राशीभविष्य - ३० ऑक्टोबर २०२० - धनुसाठी काळजीचा अन् मीनसाठी आनंदाचा दिवस

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2020 10:26 PM2020-10-29T22:26:03+5:302020-10-29T22:28:27+5:30

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

Today's horoscope - 30 october 2020 | राशीभविष्य - ३० ऑक्टोबर २०२० - धनुसाठी काळजीचा अन् मीनसाठी आनंदाचा दिवस

राशीभविष्य - ३० ऑक्टोबर २०२० - धनुसाठी काळजीचा अन् मीनसाठी आनंदाचा दिवस

Next

मेष
मनाची एकाग्रता कमी राहील्याने मन दुखी राहील. शारीरिक ताण जाणवेल. आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक आणि जपून करा. या गुंतवणुकीपासून फारसा लाभ होणार नाही. महत्वाच्या कागदपत्रांकडे अधिक लक्ष द्या. आणखी वाचा

वृषभ
व्यावहारिक कार्ये पूर्ण करण्याचा दृष्टिने शुभ दिवस आहे. मित्र आणि वडीलधार्‍यांच्या भेटी घ्याव्या लागतील. नवे मित्र मिळतील व ती मैत्री दीर्घकाल टिकून राहील. संततीच्या प्रगतीमुळे मनाला आनंद मिळेल.  आणखी वाचा

मिथुन
व्यापारी वर्गासाठी आजचा दिवस शुभ आहे असे गणेशजी सांगतात. व्यापारी लोकांना व्यवसायवृद्धी बरोबरच यश मिळेल व येणी वसूल होतील. वडील आणि वडीलधार्‍यांकडून लाभ होईल.  आणखी वाचा

कर्क
मानसिक तणाव आणि बेचैनीने दिवसाचा प्रारंभ होईल. शारीरिक दृष्टया आळस आणि मरगळ राहील. पोटाचा त्रास जाणवेल. कोणत्याही कार्यात दैवाची साथ मिळणार नाही. संततीविषयक चिंता वाढेल. आणखी वाचा

सिंह
आजचा दिवस मध्यमफलदायी जाईल. आचार विचारांवर संयम आणि अनैतिक गोष्टींपासून दूर राहण्याचा सल्ला श्रीगणेशजी देतात. मानसिक आणि शारीरिक कष्ट वाढतील. त्यामुळे स्वास्थ्य बिघडेल. आणखी वाचा

कन्या
व्यवसायक्षेत्रात भागीदारांना अनुकूल काळ करमणुकीमुळे दिवस आनंदात जाईल. व्यापारी वर्गाची येणी वसूल होतील. दुपारनंतर तब्बेत यथा- तथाच राहील. अचानक लाभाची शक्यता.  आणखी वाचा

तूळ
नवीन कार्यारंभास शुभ दिवस दूरचा प्रवास, धार्मिक स्थळांना भेटीचा आज योग आहे. व्यवसाय धंद्यात फायदा. परदेशातील मित्रांचे समाचार मिळतील. सहकार्यांचे सहकार्य मिळेल. आरोग्य सांभाळावे. संततीविषयी द्विधा मनःस्थिती राहील. आणखी वाचा

वृश्चिक
आज आपणाला साहित्यात रुची वाटेल. विद्यार्थ्यांना अनुकूल काळ. शेअर्स, लॉटरी यात लाभ होईल. खंबीर मन आणि आत्मविश्वास वाढेल. तब्बेतही चांगली राहील. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल.  आणखी वाचा

धनु
आईच्या तब्बेतीत बिघाड आणि घरातील गढूळ वातावरण यामुळे आपल्या स्वास्थ्यावर नकारात्मक परिणाम होणार नाही याकडे लक्ष द्या. त्यामुळे आपले स्वास्थ्य बिघडू शकते. आर्थीक नुकसान आणि बदनामी होईल. आणखी वाचा

मकर
वैवाहिक जीवन साथीदारांशी मधूर संबंध राहतील. मित्रांसमवेत सहलीचे नियोजन कराल. भावंडे आणि नातलगांशी चांगले संबंध राहतील. मान सम्मान वाढेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. आणखी वाचा

कुंभ
खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. तसेच संतापावर आणि जिभेवर ताबा ठेवावा लागेल. त्यामुळे कोणाशी कटुता येणार नाही व मनातून नकारात्मक विचार दूर होतील. दुपारनंतर विचारात स्थैर्य येईल.  आणखी वाचा

मीन
कुटुंबात आनंदी वातावरण राहील. कार्ये तडीस जातील. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष दया. नवीन कामे हाती घेण्यास दिवस शुभ आहे. दुपारनंतर संतापी वृत्ती वाढीस लागेल. त्यामुळे उक्ती आणि कृतीवर संयम ठेवा.  आणखी वाचा

Web Title: Today's horoscope - 30 october 2020

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.