आजचे राशीभविष्य - 29 एप्रिल 2020
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 07:19 AM2020-04-29T07:19:02+5:302020-04-29T07:19:39+5:30
जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस
मेष - श्रीगणेश म्हणतात की, विचारांची अस्थिरता अडचणीत आणेल. नोकरी व्यवसायाच्या क्षेत्रात स्पर्धात्मक वातावरण राहील, ज्यातून बाहेर पडण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. आणखी वाचा
वृषभ - मनाची द्विधा अवस्था ठोस निर्णय घेऊ देणार नाही. त्यामुळे हाती आलेल्या संधीला मुकावे लागेल. फसव्या व्यवहारामुळे संघर्षात पडण्याचा संभव आहे. आणखी वाचा
मिथुन - आजचा दिवस लाभदायक जाईल अशी आशा करू शकता. सकाळपासूनच उत्साह आणि प्रसन्नता अनुभवाल. मित्र नातलग यांच्याबरोबर उत्तम जेवणाचा लाभ घ्याल. आणखी वाचा
कर्क - शरीर आणि मन अस्वस्थ राहील. मनाची साशंकता व द्विधा निर्णय घ्यायला अतिशय कठिण करून सोडेल. कुटुंबीया बरोबर मतभेद झाल्याने मन उदास होईल. आणखी वाचा
सिंह - श्रीगणेश म्हणतात की आज आपल्याला विविध प्रकारे लाभ होऊ शकतात. अशा वेळी थोडे गहाळ राहिलात तर लाभापासून वंचित राहाल, तिकडे लक्ष द्या. आणखी वाचा
कन्या- नवीन काम सुरू करायला निर्मित योजना अमलात आणायला आज उत्तम दिवस आहे. व्यापारात लाभ होईल. जुने येणे वसूल होईल. नोकरदारांची पदोन्नती संभवते. आणखी वाचा
तूळ- दूरचा प्रवास किंवा धार्मिक स्थळाला भेट द्याल. परदेशी प्रवासास अनुकूलता राहील. तरीही संतती आणि स्वास्थ्य या संबंधी चिंता लागून राहील. आणखी वाचा
वृश्चिक- श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस सावधानीपूर्वक व्यतीत करावा लागेल. नवे कार्य सुरू करू नका. क्रोध आणि अनैतिक आचरण तुम्हाला अडचणीत आणतील. आणखी वाचा
धनु- बौद्धिक, तार्किक, विचार- विनिमय आणि लेखन कार्य या साठी शुभ दिवस आहे. भागीदारीत फायदा होईल. जीवनसाथी बरोबरचे संबंध धनिष्ठ बनतील. आणखी वाचा
मकर - श्रीगणेशांच्या कृपेने व्यापार धंद्यात वाढ होईल. आर्थिक दृष्ट्या लाभदायक दिवस असल्यामुळे पैशाच्या देवाण घेवाणीत सरळपणा राहील. कुटुंबात सुख शांती नांदेल. आणखी वाचा
कुंभ - आज तुम्ही संतती व स्वतःचे स्वास्थ्य या संबंधी चिंतीत राहाल. अपचन, पोटाचे दुखणे याचा त्रास होईल. विचारात वेगाने बदल होऊन मानसिक अस्थिरता जाणवेल. आणखी वाचा
मीन - शारीरिक व मानसिक भय वाटेल. कुटुंबियांबरोबर वाद-विवाद होईल. आईचे स्वास्थ्य खराब राहील. नको त्या घटनामुळे तुमचा उत्साह कमी होईल. निद्रानाशाने त्रस्त व्हाल. आणखी वाचा