आजचे राशीभविष्य - २४ जुलै २०२० - मकरसाठी खर्चाचा, तूळसाठी लाभाचा दिवस
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2020 06:33 AM2020-07-24T06:33:04+5:302020-07-24T06:57:02+5:30
कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...
मेष
मानसिकदृष्टया थकवा जाणवेल. अधिक कष्ट करूहन त्यामानाने प्राप्ती कमी होईल. संतती विषयी काळजी राहील. आणखी वाचा
वृषभ
आज आपण कोणतेही कार्य खंबीर मनोबल आणि दृढ आत्मविश्वास यांच्या जोरावर पूर्ण कराल. पैतृक घराण्याकडून आपणाला लाभ होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासात गोडी वाटेल. आणखी वाचा
मिथुन
सरकारी लाभ होतील. वरिष्ठ अधिकार्यांकडून तुमच्या कामाचे योग्य मूल्य मिळेल. भावंडे आणि शेजारी- पाजारी यांच्याशी झालेले गैरसमज दूर होतील. आणखी वाचा
कर्क
शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य आज मिळणार नाही. निराशा आणि असंतोषाची भावना मनात राहील. कुटुंबियांशी गैरसमज होणार नाहीत या विषयी लक्ष द्या. आणखी वाचा
सिंह
आज आपणामध्ये आत्मविश्वास परिपूर्ण असेल. कोणतेही काम करण्याचा निर्णय आपण झटकन ध्याल. वडील आणि वडीलधार्यांकडून लाभ होतील. आणखी वाचा
कन्या
शारीरिक थकवा व मानसिक तणाव वाढेल. एखाद्या गोष्टीवरून मित्रांबरोबर गैरसमज होतील. स्वभावात रागाचे प्रमाण वाढेल. धार्मिक कार्यासाठी खर्च होईल. आणखी वाचा
तूळ
आजचा आपला दिवस शुभफलदायी आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातून झालेल्या लाभातून आपल्याला समाधान मिळेल. मिळकतीत वृद्धी. मित्रांकडून फायदा होईल पण त्यांच्यासाठी खर्च ही होईल. आणखी वाचा
वृश्चिक
आजचा दिवस आपणास शुभफलदायी आहे. नोकरी व्यवसायातील वातावरण अनुकूल असेल. वरिष्ठ अधिकारी आपल्यावर प्रसन्न असतील. प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल. आणखी वाचा
धनु
आळस व अशक्तपणा जाणवेल. मनाला चिंता लागून राहील. व्यावसायिक दृष्टया अडथळे येतील. संकटाविषयीच्या विचारापासून दूर राहा. आणखी वाचा
मकर
आज अचानक पैसा खर्च होण्याचे योग आहेत. हा खर्च आजारपणावर, व्यावहारिक किंवा सामाजिक कामासाठी बाहेर जावे लागल्यामुळे होऊ शकतो. खाण्यापिण्याकडे लक्ष द्या. आणखी वाचा
कुंभ
आज अनुकूल दिवस आहे. प्रत्येक काम आपण आत्मविश्वापूर्वक कराल. प्रवास, सहलींची शक्यता आहे. स्वादिष्ट भोजन व नवीन वस्त्रपरिधान करण्याचे आज योग आहेत. आणखी वाचा
मीन
आपले मनोबल आणि आत्मविश्वास दृढ बनेल. शारीरिक स्वास्थ्य चांगले राहील. घरात सुखशांती नांदेल. स्वभावातील तापटपणामुळे संयम ठेवण्याचा प्रयत्न करा. आणखी वाचा