आजचे राशीभविष्य- 25 ऑगस्ट 2020; दिवस लाभदायक; कुटुंबातलं वातावरण सुख शांतीपूर्ण असेल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2020 07:17 AM2020-08-25T07:17:03+5:302020-08-25T07:17:23+5:30
कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...
मेष - आज संपूर्ण दिवस आप्तेष्टांसमवेत हर्षोल्हासात घालवाल असे श्रीगणेश सांगतात. नव्या वस्त्रांची आणि अलंकाराची खरेदी कराल. सामाजिक क्षेत्रात मानसन्मान मिळेल. आणखी वाचा.
वृषभ - व्यावसायिकांना आजचा दिवस लाभदायक आहे असे श्रीगणेश सांगतात. कुटुंबातील वातावरण सुख शांतिपूर्ण असेल. प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल. आणखी वाचा.
मिथुन - गणेशजी सांगतात की आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. नवे काम सुरू करू नका. बौद्धिक चर्चेसाठी दिवस चांगला नाही. संतती विषयक काळजी राहील. आणखी वाचा.
कर्क - आपली निराशा शारीरिक आणि मानसिक दृष्टया व्यस्त बनवेल. शक्यतो प्रवास टाळा. स्थावर संपत्तीचा व्यवहार स्थगित करणे आपल्या हिताचे ठरेल. आणखी वाचा.
सिंह - आज धार्मिक यात्रेचा संकेत श्रीगणेश देतात. नवीन कार्यारंभ कराल. परदेशातून लाभदायक वार्ता मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणूक करणारांना काळ लाभदायक आहे. आणखी वाचा.
कन्या - कोणत्याही प्रकारे निर्णयाप्रत पोहोचण्याची स्थिती नसल्याने नवीन कार्य हाती घेऊ नका. आज मौन पाळून दिवस घालवण्यात हुशारी आहे. अन्यथा कोणाशी मतभेद होऊ शकतात. आणखी वाचा.
तूळ - आजच्या दिवसाचा प्रारंभ समतोल आणि दृढ वैचारिकतेने होईल असे श्रीगणेश सांगतात. शारीरिक व मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष द्या. नवी वस्त्रे आणि अलंकार यावर जास्त खर्च होईल. आणखी वाचा.
वृश्चिक - अध्यात्म आणि ईश्वर भक्तीने मनाला शांतता लाभेल असे श्रीगणेश सांगतात. मनात येणार्या नकारात्मक भावनांवर नियंत्रण ठेवावे लागेल. कोर्ट- कचेरीच्या कामात जपून राहा. आणखी वाचा.
धनु - आजचा दिवस उत्पन्नात वाढ आणि लाभ देण्याची सूचना देणारा आहे. सामाजिक कार्यात भाग घेतल्याने मन प्रसन्न राहील. मान- सन्मान व उत्पन्नात वाढ होईल. व्यापारात लाभाची शक्यता. आणखी वाचा.
मकर - स्थावर संपत्तीच्या व्यवहारासाठी आजचा दिवस शुभ आहे असे श्रीगणेश सांगतात. व्यवसायिक क्षेत्रात यश मिळेल. वरिष्ठ अधिकारी आपणाला प्रोत्साहन देतील. बढतीचे योग आहेत. आणखी वाचा.
कुंभ - आज व्यावसायिकांना जपून वागणे आवश्यक आहे. वरिष्ठांशी बोलताना विवेक राखा. संततीच्या आरोग्याची काळजी राहील. दीर्घकालीन प्रवासाची योजना आखाल. आणखी वाचा.
मीन - कोणाशी वादविवाद किंवा भांडण करू नका असा सल्ला श्रीगणेश देतात. क्रोधावर ताबा ठेवा. गूढ विद्येचे आकर्षण राहील. सुखमय बाबींत गोडी वाटेल. गहन चिंतन मनाला शांती देईल. आणखी वाचा.