राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२० - कर्कसाठी पैशांची चणचण भासणारा तर मेषसाठी लाभाचा दिवस
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2020 09:01 PM2020-11-23T21:01:17+5:302020-11-23T21:02:10+5:30
कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...
मेष
विवाहोत्सुकांना योग्य जोडीदार मिळण्याचे योग आहेत. सामाजिक क्षेत्रात यश व प्रसिद्धि मिळेल. व्यापारात लाभ होतील. आणखी वाचा
वृषभ
आजचा दिवस शुभ फलदायी आहे. व्यवसायात अनुकूल स्थिती. आपल्या कामाचे योग्य कौतुक होईल. समाजात मान- प्रतिष्ठा वाढेल. कामे सरळ पार पडतील आणि त्यांच्यापासून लाभ होईल. आणखी वाचा
मिथुन
तब्बेतीत चढ-उतार होतील. व्यवसाय- नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी नाखूष राहतील, त्यामुळे त्रास होईल. खर्च वाढेल. संततीची काळजी राहील. दुपारनंतर कार्यात यश दृष्टिक्षेपात आल्याने मनाला आनंद वाटेल. आणखी वाचा
कर्क
आज मन शांत आणि आनंदी राहण्यासाठी ईश्वराचा नाम जप आणि आध्यात्मिक वाचन हाच एकमेव उपाय असल्याचे गणेशजी सांगतात. रागाला आवर घाला. अनैतिक कृत्ये आणि नकारात्मक विचारापासून दूर राहा. पैशाची चणचण भासेल. आणखी वाचा
सिंह
मित्र आणि स्नेहीजनांसह आनंद लुटाल. सहलीचा आनंद लुटाल. दुपारनंतर मात्र खूप विचार केल्यामुळे मानसिक थकवा जाणवेल. संतापामुळे कार्ये बिघडतील, पण बोलण्यावर संयम ठेवून परिस्थिति सांभाळू शकाल. आणखी वाचा
कन्या
कार्यात यश मिळाल्याने खुश राहाल. यश व प्रसिद्धी वाढेल. कौटुंबिक वातावरण अनुकूल राहील. त्यामुळे शारीरिक व मानसिक दृष्टया आपण तरतरीत व प्रफुल्लित राहाल. भावनावश होऊन वाहवत जाऊ नका. आणखी वाचा
तूळ
नवीन कार्यारंभास शुभ दिवस दूरचा प्रवास, धार्मिक स्थळांना भेटीचा आज योग आहे. व्यवसाय धंद्यात फायदा. परदेशातील मित्रांचे समाचार मिळतील. सहकार्यांचे सहकार्य मिळेल. आरोग्य सांभाळावे. संततीविषयी द्विधा मनःस्थिती राहील. आणखी वाचा
वृश्चिक
भावनेच्या आहारी जाऊ नका. त्यामुळे मानसिक ताण कमी होईल. आर्थिक नियोजन कराल. वस्त्र, दागीने व सौंदर्य प्रसाधने यांवर खर्च होईल. आईकडून लाभ मिळेल. दुपारनंतर विचारात एकदम बदल होईल. आणखी वाचा
धनु
आज मन उत्साहित राहील व हल्केपणा जाणवेल. कुटुंबीयांसह कौटुंबिक प्रश्नांवर चर्चा होईल त्यातून योग्यनिर्णय ध्याल. मित्रांशी संबंध वाढतील आणि प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. भाग्यवृद्धीचे योग आहेत. आणखी वाचा
मकर
आज धार्मिक विचारांबरोबर धार्मिक कार्यावरही खर्च होईल. वादविवादामुळे कौटुंबिक वातावरण गढुळ होऊ नये याकडे लक्ष द्या. परिवारातील सदस्यांचे मन दुखावेल व ते नाराज होतील. दुपारनंतर मनातील चिंता दूर होतील. आणखी वाचा
कुंभ
गहन चिंतनशक्ती आणि आध्यात्मिकता यात मन गुंतून जाईल. मनातून नकारात्मक विचार काढून टाकण्याचा सल्ला गणेशजी देत आहेत. उक्तीवर संयम ठेवा. अचानक उद्भवणार्या खर्चावर नियंत्रण ठेवा. आणखी वाचा
मीन
मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करा. आज खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. आप्तांशी कटुप्रसंग उद्भवतील. दुपारनंतर तब्बेतीत सुधारणा होईल. मनःस्वास्थ्यही मिळेल. मित्रांकडून भेटवस्तू मिळतील. आणखी वाचा