राशीभविष्य - २६ नोव्हेंबर २०२० - मकरसाठी आर्थिक लाभाचा अन् मेषसाठी खर्चाचा दिवस

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2020 09:31 PM2020-11-25T21:31:09+5:302020-11-25T21:31:38+5:30

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

Today's horoscope - 26 November 2020 | राशीभविष्य - २६ नोव्हेंबर २०२० - मकरसाठी आर्थिक लाभाचा अन् मेषसाठी खर्चाचा दिवस

राशीभविष्य - २६ नोव्हेंबर २०२० - मकरसाठी आर्थिक लाभाचा अन् मेषसाठी खर्चाचा दिवस

Next

मेष
शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या अस्वास्थ्याचा अनुभव येईल. सर्दी, खोकला, ताप इ. चा त्रास होईल. धर्मार्थ काम करताना दाम खर्च करावा लागेल. त्यामुळे खर्च वाढेल. मोहाच्या प्रलोभना पासून दूर राहणे योग्य ठरेल.  आणखी वाचा

वृषभ
आज आपली आवक आणि व्यापार यांत वाढ होईल. व्यापारात नवीन लाभदायक संपर्क वाढतील. कुटुंबीय व मित्रांसोबत हसण्या- खेळण्यात क्षण घालवण्याची संधी मिळेल. प्रवास- पर्यटनाचे योग आहेत.  आणखी वाचा

मिथुन
आज आपले प्रत्येक काम सुरळितपणे पार पडेल. घर, ऑफिस आणि सार्वजनिक ठिकाणी अनुकूल वातावरण राहिल्याने प्रसन्न वाटेल. मान- सन्मान वाढतील. वरिष्ठ अधिकार्‍यांच्या सहकार्यामुळे आपल्या प्रगतीचा मार्ग रुंदावेल. आणखी वाचा

कर्क
शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्या बरोबरच भाग्योदयाची संधी आपली प्रसन्नता वाढवेल. परदेशातून सुवार्ता येतील. धार्मिक कार्य, देवदर्शन, यात्राधाम यामुळे आनंदात भर पडेल. परिवारातील व्यक्तींबरोबर चांगल्या प्रकारे वेळ जाईल.  आणखी वाचा

सिंह
आजारपणामुळे दवाखान्याचा खर्च वाढेल. राग आणि बोलणे यांवर ताबा ठेवावा लागेल. घरातील सदस्यांशी मतभेद होतील. बाहेरच्या खाण्या- पिण्यामुळे तब्बेत बिघडेल. आपल्या मनात नकारात्मक विचारांचा प्रभाव राहील. आणखी वाचा

कन्या
सामाजिक आणि सार्वजनिक क्षेत्रांत लाभाबरोबरच प्रसिद्धी पण मिळेल. स्त्री वर्गाकडून विशेष लाभ होईल. दांपत्यजीवनात परमोच्च सुखाचे क्षण अनुभवाल. नव्या वस्त्रालंकाराची खरेदी कराल आणि ते वापरण्याची संधी मिळेल.  आणखी वाचा

तूळ
वाणीवर ताबा ठेवाल तर अनेक समस्यांपासून बचाव होईल असे श्रीगणेश सांगतात. वाद-विवाद करताना जास्त खोलात जाऊ नका. अनावश्यक खर्चावर अंकुश ठेवा. समाधानाची भावना अनुभवाल.  आणखी वाचा

वृश्चिक
आपल्या घरगुती जीवनात शांतीचे व आनंदाचे वातावरण राहील. तसेच आरोग्य चांगले राहील. आजारी माणसाच्या प्रकृतीत सुधारणा होईल. कार्यालयात सहकारी लोकांचे सहकार्य पूर्णपणे मिळेल. मैत्रिणी भेटतील. आणखी वाचा

धनु
आज आपणात शारीरिक आणि मानसिक स्फूर्ती आणि उत्साह यांचा अभाव राहील. कुटुंबात क्लेश आणि कलहजन्य वातावरण राहील. त्यामुळे मनात उदासीनता राहील. निद्रानाशाचा त्रास होईल. आईची तब्बेत बिघडेल.  आणखी वाचा

मकर
आजचा पूर्ण दिवस सुखाचा जाईल. अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्याने आपण प्रत्येक काम व्यवस्थित पूर्ण करू शकाल. मन प्रसन्न राहील. व्यापार धंद्यात आर्थिक लाभ होतील. भागीदारीत फायदा होईल. आणखी वाचा

कुंभ
द्विधा मनःस्थिती मुळे निर्णय शक्तीचा अभाव जाणवेल. परिणामतः उलघाल होईल. तब्बेत पण साथ देणार नाही. वाणीवर ताबा राहणार नाही. त्यामुळे वादविवाद होतील आणि आपल्याच लोकांशी मतभेद होतील. आणखी वाचा

मीन
आज आपणाला आनंद, उत्साह आणि प्रसन्नतेचा अनुभव येईल. नवीन कार्यारंभ लाभदायक ठरेल. मित्र आणि घरचे लोक यांच्यासमवेत भोजनाचा आस्वाद घेण्याची संधी मिळेल. यात्रेचे योग आहेत. लक्ष्मीची कृपा होईल.  आणखी वाचा

Web Title: Today's horoscope - 26 November 2020

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.