आजचे राशीभविष्य - 29 ऑगस्ट 2021 - धनुसाठी आर्थिक लाभाचा तर कर्कसाठी चिंतेचा दिवस

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2021 07:23 AM2021-08-29T07:23:49+5:302021-08-29T07:47:19+5:30

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

Today's horoscope - 29 August 2021 | आजचे राशीभविष्य - 29 ऑगस्ट 2021 - धनुसाठी आर्थिक लाभाचा तर कर्कसाठी चिंतेचा दिवस

आजचे राशीभविष्य - 29 ऑगस्ट 2021 - धनुसाठी आर्थिक लाभाचा तर कर्कसाठी चिंतेचा दिवस

Next

मेष
शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य हा उत्साह द्विगुणित करेल. स्नेही, मित्रपरिवार आणि स्वकीय यांच्यासमवेत स्नेहसंमेलन, समारंभाला जाणे होईल. दुपारनंतर मात्र काही कारणास्तव आपल्या तब्बेतीची तक्रार राहील. आणखी वाचा

वृषभ
कुटुंबातील व्यक्तींसमवेत आपण सल्ला- मसलत कराल. गृहसजावट आणि इतर बाबींमध्ये बदल करण्यात आवड निर्माण होईल. आईशी मनमोकळेपणा वाढेल तसेच कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी संबंध सुधारतील. आणखी वाचा

मिथुन
कौटुंबिक आणि व्यावसायिक क्षेत्रांमध्ये आजचा दिवस फार चांगला जाईल. दोन्ही ठिकाणी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होऊन निर्णयाप्रत स्थिति येईल.  आणखी वाचा

कर्क
आजचा दिवस न्यायपूर्वक राहील. नियोजित कार्य करण्याची प्रेरणा मिळेल. प्रयत्नांती असा अनुभव येईल की केलेले प्रयत्न व्यर्थ गेलेत. तब्बेत बिघडू शकते. संताप वाढेल. आणखी वाचा

सिंह
आज दिवसाच्या प्रारंभी शारीरिक आणि मानसिकदृष्टया बेचैन आणि व्यग्र राहाल. संताप वाढल्याने इतरांशी मतभेद होतील. दुपारनंतर शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य लाभेल. आणखी वाचा

कन्या
आज नवीन कार्यारंभ किंवा प्रवास करू नका असा सल्ला श्रीगणेश देतात. प्रेम आणि तिरस्काराच्या राग, द्वेष इ. भावना सोडून समानतेने काम करण्याचा आजचा दिवस आहे. आणखी वाचा

तूळ
जहाल विचार आणि अधिकाराची भावना मनात राहील. आर्थिक लाभ तसेच प्रवासाची शक्यता. पण दुपारनंतर, सायंकाळी अनर्थ होऊ नये यासाठी वाणीवर संयम ठेवा. आणखी वाचा

वृश्चिक
जवळचा प्रवास घडेल. धन विषयक आराखडा बनविण्यासाठी वेळ शुभ आहे. दुपारी वा सायंकाळ नंतर मित्र आणि संबंधितांसह प्रवासाचे नियोजन कराल. खाण्या-पिण्याचा आस्वाद घ्याल. आणखी वाचा

धनु
 खूप परिश्रमानंतर कामात यश मिळेल तरी निराश होऊ नका. सहल प्रवास शक्यतो टाळा. दुपारनंतर अनुकूल वातावरण. शरीरात उत्साह संचारेल. आर्थिक लाभाच्या दृष्टीने अनुकूल काळ.  आणखी वाचा

मकर
भावना दुखावल्या जातील. वाहन चालवताना दक्ष राहा. संकटात टाकणारे विचार, व्यवहार आणि नियोजनापासून दूर राहा. कोणत्याही गोष्टीत घाईने निर्णय घेऊ नका. कुटुंबीयांशी परस्परांत मतभेद वाढणार नाहीत याकडे लक्ष द्या. आणखी वाचा

कुंभ
नवीन कार्यारंभासाठी आज दिवसाच्या सुरुवातीचा वेळ खूप अनुकूल आहे. दुपारनंतर मानसिक व्यग्रता वाढेल. संपत्ती विषयक दस्तऐवज करण्यास वेळ अनुकूल नाही. आणखी वाचा

मीन
घर, कुटुंब आणि कामाच्या ठिकाणी आपणांस वातावरण अनुकूल राहील. जिभेवर संयम ठेवून आपण वादविवाद किंवा मनस्ताप टाळू शकाल. परिस्थिति सुधारणा होईल. आणखी वाच

Web Title: Today's horoscope - 29 August 2021

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.