आजचे राशीभविष्य - २८ मे २०२० - मेषसाठी काळजीचा, कन्येसाठी आनंदाचा दिवस
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2020 06:55 AM2020-05-28T06:55:24+5:302020-05-28T08:12:27+5:30
कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...
मेष
आज आपणाला अतिशय संवेदनशीलता जाणवेल असे श्रीगणेश सांगतात. त्यामुळे कोणाकडून आपल्या भावना दुखावल्या जाण्याचे प्रसंग येतील. आज आईच्या तब्बेतीची काळजी लागेल. आणखी वाचा
वृषभ
आज आपण जास्त संवेदनशील आणि भावूक विचार मनात आणाल आणि त्यामुळे मन द्रवेल. आपली आणि इतरांविषयीची काळजी दूर होईल. त्यामुळे मनाला दिलासा मिळेल. आणखी वाचा
मिथुन
नातलग आणि मित्रांसोबत संवाद साधल्याने आज आनंदी राहाल. असे श्रीगणेश सांगतात. आर्थिक नियोजनात काही अडचणी येतील. पण नंतर सहजपणे ते काम पार पाडाल. आणखी वाचा
कर्क
आज आपल्या मनात प्रेम भावनेचे तरंग उमटतील. त्याच मूड मध्ये राहाल. मित्र, स्वकीय आणि संबंधितांकडून भेट वस्तू मिळतील. त्यांच्यासमवेत आपण आपला दिवस खुशीत घालवाल. आणखी वाचा
सिंह
आज मनात भावनांचा कल्लोळ उठेल. त्यामुळे हातून काही अनैतिक कृत्य घडणार नाही याची दक्षता घ्या. स्त्रियांच्या बाबतीत विशेष दक्ष राहा. आणखी वाचा
कन्या
आपणांसाठी घर, कुटुंबीय, व्यापार अशी सर्व क्षेत्रे लाभ देण्यासाठी तयार आहेत. मित्रांसोबत आनंददायी प्रवास घडेल. दांपत्यजीवनात जादा जवळीक निर्माण होईल. स्त्री वर्गाकडून विशेष लाभ होईल. आणखी वाचा
तूळ
आज आपणाला नोकरीत बढतीचे योग दिसतात. वरिष्ठांची आपणावर कृपादृष्टी राहील. कुटुंबात आनंदाचे वातावरण पसरेल. मनात भावनात्मकता वाढेल. मातुल घराण्याकडून फायदा होईल. आणखी वाचा
वृश्चिक
आजचा दिवस अनुकूलता आणि प्रतिकूलतेचा संमिश्र राहील. लेखन- साहित्य संबंधित काम कराल. व्यवसायात प्रतिकूल वातावरण. वरिष्ठ अधिकार्यांचा कल नकारात्मक राहील. आणखी वाचा
धनु
कामात यश मिळायला विलंब झाल्याने निराशा वाटेल. काम वेळेवर पूर्ण होणार नाही. कामाचा व्याप वाढेल. नवे काम हाती घेऊ नका. आणखी वाचा
मकर
व्यापार वाढीचे योग आहेत. त्याखेरीज दलाली, व्याज, कमिशन अशा विविध मार्गांनी पैसा मिळून धनभांडारात वाढ होईल. आणखी वाचा
कुंभ
सांप्रत काली आपणास कार्यात यश मिळेल व प्रसिद्धी पण मिळेल. स्वभावात जास्त हळुवारपणा राहील. माहेरहून अनेक शुभवार्ता येतील. घरात उत्साहाचे वातावरण राहील. आणखी वाचा
मीन
आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी चांगला आहे. अभ्यासात यश आणि प्रगतीच्या नवीन संधी उपलब्ध होतील. कल्पनाशक्तीच्या जोरावर साहित्यक्षेत्रात लेखनाचे नवे काम कराल.. आणखी वाचा