आजचे राशीभविष्य- 02 मार्च 2020
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2020 07:02 AM2020-03-02T07:02:25+5:302020-03-02T08:56:56+5:30
कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...
मेष - आज शरीर व मनाचे स्वास्थ्य साधारण राहील. खर्चाच्या काळजीमुळे मन अशांत राहील. वाणीवर संयम ठेवणे आवश्यक आहे. आणखी वाचा
वृषभ - शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. श्रीगणेशाचे सांगणे आहे की उत्साह आणि चौकसवृत्ती यामुळे कोणतेही काम उत्कृष्टपणे फत्ते करण्यात भाग घ्याल. आणखी वाचा
मिथुन - आजचा दिवस शारीरिक आणि मानसिक अस्वस्थ्यामुळे तणावपूर्वक राहील. शारीरिक त्रास, विशेषतः डोळ्यांचे विकार बळावतील. आणखी वाचा
कर्क - आजचा दिवस उत्साहात व आनंदात जाईल. व्यापारात लाभ होईल. आणि उत्पन्नाचे प्रवाह वाढतील. मित्रांशी चर्चा होईल. त्यामुळे आनंद मिळेल. आणखी वाचा
सिंह - खंबीर मन आणि दृढ निश्चय यामुळे प्रत्येक कार्यात सुयश मिळेल. व्यवसायात प्रगती होईल. बढतीची शक्यता आहे. पैतृक संपत्तीपासून लाभ होईल. आणखी वाचा
कन्या - आजचा दिवस फार शुभ आहे. धार्मिक कार्य आणि यात्रेच्या दृष्टीने अनुकूल काळ. मित्र आणि संबंधीतांशी होणार्या चर्चेमुळे आनंद मिळेल. आणखी वाचा
तूळ - वाणीवर संयम ठेवा असे सांगताना श्रीगणेश सूचित करतात की सरकार विरोधी कामे, राग आणि कामवासना यांपासून दूर राहा. आणखी वाचा
वृश्चिक - दैनंदिन कामाकडे दुर्लक्ष करून आनंदात मशगूल राहाल असे श्रीगणेशांना वाटते. पर्यटनस्थळ किंवा मनोरंजनाच्या ठिकाणी जाल. आणखी वाचा
धनु - श्रीगणेशांना वाटते की आजचा दिवस हर्षोल्हासात जाईल. परिवारात आनंदी वातावरण पसरेल. त्यामुळे मन आनंदी राहील. आणखी वाचा
मकर - निर्णयाच्या अभावामुळे मन चिंताक्रांत राहील. तब्येतीच्या बाबतीतही चिंता राहील. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांच्या नाराजीला तोंड द्यावे लागेल. आणखी वाचा
कुंभ - आज मन संवेदनशील राहील्याने मानसिक अस्वास्थ्य असेल. विद्यार्जन करणार्यांना विद्याप्राप्ती, यश मिळेल. आज ठरवलेली सर्व कामे व्यवस्थित पार पडतील. आणखी वाचा
मीन - महत्वाचे निर्णय घ्यायला आजचा दिवस अत्त्युत्तम आहे. सृजनशक्ती वाढेल. वैचारिक खंबीरपणा आणि मानसिक स्थिरता यांमुळे कामात सहज यश मिळेल. आणखी वाचा