आजचे राशीभविष्य - २६ मे २०२०
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 06:31 AM2020-05-26T06:31:17+5:302020-05-26T06:31:58+5:30
कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...
मेष
विचारांच्या गतिशीलतेमुळे द्विधा मनःस्थिती जाणवेल. निर्णयाप्रत येऊ शकणार नाही. आजचा दिवस नोकरी धंद्यात स्पर्धामय राहील आणि त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न कराल. आणखी वाचा
वृषभ
आज द्विधा स्थितीतील व्यवहार आपणाला अडचणीत आणेल. महत्त्वाचा वेळ त्यासाठी खर्च करावा लागेल. आपला हट्टी स्वभाव सोडा अन्यथा कोणाशी चर्चा, विवादा दरम्यान संघर्ष होईल. आणखी वाचा
मिथुन
आजच्या दिवसाचा प्रारंभ शरीर आणि मनाच्या टवटवीतपणामुळे चांगला होईल. घरात किंवा मित्र आणि कुटुंबीयांसमवेत बाहेर मनपसंत भोजनाचा आनंद लुटाल. सुंदर कपडे परिधान करून बाहेर जाल. आणखी वाचा
कर्क
आज जास्त खर्च होण्याचा दिवस आहे. कौटुंबिक वातावरण पण फारसे समाधानकारक राहणार नाही. कुटुंबातील व्यक्तींशी मतभेदाचे प्रसंग येतील. मनात निर्माण होणार्या अनिश्चिततेमुळे मानसिक अस्वास्थ्य राहील. आणखी वाचा
सिंह
कोणत्याही गोष्टीत खंबीर मनाने निर्णय घेऊ न शकल्याने चालून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही. मन विचारांत अडकून पडेल. मित्रांकडून व विशेषतः स्त्रीवर्गाकडून लाभ होईल. आणखी वाचा
कन्या
सांप्रतकाली नव्या कामासंदर्भातील नियोजन योग्य प्रकारे करू शकाल. व्यापारी आणि नोकरदार यांना आजचा दिवस लाभदायक ठरेल. वरिष्ठ अधिकार्यांच्या कृपेमुळे बढतीचे योग संभवतात. व्यापारात लाभाची शक्यता. आणखी वाचा
तूळ
आज नोकरीच्या ठिकाणी आपणाला वरिष्ठांच्या नाराजीला सामोरे जावे लागेल. संतती विषयक काळजी वाटेल. दूरवरच्या प्रवासाचे नियोजन करा. आणखी वाचा
वृश्चिक
सध्या शांत राहून वेळ घालवा. रागावर नियंत्रण ठेवा. अनैतिक कामांपासून दूर राहा. नवे संबंध विचारपूर्वक प्रस्थापित करा. जास्त पैसे खर्च झाल्याने आर्थिक चणचण भासेल. काम वेळेवर पूर्ण होणार नाही. आणखी वाचा
धनु
आज बौद्धिक आणि तार्किक विचार विनिमयासाठी दिवस चांगला. सामाजिक सन्मान मिळेल. मित्रांशी मुलाखात होईल. त्यांच्या सोबत हिंडणे- फिरणे वा मनोरंजक स्थळी जाण्याचा योग येईल. आणखी वाचा
मकर
आज व्यापार धंद्यात मोठे यश मिळेल पण कायद्याच्या कचार्यात सापडू नका एवढी दक्षता घ्या. व्यापार उद्योगाच्या दृष्टीने भावी योजना सुफळ होतील. पैशाच्या देवाण- घेवाणीचा व्यवहार व्यवस्थित पार पडेल. आणखी वाचा
कुंभ
आज बौद्धिक क्षमता, लेखनकार्य आणि नवनिर्मिती व्यवस्थित पूर्ण करू शकाल. विचार एकाच गोष्टीवर स्थिर राहणार नाही. सातत्याने बदल होत राहील. स्त्रियांनी वाणीवर काबू ठेवा. शक्यतो यात्रा- प्रवास टाळा. आणखी वाचा
मीन
घर, वाहन इत्यादींची कागदपत्रे सांभाळून ठेवा. घरातील वातावरण बिघडू नये यासाठी वाद-विवाद टाळा. आईचे आरोग्य बिघडेल. धन आणि प्रतिष्ठेची हानी होईल. स्त्रियांशी व्यवहार करताना सावध राहा. आणखी वाचा