आजचे राशीभविष्य - 30 ऑगस्ट 2020; 'या' राशीच्या लोकांना आज अचानक धनलाभ संभवतो
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2020 07:18 AM2020-08-30T07:18:53+5:302020-08-30T07:19:17+5:30
कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...
मेष - श्रीगणेश सांगतात की आज आपण आपल्या घरातील गोष्टींकडे अधिक लक्ष द्याल. घरातील सर्वांची बैठक घेऊन महत्त्वपूर्ण चर्चा कराल. आणखी वाचा.
वृषभ - परदेशस्त स्नेह्यांकडून तसेच मित्रवर्गाकडून आनंदाच्या बातम्या आपणांस आनंद देतील असे श्रीगणेश सांगतात. परदेशी जाण्यास इच्छुक असणार्यांना चांगली संधी आहे. आणखी वाचा.
मिथुन - निषेधार्ह विचारापासून दूर राहण्याची सूचना श्रीगणेश देतात. नवीन कार्य किंवा औषधोपचार आज सुरू करू नका. आणखी वाचा.
कर्क - समृद्ध जीवनशैली आणि मनोरंजक वृत्ती यामुळे आज आपण आनंदी राहाल असे श्रीगणेश सांगतात. व्यावसायिक क्षेत्रात लाभ होईल. आणखी वाचा.
सिंह - श्रीगणेशाच्या मते आजचा आपला दिवस मध्यम फलदायी राहील. कुटुंबातील व्यक्तींशी बोलताना वाणीवर संयम ठेवा. आणखी वाचा.
कन्या - आज आपणांस कोणत्याही प्रकारचे भांडण आणि चर्चा दूर राहण्याची सूचना श्रीगणेश देत आहेत. अचानक खर्च वाढतील. आणखी वाचा.
तूळ - आजचा दिवस आपल्यासाठी शुभ आहे असे श्रीगणेश सांगतात. मनात संवेदनशीलता जास्त प्रमाणात राहील. आणखी वाचा.
वृश्चिक - नवीन कार्याचा आरंभ करण्यास आजचा दिवस शुभ आहे असे श्रीगणेश सांगतात. दिवसभर मन आनंदी राहील. भावंडांबरोबर घराविषयी महत्त्वाच्या चर्चा कराल. आणखी वाचा.
धनु - श्रीगणेशांच्या मते आजचा दिवस आपणाला संमिश्र फलदायी जाईल. असामंजस्यामुळे निर्णयाप्रत जाणे अवघड जाईल. मन दुःखी राहील. आणखी वाचा.
मकर - सकाळची सुरुवात ईश्वराच्या नामस्मरणाने केल्याने मन प्रफुल्लित राहील. धार्मिकतेने पूजापाठही तुम्ही आज करू शकाल. वातावरण मंगलमय बनेल. आणखी वाचा.
कुंभ - आज मन आणि शरीर अस्वस्थ राहील. कुटुंबियाशी भांडण होऊ शकते. पैशाची देवाण घेवाण किंवा गुंतवणूक याकडे लक्ष द्या. आणखी वाचा.
मीन - आज अचानक धनलाभ संभवतो असे श्रीगणेश सांगतात. संततीकडून शुभ समाचार मिळतील. बालपणचे किंवा जुने मित्र भेटल्याने आनंदी असाल. आणखी वाचा.