आजचे राशीभविष्य - 28 एप्रिल 2020

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 07:29 AM2020-04-28T07:29:55+5:302020-04-28T07:30:42+5:30

जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस

Todays horoscope 28 April 2020 kkg | आजचे राशीभविष्य - 28 एप्रिल 2020

आजचे राशीभविष्य - 28 एप्रिल 2020

Next

मेष - श्रीगणेश आपणाला नवीन कार्य करण्याची प्रेरणा देतील. तथापि विचारात स्थिरतेचा अभाव असल्यामुळे काही बाबींत त्रास होईल. नोकरी व्यवसायात स्पर्धात्मक वातावरण असेल. आणखी वाचा

वृषभ  - मनाची दोलायमान अवस्था महत्त्वाच्या संधीपासून आपणाला दूर ठेवेल असे श्रीगणेश सांगतात. आज नवे कार्य सुरू करणे उचित ठरणार नाही.आणखी वाचा

मिथुन - आजचा दिवस उत्साह आणि स्फूर्तीदायक आहे. स्वादिष्ट भोजन, सुंदर वस्त्रालंकार तसेच मित्र आणि आप्तयांचा सहवास यामुळे दिवस खूप आनंदात जाईल. आणखी वाचा

कर्क - परिवारात मतभेदाचे प्रसंग येतील. त्यामुळे मानसिक दृष्ट्या अस्वस्थ राहाल. द्विधा मनःस्थिती राहील. त्यामुळे महत्त्वाचे निर्णय लांबणीवर टाका. कोणाशी गैरसमज किंवा वादविवाद होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा

सिंह - नश्रीगणेश सांगतात की आजचा दिवस आपणासाठी लाभदायक ठरेल, पण मनाची दोलायमान अवस्था हाती आलेली संधी गमावू देणार नाही याची दक्षता घ्या. स्त्री वर्गाशी मुलाकात होईल व ती लाभदायक ठरेल. आणखी वाचा

कन्या- श्रीगणेश कृपेने नवीन कार्याची सुरुवात करण्या विषयी मनात आखलेल्या योजना साकार होतील. पित्या बद्दल आत्मीयता वाढेल. त्यांच्याकडून लाभ होईल. व्यापारी तथा नोकरदार आपल्या क्षेत्रांत पुढे जात राहतील. आणखी वाचा

तूळ- बुद्धिवादी आणि साहित्य प्रेमी यांच्या सहवासात ज्ञानाच्या चर्चेत वेळ घालवाल. नवीन कामे हाती घ्याल. दूरचे प्रवास किंवा तीर्थस्थानाला भेट द्याल.आणखी वाचा

वृश्चिक- श्रीगणेश सांगतात की उक्ती आणि कृती यांवर आज संयम ठेवा. दैनंदिन कामे वगळता इतर कामे हाती घेऊ नका. आजारी पडण्याचा संभव आहे. खाणे- पिणे सांभाळा. अचानक धनलाभ होईल. आणखी वाचा

धनु- श्रीगणेश म्हणतात की पार्टी, पिकनिक, प्रवास, रुचकर भोजन, सुंदर वस्त्र धारणा ही आजच्या दिवसाची विशेषता आहे. मनोरंजन विश्वात रमून जाल. भिन्न लिंगीय व्यक्तीशी रोमांचक मुलाकात होईल. आणखी वाचा

मकर - आजचा दिवस व्यापार धंद्यातील प्रगती आणि आर्थिक नियोजन यासाठी अनुकूल असल्याचे श्रीगणेश सांगतात. वसुली तसेच पैशांच्या देवाण- घेवाणीत यश मिळेल. आणखी वाचा

कुंभ - मानसिक अशांतता आणि उद्विग्नता यांनी भरलेला दिवस आहे. सातत्याने विचार बदलत राहतील त्यामुळे निर्णायकता असणार नाही. ठोस निर्णय घेऊ शकणार नाही. संततीचे प्रश्न बेचैन करतील. आणखी वाचा

मीन - आजचा दिवस दक्षता बाळगण्याची सूचना श्रीगणेश देत आहेत. कुटुंबीयांशी मतभेद होतील. आईची तब्येत हा चिंतेचा विषय होईल. तब्येत बिघडण्याची शक्यता आहे. आणखी वाचा

Web Title: Todays horoscope 28 April 2020 kkg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.