आजचे राशीभविष्य - 25 डिसेंबर 2019
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2019 06:55 AM2019-12-25T06:55:36+5:302019-12-25T06:56:50+5:30
कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...
मेष
आज सावध राहण्याचा सल्ला श्रीगणेश आपणाला देत आहेत. सरकार विरोधी कृत्यांपासून शक्यतो दूर राहा. दुर्घटनेपासून जपा. आणखी वाचा
वृषभ
आवडते मित्र आणि स्वकीयांसह हिंडण्या- फिरण्यामुळे आनंद मिळेल. सुंदर वस्त्राभूषणे आणि स्वादिष्ट भोजनाची संधी मिळेल. आणखी वाचा
मिथुन
कौटुंबिक वातावरण आज उल्हासमय राहील. शारीरिक स्फूर्ती आणि मानसिक प्रसन्नता लाभेल. अपूर्ण कामे पूर्णत्वास गेल्याने आनंदात वाढ होईल. आणखी वाचा
कर्क
भविष्यासाठी आर्थिक योजना आखण्यासाठी काळ चांगला आहे असे श्रीगणेश सांगतात. एकाग्रतेने काम केल्यामुळे कामात यश जरूर मिळेल. आणखी वाचा
सिंह
आज शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या अस्वस्थ राहाल. आईच्या तब्येतीची चिंता राहील. आर्थिक हानी होऊ शकते. आणखी वाचा
कन्या
गूढ रहस्य व आध्यात्मिकता याचे जास्त आकर्षण राहील. श्रीगणेशाच्या आशीर्वादाने आर्थिक लाभ होतील. आणखी वाचा
तूळ
सकाळच्या प्रहरी तब्येत बिघडू शकते असे श्रीगणेश सांगतात. मानसिक थकवा जाणवेल. कुटुंबातील व्यक्तींशी मर्यादेने वागा. आणखी वाचा
वृश्चिक
आज शारीरिक तथा मानसिक स्वास्थ्य चांगले राहील असे श्रीगणेश सांगतात. घरात आनंद व उत्साहाचे वातावरण राहील. आणखी वाचा
धनु
वाणीवर नियंत्रण ठेवा आणि संताप न करण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. कुटुंबातील व्यक्तींशी काही प्रमाणात कटुता निर्माण होईल. आणखी वाचा
मकर
सामाजिक दृष्ट्या प्रसिद्धी मिळाल्याने व्यावसायिक, आर्थिक व सामाजिक दृष्टीने लाभदायी दिवस. दुपारनंतर सावध राहा. तब्येत सांभाळा. आणखी वाचा
कुंभ
आपला मान-सन्मान वाढेल आणि धनलाभ होईल असे संकेत श्रीगणेश देतात. प्रत्येक काम सहजगत्या पूर्ण होईल. आणखी वाचा
मीन
व्यवसायिक आणि व्यापार्यांना सकाळचा वेळ अनुकूल नाही असे श्रीगणेश सांगतात. वरिष्ठ अधिकारी आणि प्रतिस्पर्धी यांच्याशी नाहक चर्चा किंवा वाद करू नका. आणखी वाचा