आजचं राशीभविष्य- 27 जून 2021- दैनंदिन कामात अडथळे येतील; शत्रू, प्रतिस्पर्ध्यांमुळे त्रास होईल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2021 07:11 AM2021-06-27T07:11:27+5:302021-06-27T07:15:03+5:30

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

Todays horoscope 27 June 2021 | आजचं राशीभविष्य- 27 जून 2021- दैनंदिन कामात अडथळे येतील; शत्रू, प्रतिस्पर्ध्यांमुळे त्रास होईल

आजचं राशीभविष्य- 27 जून 2021- दैनंदिन कामात अडथळे येतील; शत्रू, प्रतिस्पर्ध्यांमुळे त्रास होईल

Next

मेष
श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस आपल्याला मिश्र फल देणारा असेल. कुटुंबियांबरोबर बसून महत्त्वपूर्ण चर्चा कराल. घराच्या सजावटीत बदल करण्याचा विचार मनात येईल. कार्यालयीन किंवा व्यापारी क्षेत्रातील अधिकार्‍याबरोबर महत्त्वपूर्ण चर्चा होईल. आणखी वाचा

वृषभ
श्रीगणेशजी सांगतात की नवीन कामांची प्रेरणा मिळेल आणि तुम्ही त्यांची सुरुवातही करु शकाल. एखादया धार्मिक स्थळाला भेट देऊन तुमची वृत्तीही धार्मिक बनेल. दूरच्या प्रवासाचे योग आहेत. दूरवरच्या मित्रांच्या शुभवार्ता समजतील. आणखी वाचा

मिथुन
आजचा दिवस प्रतिकूल आहे म्हणून आपण प्रत्येक दृष्टीने सावध राहा असे श्रीगणेशजी सांगतात. आज नवीन कामाची सुरुवात करू नका. क्रोधामुळे काही अनिष्ट होणार नाही याच्याकडे लक्ष द्या. आजार्‍याने नवीन इलाज सुरु करु नका. कामवृत्तीवर संयम ठेवा. आणखी वाचा

कर्क
श्रीगणेश सांगतात की आजचा पूर्ण दिवस आनंद, उत्साह आणि मनोरंजनात जाईल. भिन्न लिंगीय व्यक्ती भेटतील. आनंदाची साधने, वस्त्रे इ. खरेदी होईल. प्रणय विषयक यश मिळेल. स्वादिष्ट भोजन आणि वाहन सुखाचे योग आहेत. आणखी वाचा

सिंह
संमिश्र फलदायी दिवसाचे भाकित श्रीगणेश सांगतात. घरात शांतता नांदेल. नोकरीच्या ठिकाणी सहकार्‍यांचे सहकार्य कमी मिळेल. दैनिक कामात अडथळे येतील. शत्रू आणि प्रतिस्पर्ध्यांमुळे त्रास होईल. उच्च अधिकार्‍यांशी वाद टाळा. आणखी वाचा

कन्या
श्रीगणेश सांगतात की संततीमुळे चिंता राहील. मन विचलीत राहील. पोटाच्या तक्रारीमुळे यातना होतील. विद्यार्जनात अडथळे येतील. अचानक खर्च उद्भवतील. बोलताना बौद्धीक चर्चेपासून दूर राहा. आणखी वाचा

तूळ
आज मानसिक थकवा जाणवेल असे श्रीगणेश सांगतात. जास्त हळवे बनाल. मनात उठणार्‍या विचारतरंगांमुळे त्रास होईल. आई आणि स्त्री विषयक चिंता सतावेल. प्रवासासाठी प्रतिकूल दिवस. पाण्यापासून जपा. आणखी वाचा

वृश्चिक
श्रीगणेश वर्तवितात की आज दिवसभर आपण आनंदी राहाल. नवीन कार्याचा आरंभ कराल. सहकार्‍यांकडून सुख व आनंद मिळेल. मित्र व नातलगांची भेट होईल. कोणत्याही कामात आज यश मिळेल. आर्थिक फायदा व भाग्योदयाचे योग आहेत. आणखी वाचा

धनु
मध्यम फलदायी दिवसाची शक्यता श्रीगणेश सांगतात. नाहक खर्च होईल. मनात मरगळ असेल. कुटुंबीयांशी गैरसमज वाढतील त्यामुळे मनस्ताप होईल. कामात अपेक्षित यश मिळणार नाही. दविधा मनःस्थितिमुळे कोणताही निर्णय घेऊ शकणार नाही. आणखी वाचा

मकर
श्रीगणेशाच्या आशीर्वादाने आज आपले प्रत्येक काम सहजपणे पार पडेल. नोकरी- व्यवसायात आपली प्रतिष्ठा वाढेल. पदोन्नती मिळण्याचे योग आहेत. गृहस्थी जीवनात आनंदी वातावरण राहील. शारीरिक दुखापतीचे योग असल्याने सांभाळून राहा. आणखी वाचा

कुंभ
पैशाचे व्यवहार तसेच जमीन- जुमला अशा व्यवहारांमध्ये कोणाला जामीन राहू नका असे श्रीगणेश सुचवितात. मानसिक एकाग्रता राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल. तब्बेतीकडे लक्ष द्या. अयोग्य जागी गुंतवणूक होणार नाही याची काळजी घ्या. आपल्या निर्णयात स्वकीय सहमत होणार नाहीत. आणखी वाचा

मीन
श्रीगणेशांच्या मते आज आपण कौटुंबिक आणि सामाजिक गोष्टींत भाग घ्याल. त्यांच्यासाठी खर्च करावा लागेल. एखाद्या रम्य स्थळी सहलीसाठी जाऊ शकाल. विवाहोत्सुकांना योग्य जोडीदार मिळण्याचे योग आहेत. आणखी वाच

Web Title: Todays horoscope 27 June 2021

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.