आजचे राशीभविष्य - 25 ऑगस्ट 2021 - मेषसाठी विनाकारण खर्च वाढतील तर मिथुनसाठी समाजात मान- सन्मान प्राप्त होईल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2021 07:23 AM2021-08-25T07:23:25+5:302021-08-25T07:24:50+5:30
कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...
मेष
शारीरिक व मानसिक अस्वस्थता अनुभवाल. विनाकारण खर्च वाढतील. गुंतवणूक करण्याकडे लक्ष द्या. परोपकारात गमावून बसण्याचे संकट येईल. आणखी वाचा
वृषभ
आजचा दिवस आनंदाचा आहे. व्यापार आणि आवक वाढणे यावर लक्ष्मीची कृपा राहील. कुटुंबीय व मित्र यांच्याबरोबर आनंदी वातावरण राहील. नवे संबंध व नवे परिचय व्यापारत लाभप्रद होतील. आणखी वाचा
मिथुन
व्यवसायात प्रशंसा झाल्याने कामातील उत्साह वाढेल. सहकार्यांकडून सहकार्य मिळेल. समाजात मान- सन्मान प्राप्त होईल. कुटुंबीयां बरोबर आनंदात वेळ घालवाल. आणखी वाचा
कर्क
परदेशातून शुभ समाचार मिळतील. धार्मिक यात्रा किंवा छोटा प्रवास यामुळे प्रसन्नता वाढेल. शारीरिक स्वास्थ्याचा दिवस. मन प्रसन्न राहील. मित्र, कुटुंबीय यांच्या बरोबर दिवस आनंदात जाईल. आणखी वाचा
सिंह
आज तब्येतीकडे विशेष लक्ष द्यावे. त्यासाठी पैसाही खर्च होऊ शकतो. आज घरचेच खाणे पीणे ठेवा. ते अधिक फायदेशीर होईल. नकारात्मक विचार मनात राहतील, ते दूर करण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. आणखी वाचा
कन्या
आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. यश, कीर्ती सहजपणे प्राप्त होतील. व्यापार धंद्यात भागीदारा बरोबरचे संबंध सकारात्मक राहतील. वस्त्र, आभुषणे खरेदी केल्याने खुशीत असाल. आणखी वाचा
तूळ
आज तुमचे स्वास्थ्य चांगले राहील. व्यापारात लाभ होईल. सहकार्यांचे सहकार्य मिळेल. परिवारासोबत वेळ आनंदात घालवू शकाल. बोलण्यावर ताबा ठेवा. आणखी वाचा
वृश्चिक
संतती विषयी चिंता लागेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळाल्याने त्यांचा उत्साह अधिकच वाढेल. शेअर्स व सट्टा यात धन खर्चू नका असा श्रीगणेश सल्ला देतात. शक्य असेल तर प्रवास टाळा. आणखी वाचा
धनु
आज मन अनुत्साही असल्यामुळे मनात अशांती असेल. कुटुंबात वातावरण क्लेशदायक असेल. कुटुंबीयांशी मतभेद होऊ शकतात. स्थावर मिळकतीचे व्यवहार करताना जपून करावेत. आणखी वाचा
मकर
मित्र- परिवारासोबत आजचा दिवस आनंदात जाईल. एखाद्या पर्यटन स्थळाला भेट द्याल. स्थावर मिळकती संबंधीची कामे आज करू शकाल. व्यवसाय करणार्यांना अनुकूल दिवस. आणखी वाचा
कुंभ
मानसिकदृष्ट्या द्विधा मनःस्थिती असल्याने निर्णय घ्यायला त्रास पडेल. निरर्थक खर्च होऊ देऊ नका. बोलण्यावर ताबा नसल्याने कुटुंबीयांशी मतभेद होऊ शकतात. आणखी वाचा
मीन
शारीरिक व मानसिक स्वास्थ्य प्रसन्नतापूर्ण असेल. वातावरण उत्साहपूर्ण असल्याने नवीन कामे सुरू करण्याची प्रेरणा मिळेल. कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल. आणखी वाचा