आजचे राशीभविष्य - 3 नोव्हेंबर 2021 - कुंभसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2021 07:13 AM2021-11-03T07:13:53+5:302021-11-03T07:18:08+5:30

Today's horoscope : कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

Today's horoscope - 3 November 2021 | आजचे राशीभविष्य - 3 नोव्हेंबर 2021 - कुंभसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस

आजचे राशीभविष्य - 3 नोव्हेंबर 2021 - कुंभसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस

Next

मेष
आर्थिक लाभ होईल. दीर्घकालीन आर्थिक नियोजन कराल. शरीर व मन स्वस्थ राहील. मित्र आणि कुटुंबीयां समवेत दिवस आनंदात घालवाल. जास्त लोकांच्या संपर्कात याल. आणखी वाचा

वृषभ
विचारांचा मोठेपणा आणि वाणीची करामत इतरांना प्रभावित व मंत्रमुग्ध करील. इतरांशी सौहार्दाचे संबंध राहतील. बौद्धिक चर्चा, वादविवाद यात यशस्वी व्हाल. वाचन- लेखनात रस घ्याल. आणखी वाचा

मिथुन
आई आणि स्त्रियांच्या बाबतीत संवेदनशील बनाल. विचारांची भाऊगर्दी मानसिक थकवा निर्माण करेल. निद्रानाश झाल्याने तब्बेत बिघडेल. आणखी वाचा

कर्क
कामात यश आणि नव्या कामाचा प्रारंभ यासाठी चांगला दिवस. मित्र आणि स्वकीयांशी भेट आपणाला आनंद देईल. जवळचे प्रवास होतील. भावंडांशी सलोखा राहील. आणखी वाचा

सिंह
दूरस्थ स्नेही आणि नातलग यांच्याशी पत्रव्यवहार लाभ देईल. कुटुंबात सुख शांती मिळेल. उत्तम भोजन मिळेल. आपले वाक्चातुर्य इतरांची मने जिंकेल. निर्धारित कामात यश मिळेल. आणखी वाचा

कन्या
वैचारिक समृद्धी आणि मोहक वाणी यामुळे लाभ होईल आणि सौहार्दपूर्ण संबंध वाढवून काम पूर्ण कराल. व्यवसायाच्या दृष्टीने लाभदायक दिवस. तब्बेत चांगली राहील आणि मनही प्रसन्न राहील. आणखी वाचा

तूळ
आपले बोलणे आणि व्यवहार यांवर संयम ठेवा. कुटुंबीय व इतरांशी उद्धटपणे बोलाचाली होण्याची शक्यता. परोपकाराचा बदला उपकारात मिळतो. उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल. द्विधा आणि अडचणी मनःशांती देणार नाहीत.  आणखी वाचा

वृश्चिक
आपल्या गृहस्थी जीवनात सुख- शांती निर्माण करील. पत्नी आणि मुलाकडून शुभवार्ता मिळतील. मंगलकार्ये होतील. विवाहयोग येतील. नोकरी धंद्यात संधी मिळून उत्पन्न वाढेल. आणखी वाचा

धनु
आज आर्थिक व व्यावसायिक नियोजन करण्यास दिवस शुभ आहे. कामे व्यवस्थित पूर्ण होतील. परोपकाराची भावना आज प्रबळ राहील. दिवस आनंदात जाईल. नोकरी व्यवसायात बढती व मानसन्मान मिळतील. आणखी वाचा

मकर
आजचा आपला दिवस संमिश्र फलदायी जाईल. व्यवसाय बौद्धिक कार्यांत नवी विचारधारा अमंलात आणाल. लेखन व साहित्य यात सृजनात्मकता प्रकट होईल. मनाच्या एखाद्या कोपर्‍यात मात्र अस्वस्थता जाणवेल.  आणखी वाचा

कुंभ
नकारात्मक विचारांनी मनात निराशा निर्माण होईल. मानसिक उद्वेग आणि रागाची भावना वाढेल. खर्च वाढेल. वाणीवर संयम न राहिल्याने कुटुंबात मतभेद व भांडण होण्याची शक्यता आहे. तब्बेत बिघडेल. आणखी वाचा

मीन
आजचा आपला दिवस सुख- शांतीत जाईल. व्यापारी वर्गाला भागीदारीसाठी उत्तम काळ. पत्नी- पती यांच्यात दांपत्यजीवनात जवळीक वाढेल. मित्र, स्वकीय यांच्याशी भेट होईल. आणखी वाच

Web Title: Today's horoscope - 3 November 2021

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.