेल. कुटुंबात वादविवाद होऊ नयेत यासाठी वाणीवर नियंत्रण ठेवा. आणखी वाचा
कन्या
यश आणि कीर्ती वाढेल. माहेरहून चांगल्या बातम्या मिळतील. शारीरिक व मानसिक दृष्ट्या प्रसन्नता जाणवेल. घरात सुखशांती राहील. प्रत्येक कामात खंबीर मनोबल आणि आत्मविश्वास दिसून येईल. आणखी वाचा
तूळ
विचारात सातत्यपूर्ण बदल झाल्याने मानसिक स्वास्थ्य लाभणार नाही. सबब यात्रा- प्रवास टाळावा. अचानक खर्च उद्भवतील. दुपारनंतर कामे यशस्वी झाल्याने मानसिक प्रसन्नता लाभेल. आणखी वाचा
वृश्चिक
स्वभावातील हट्टीपणा सोडून वागल्याने अनेक समस्या सुटतील. नवी वस्त्रे, अलंकार व सौंदर्य प्रसाधने यांवर जास्त खर्च होण्याची शक्यता आहे. आर्थिक योजना सहज आखाल. आणखी वाचा
धनु
मित्र आणि स्वकीयांसोबत वेळेचा सदुपयोग आनंदपूर्वक होईल. दुपारनंतर शारीरिक व मानसिक दृष्ट्या बेचैन राहाल. सौंदर्य प्रासधने, गृहसजावट आणि मनोरंजनाची साधने खरेदी कराल. आणखी वाचा
मकर
र्मिक कार्य आणि उपासनेसाठी पैसा खर्च होईल. कुटुंबीयांशी मतभेद होऊ नयेत यासाठी वाणीवर नियंत्रण ठेवा. दुपारनंतर मन प्रफुल्लित राहील. शारीरिक स्वास्थ्य मिळेल. आणखी वाचा
कुंभ
आज प्रापंचिक बाबीं ऐवजी आध्यात्मिक विषयांकडे आपला जास्त कल राहील. नकारात्मक भावनेला महत्त्व न देता. मानसिक स्वास्थ्य मिळविण्याचा प्रयत्न करा. आणखी वाचा
मीन
इतरांच्या कामांत व्यत्यय आणू नका. कोर्ट- कचेरी प्रकरणात जपून राहा. वाणी आणि संतापावर नियंत्रण ठेवा. अपघाता पासून जपा. दुपारनंतर शारीरिक व मानसिक स्वास्थ्य सुधारेल. आणखी वाचा