आजचं राशीभविष्य- ३१ ऑक्टोबर २०२१; घरात सुख शांती नांदेल; प्रतिस्पर्ध्यांना चीतपट कराल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2021 07:24 AM2021-10-31T07:24:24+5:302021-10-31T07:26:45+5:30

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची रास...

Todays horoscope 31 October 2021 | आजचं राशीभविष्य- ३१ ऑक्टोबर २०२१; घरात सुख शांती नांदेल; प्रतिस्पर्ध्यांना चीतपट कराल

आजचं राशीभविष्य- ३१ ऑक्टोबर २०२१; घरात सुख शांती नांदेल; प्रतिस्पर्ध्यांना चीतपट कराल

Next

मेष - स्वभावातील तापटपणा आणि हट्टी वागण्यावर नियंत्रण ठेवा असा सल्ला श्रीगणेश देतात. कष्ट घेऊनही अपेक्षित यश न मिळाल्याने मन उदास होईल. शारीरिक कमजोरी जाणवेल. यात्रा- प्रवास यासाठी काळ योग्य नाही. आणखी वाचा 

वृषभ - आज आपल्या कार्यातील यशात दृढ मनोबल आणि खंबीर आत्मविश्वास यांची महत्त्वाची भूमिका राहील. वडील घराण्याकडून लाभ होईल. विद्यार्थिवर्गाची अभ्यासात गोडी लागेल. सरकारी कामात यश आणि फायदा मिळेल. आणखी वाचा 

मिथुन - दिवसाच्या प्रारंभी उत्साह आणि स्फूर्ती जाणवेल. भाग्योदयाच्या संधी येतील. झटपट बदलणारे विचार तुम्हाला अडचणीत टाकतील. नवीन कामे सुरू करू शकाल. मित्र, नातेवाईक आणि शेजारी- पाजारी यांच्याशी सलोख्याचे संबंध राहतील. आणखी वाचा 

कर्क - श्रीगणेश सांगतात की आज मनात निराशा असल्यामुळे खिन्नता अनुभवाल. कुटुंबातील व्यक्तींशी मतभेद व गैरसमज होतील. अहंपणामुळे इतर कोणाच्या भावना दुखवाल. विद्यार्थ्यांचे अभ्यासावर चित्त एकाग्र होणार नाही. धनखर्च वाढेल. आणखी वाचा 

सिंह - आत्मविश्वास आणि झटपट निर्णय घेऊन कामात आघाडीवर राहाल. समाजात मान- प्रतिष्ठा वाढेल. उक्ती आणि कृतीत उग्रपणा आणि कोणाशी अहंपणाने संघर्ष होण्याची शक्यता श्रीगणेश वर्तवितात. वडील आणि वडीलधार्‍यांकडून लाभ होईल. आणखी वाचा 

कन्या - शारीरिक आणि मानसिक चिंता बेचैन करतील असे श्रीगणेश सांगतात. एखाद्याशी तंटाबखेडा होण्यास आपला अहंभाव कारणीभूत ठरेल. अचानक धनखर्च होईल. दांपत्यजीवनात खटका उडेल. आणखी वाचा 

तूळ - गृहस्थी जीवनात सुख आणि आनंद मिळेल. उत्पन्न वाढीचा योग आहे. कामाच्या जागी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील. बढती मिळण्याचे संकेत आहेत. परिवारातील व्यक्ती आणि मित्रांच्या सहवासात खुश राहाल. आणखी वाचा 

वृश्चिक - श्रीगणेशाच्या कृपेने आपली सर्व कामे यशस्वी पूर्ण होताना अनुभवाल. संसारात आनंदात आणि समाधानात राहील. समाजात मान- प्रतिष्ठा मिळेल. तब्बेत चांगली राहील. वरिष्ठ अधिकारी आणि वडीलधारे यांची मर्जी राहील. आणखी वाचा 

धनु - आज कोणतीही धोकेदायक चाल आपणाला अडचणीत टाकेल. कोणतेही काम करण्यात जोश- उत्साह वाटणार नाही. शारीरिक आणि मानसिक व्यग्रता राहील. वेळ काळजीत जाईल. नोकरीधंद्यात त्रास जाणवेल. आणखी वाचा 

मकर - नकारात्मक विचारांपासून दूर राहा आणि खाण्या- पिण्याकडे चांगले लक्ष द्या असा सल्ला श्रीगणेश देत आहेत. अचानक खर्च वाढेल. औषधोपचारावर पैसा खर्च होईल. व्यापारात भागीदारांबरोबर अंतर्गत मतभेद वाढतील. क्रोध- आवेशावर नियंत्रण ठेवा. आणखी वाचा 

कुंभ - प्रणय, रोमान्स, प्रवास, पर्यटन, मनोरंजन आजच्या दिवसाचा भाग बनतील. मित्र व कुटुंबीयांसमवेत भोजनानिमित्त जाण्याचा योग येईल. उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्तीचे योग आहेत. भागीदारांशी चांगले संबंध राहतील. आणखी वाचा

मीन - दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील. घरात सुख शांती नांदेल. स्वभाव तापट राहील. उक्ती आणि कृती यात सांभाळून काम करण्याचा श्रीगणेश सल्ला देतात. प्रतिस्पर्ध्यांना चित कराल. आणखी वाचा 

Web Title: Todays horoscope 31 October 2021

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.