राशीभविष्य- २४ फेब्रुवारी २०२१: 'या' राशीच्या व्यक्तींना आज मिळणार सरकारी लाभ
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2021 07:20 AM2021-02-24T07:20:42+5:302021-02-24T07:23:48+5:30
Todays Horoscope 24 February 2021: जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस
मेष - सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल आहे. सरकारी लाभ होतील. व्यापार, व्यावसायात लाभ होतील. वरिष्ठ अधिकारी खुश राहतील. आपल्या विचारांत एकदम बदल होतील. आणखी वाचा
वृषभ - आजचा दिवस आपणाला मध्यम फलप्राप्तीचा जाईल. श्रीगणेश सांगतात की मित्र आणि स्नेह्यांशी होणारी भेट आनंददायक ठरेल. आणखी वाचा
मिथुन - आर्थिक दृष्टिकोनातून आजचा दिवस लाभदायी राहील असे श्रीगणेश सांगतात. आज आप्तेष्टांचे सहकार्य आनंददायी ठरेल. सुंदर वस्त्रे आणि उत्तम भोजनाचा लाभ मिळेल. आणखी वाचा
कर्क - आर्थिक दृष्टीने उत्पन्नापेक्षा खर्च अधिक होईल. डोळ्याचे विकार बळावतील. मानसिक चिंता राहील. उक्ती व कृतीवर संयम ठेवा. कोणाशी वाद होऊ नयेत याची काळजी घ्या. आणखी वाचा
सिंह - सकाळची वेळ फारच चांगली जाईल असे श्रीगणेश सांगतात. सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रांत आनंददायक व लाभदायक वार्ता प्राप्त होतील. मित्रांकडून शुभवार्ता. धनलाभ होऊन उत्पन्न वाढेल. आणखी वाचा
कन्या - आजचा दिवस आपणाला अनुकूल असेल असे श्रीगणेश सांगतात. घरातील व्यक्तींशी प्रेमपूर्ण संबंध राहतील. आप्तेष्टांकडून भेटवस्तू मिळतील. व्यवसाय- धंदयात वरिष्ठ अधिकारी आपल्या कामावर खुश राहतील. आणखी वाचा
तूळ - सकाळच्या प्रहरी मन चिंताग्रस्त राहील. शारीरिक दृष्ट्या ढिलेपणा आणि आळस वाढेल. व्यवसायात वरिष्ठ असंतुष्ट राहतील. संततीशी मतभेदाची शक्यता. दुपारनंतर कामाच्या ठिकाणी वातावरण बदलेल. आणखी वाचा
वृश्चिक - अध्यात्म आणि ईश्वर प्रार्थना यांमुळे अयोग्य बाबींपासून आपली सुटका होईल असे श्रीगणेश सांगतात. शारीरिक आणि मानसिक अस्वास्थ्य राहील. मानभंग होणार नाही याची काळजी घ्या. आणखी वाचा
धनु - दिवसभर मनात सुखदुःखाची संमिश्र भावना राहील असे श्रीगणेश सांगतात. सकाळी आनंद आणि मनोरंजना मध्ये गुंग राहाल. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. आणखी वाचा
मकर - इतरांशी बोलताना रागावर नियंत्रण ठेवण्याची सूचना श्रीगणेश देत आहेत. घरातील वातावरण सुख, शांती आणि आनंदपूर्ण राहील. मान- सन्मान मिळण्याची शक्यता. आर्थिक लाभ होईल. आणखी वाचा
कुंभ - श्रीगणेश सांगतात की आज आपणाला कलेविषयी विशेष गोडी वाटेल. खर्चाचे प्रमाण वाढेल. संतती विषयक प्रश्न भेडसावतील. दुपारनंतर घरातील वातावरण शांतिपूर्ण राहील. आणखी वाचा
मीन - आज जास्त भावनाशील बनू नका असा सल्ला श्रीगणेश देत आहेत. अधिक विचारांमुळे मानसिक थकवा जाणवेल. सबब जमीन, घर, संपत्ती इ. विषयी चर्चा न करण्याचा सल्ली श्रीगणेश देतात. आणखी वाचा