आजचे राशीभविष्य - २७ जुलै २०२० - मकरसाठी आनंदाचा अन् कर्कसाठी चिंतेचा दिवस
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2020 06:59 AM2020-07-27T06:59:56+5:302020-07-27T07:03:55+5:30
कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...
मेष
वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने आजचा दिवस फारच चांगला आहे. जोडीदारासह एकत्र वेळ घालवाल आणि प्रेमसुखाचा अनुभव घ्याल. आर्थिक लाभ तसेच प्रवासाची शक्यता. आणखी वाचा
वृषभ
आजचा दिवस शुभफलदायी जाईल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. पूर्ण दिवस आनंद व उत्साहात जाईल. नियोजनाप्रमाणे सर्व कामे पार पडतील. आणखी वाचा
मिथुन
मानहानी होण्याची शक्यता आहे. संतती विषयक कामात खर्च करावा लागेल. पचनसंस्येचे विकार बळावतील. जोडीदाराच्या तब्बेतीची पण चिंता वाटेल. विद्यार्ध्यांसाठी फार चांगला दिवस. आणखी वाचा
कर्क
आज आनंद आणि उत्साह यांचा अभाव राहील. मन चिंतेने ग्रासलेले व अशांत राहील. घरात भांडणाचे वातावरण असेल. आप्तांबरोबर मतभेद होऊ शकतात. स्त्रियांबरोबर सुद्धा मतभेद व तणाव राहील. आणखी वाचा
सिंह
आपल्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. आज आरोग्य चांगले राहील. भाऊबंदाबरोबर आनंदात वेळ जाईल. त्यांच्याकडून फायदा होईल. एखादया सुंदर स्थळाला भेट देण्यास जाल. आणखी वाचा
कन्या
आजचा दिवस आपल्याला शुभफल देईल. आपल्या गोड बोलण्याने कोणाचेही मन जिंकू शकाल. कामे सफल होण्याची जास्त शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. त्यांच्यासोबत सुखात दिवस जाईल. आणखी वाचा
तूळ
आजचा दिवस शुभ फलदायी आहे. रचनात्मक आणि कलात्मक शक्तीची चमक दिसेल. शारीरिक तसेच मानसिक स्वास्थ्याची काळजी घ्या. सृजनात्मक कार्य हातून घडेल. खंबीर विचाराने काम पूर्ण कराल. आणखी वाचा
वृश्चिक
बोलण्यात कोणाचा अपसमज होऊ नये याकडे लक्ष द्या. शारीरिक कष्ट आणि मानसिक चिंता यामुळे त्रस्त व्हाल. हर्ष आनंदासाठी खर्च करावा लागेल. आणखी वाचा
धनु
आजचा दिवस आपणाला लाभदायक ठरेल. गृहस्थ जीवनाचा पूर्णतः आनंद घ्याल. मित्रांसमवेत रम्य ठिकाणी प्रवासाचा बेत आखाल. आणखी वाचा
मकर
आज व्यापारविषयक कामात आपणाला लाभ होईल. जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्ती इ. साठी दिवस चांगला आहे. सरकार, मित्र व संबंधितांकडून लाभ होईल. आणखी वाचा
कुंभ
आजचा दिवस संमिश्र फलदायी जाईल. शारीरिक अस्वास्थ्य जाणवेल. मानसिक स्वास्थ्य मात्र चांगले राहील. शरीरात स्फूर्ती कमी राहील त्यामुळे काम करण्यात उत्साह वाटणार नाही. आणखी वाचा
मीन
ईश्वरभक्ती आणी आध्यात्मिक गोष्टींवर लक्ष देवून दिवस घालवा. आज काही प्रमाणात प्रतिकूलतेचा सामना करावा लागेल. तब्बेतीकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. आणखी वाचा