आजचे राशीभविष्य - 26 ऑगस्ट 2021 - मकरसाठी आर्थिक लाभाचे योग अन् सिंहसाठी खर्चाचा दिवस
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2021 07:19 AM2021-08-26T07:19:48+5:302021-08-26T07:25:26+5:30
कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...
मेष
आज अनुकूल दिवस आहे. शांत मनाने आज सारी कामे पार पडतील. त्यामुळे तुमच्यामध्ये उत्साह संचारेल. लक्ष्मीची कृपा असेल. कुटुंबियांसोबत आनंदात वेळ जाईल. आणखी वाचा
वृषभ
आजचा दिवस सावधतेने घालवा. तुमचे मन वेगवेगळ्या चिंतांनी ग्रस्त असेल. स्वास्थ्य बिघडेल किंवा डोळ्याचे विकार संभवतात. कुटुंबीय किंवा आप्तजन यांचा विरोध राहील. आणखी वाचा
मिथुन
आजचा दिवस लाभप्रद असेल. अविवाहितांना योग्य जीवनसाथी मिळण्याचे योग आहेत. प्राप्तीसाठी शुभ दिवस. मित्रांच्या भेटीतून आनंद मिळेल व फायदा सुद्धा होईल. आणखी वाचा
कर्क
आज आपण धार्मिक कार्य, पूजा- अर्चा यांत मग्न राहाल. धार्मिक स्थळाच्या भेटीने आनंद मिळेल. कुटुंबीयांसमवेत वेळ चांगला जाईल. तब्बेत चांगली राहील. आणखी वाचा
सिंह
आज खूप जपून राहण्याचा सल्ला देत आहेत. आज विपरित घटनांना तोंड द्यावे लागेल. तब्बेतीकडे लक्ष द्या. तब्बेत बिघडल्याने अचानक खर्च करावा लागेल. आणखी वाचा
कन्या
सामाजिक व अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा मिळेल. भारी वस्त्रे आणि अलंकाराची खरेदी होईल. वाहनसुख मिळेल. भागीदारांबरोबर चांगले संबंध राहातील. आणखी वाचा
तूळ
घरातील सुखा-समाधानाचे वातावरण आपला आनंद वाढीस लावेल. कामाच्या ठिकाणी सहकार्यांचे सहकार्य मिळेल. कामात यशप्राप्ती होईल. आणखी वाचा
वृश्चिक
आजचा दिवस मध्यम फलप्राप्तीचा. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगली प्रगती करता येईल. नवीन कार्य आज सुरू करू नका. आर्थिक नियोजनाच्या दृष्टीने दिवस अनुकूल असल्यामुळे आपल्या कष्टाचे फळ मिळेल. आणखी वाचा
धनु
शारीरिक उत्साह आणि मानसिक तरतरी यांचा अभाव असेल. कुटुंबीयांबरोबर ताण तणावाच्या प्रसंगामुळे घरातील वातावरण कलुषित राहील. मानहानी होणार नाही याची काळजी घ्या. आणखी वाचा
मकर
नोकरी, व्यापार आणि दैनंदिन कामात अनुकूल स्थिती असल्याने मन प्रसन्न राहील. भावंडांकडून सहकार्य मिळेल आणि लाभही होतील. आर्थिक लाभाचे योग आहेत. आणखी वाचा
कुंभ
धार्मिक कार्यावर खर्च होईल. घरातील वातावरण बिघडेल. कामात अपयश आल्याने मन दुःखी होईल आणि निराशा येईल. सबब तब्बेतीकडे लक्ष द्या. आणखी वाचा
मीन
आपणासाठी आजचा दिवस शुभ फलदायी राहील. उत्साह आणि स्वास्थ्य टिकून राहील. नवीन कार्यारंभासाठी दिवस चांगला आहे. मित्र आणि कुटुंबीयांसमवेत भोजनाचा आस्वाद घ्याल. आणखी वाचा