आजचे राशीभविष्य - २९ मे २०२० - कन्येसाठी लाभ अन् मिथुनसाठी अनाठायी खर्च होण्याचा दिवस
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2020 06:36 AM2020-05-29T06:36:36+5:302020-05-29T06:45:48+5:30
कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...
मेष
कुटुंबातील व्यक्तींशी तीव्र मतभेद झाल्याने मन उद्विग्न राहील. छातीत दुखणे किंवा अन्य आजार यामुळे चिंताग्रस्त राहाल. निरर्थक आर्थिक खर्च होणार नाहीत याची काळजी घ्या. आणखी वाचा
वृषभ
आज आपणांस प्रत्येक कामात यश मिळेल. विरोधकावर मात कराल. सामाजिक क्षेत्रात मान-सम्मान मिळेल. परंतु दुपारनंतर संघर्षाचे वातावरण निर्माण होईल. आणखी वाचा
मिथुन
आज सकाळी आपले मन संतापी राहील. शारीरिक व मानसिक ताणतणाव राहील. अनाठायी खर्च होईल. विद्यार्थी वर्गाला अपेक्षित यश मिळणार नाही. आणखी वाचा
कर्क
आज आपण अधिक संवेदनशील बनाल. आज शारीरिक व मानसिक सुख चांगले मिळेल. मित्र व स्नेही यांच्या भेटीमुळे सुख वाटेल. दुपारनंतर मात्र कुटुंबातील व्यक्तींशी चर्चेत कटुता येईल. आणखी वाचा
सिंह
आज आपण उक्ती आणि कृतींवर पूर्ण संयम ठेवा. संबंधितांचे मन दुखावण्याचे प्रसंग घडू शकतील. अपेक्षेपेक्षा खर्च अधिक होईल. मानसिक चिंतांचा त्याग करा. तब्बेतीकडे लक्ष द्या. आणखी वाचा
कन्या
आज आपणांस विविध माध्यमांतून लाभ होण्याची शक्यता आहे. व्यवसाय क्षेत्रात फायदा होईल. सहकार्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. मित्रांसाठी केलेला खर्च फायदेशीर ठरेल. सहल प्रवासाचे योग. आणखी वाचा
तूळ
आजचा दिवस आपणांस खूप शुभ आहे. धार्मिक कार्य आणि देवदर्शनाचा लाभ होईल. विविध क्षेत्रांत लाभ होण्याची शक्यता आहे. वरिष्ठांकडून कामास प्रोत्साहन मिळेल. बढतीचे योग आहेत. आणखी वाचा
वृश्चिक
आजचा दिवस आपणांस खूपच शुभ आहे. धार्मिक यात्रा आणि देवदर्शनाचा लाभ होईल. विविध स्तरांवर लाभ होण्याची शक्यता आहे. परदेश गमनाच्या संधी उपलब्ध होतील. आणखी वाचा
धनु
कोणतेही नवीन कार्य आज सुरू न करण्याचा सल्ला. मनात निराशा व मरगळ निर्माण होईल. कुटुंबीयांशी वादविवाद करू नका. दुपारनंतर शारीरिक आणि मानसिक स्थिति सुधारेल. आणखी वाचा
मकर
आजचा दिवस आप्तेष्टांसोबत खूप आनंदात घालवाल असे गणेशजी सांगतात. मनोरंजना मुळे मन आनंदाने भरून जाईल. बागीदारीत फायदा होईल. आणखी वाचा
कुंभ
आजचा दिवस पूर्णतः शुभ फलदायी असेल. धंदा- व्यावसायिकांना दिवस अनुकूल राहील. शारीरिक आणि मानसिक दृष्टया आराम वाटेल. आणखी वाचा
मीन
अस्वास्थ्य आणि उद्वेगाचा मनावर पगडा असेल. काही कारणास्तव अचानक खर्च करावा लागेल. तब्बेतीच्याही तक्रारी राहतील. दुपारनंतर मात्र घरात आनंद आणि शान्तता पसरेल. आणखी वाचा