आजचे राशीभविष्य- 26 ऑगस्ट 2020; नोकरीत वरिष्ठांशी वाद होतील; नाराजी ओढवून घ्याल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 07:29 AM2020-08-26T07:29:05+5:302020-08-26T07:30:37+5:30

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

Todays horoscope 26 August 2020 | आजचे राशीभविष्य- 26 ऑगस्ट 2020; नोकरीत वरिष्ठांशी वाद होतील; नाराजी ओढवून घ्याल

आजचे राशीभविष्य- 26 ऑगस्ट 2020; नोकरीत वरिष्ठांशी वाद होतील; नाराजी ओढवून घ्याल

Next

मेष - श्रीगणेशांच्या सांगण्यानुसार आजचा आपला दिवस आध्यात्मिक दृष्टीने वेगळा अनुभव देणारा ठरेल. गूढ आणि रहस्यमय विद्या आत्मसात करण्यात गोडी वाटेल. आध्यात्मिक सिद्धी प्राप्त होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा.

वृषभ - दांपत्यजीवनात विशेष आनंद मिळेल. आपण सहकुटुंब एखाद्या सामाजिक ठिकाणी फिरायला किंवा छोटा प्रवास करायला जाल आणि दिवस आनंदात घालवाल. आणखी वाचा.

मिथुन - श्रीगणेश सांगतात की कार्यपूर्ती, यश आणि कीर्ती मिळविण्याच्या दृष्टीने आजचा दिवस शुभ आहे. घरात सुखाचे आणि शांतीचे वातावरण राहील. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य लाभेल. आणखी वाचा.

कर्क - अगदी शांत राहून आजचा दिवस घालवा अशी सूचना श्रीगणेश देतात. शारीरिक आणि मानसिक अस्वास्थ्यामुळे बेचैन राहाल. अचानक खर्च उद्भवतील. आणखी वाचा.

सिंह - श्रीगणेश सांगतात की आज परिवारात मतभिन्नतेचे वातावरण राहील. कुटुंबाशी मतभेदाचे प्रसंग उद्भवतील. आईची तब्बेत बिघडू शकते. मनात नकारात्मक विचार येतील. आणखी वाचा.

कन्या - शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. प्रेमपूर्ण संबंधांमुळे अगदी भारावून जाल. भावंडांसमवेत वेळ आनंदात जाईल. त्यांच्याकडून लाभ पण होतील. प्रतिस्पर्ध्यांची चाल हाणून पाडाल. आणखी वाचा.

तूळ - आज द्विधा मनःस्थिती राहील. त्यामुळे कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेऊ नका असे श्रीगणेश सांगतात. नवीन काम सुरू करू नका. वाणीवर संयम ठेवा. आणखी वाचा.

वृश्चिक - श्रीगणेश सांगतात की आज कुटुंबात आनंदात दिवस घालवाल. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य राहील. प्रिय व्यक्तींशी भेट सफल आणि आनंददायक ठरेल. एखादी शुभवार्ता मिळेल. आणखी वाचा.

धनु - आजचा दिवस कष्टप्रद जाईल. कुटुंबातील सदस्यांशी मतभेद होतील. स्वभावात क्रोध आणि आवेश राहील. त्यामुळे कोणाशी तीव्र स्वरुपाचे भांडण होईल. तब्बेत बिघडेल. आणखी वाचा.

मकर - श्रीगणेश म्हणतात की आजच्या लाभप्राद दिनी एखाद्या शुभ प्रसंगाचा बेत आखाल. एखाद्या वस्तूची खरेदी करण्यास दिवस शुभ आहे. शेअर- सट्टा या मध्ये धन लाभ होईल. आणखी वाचा.

कुंभ - श्रीगणेशाच्या आशीर्वादा बरोबरच वरिष्ठ अधिकारी आणि वयोवृद्धांची आपणावर कृपादृष्टी राहील. आपली सर्वकामे अगदी सरळपणे पूर्ण होत असल्याचा अनुभव येईल. आणखी वाचा.

मीन - श्रीगणेश सांगतात की आज शरीर आणि मन बेचैन राहील. संतती विषयक समस्या काळजीत टाकील. नोकरीत उच्च पदाधिकार्‍यांशी वादविवाद होतील आणि त्यांची नाराजी ओढवून घ्याल. आणखी वाचा.

 

Web Title: Todays horoscope 26 August 2020

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.