आजचे राशीभविष्य - 5 ऑगस्ट 2020; कर्क, सिंह राशींसाठी आज क्लेशाचा दिवस, सांभाळा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2020 07:31 AM2020-08-05T07:31:06+5:302020-08-05T07:32:01+5:30

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

Today's horoscope - 5 August 2020 | आजचे राशीभविष्य - 5 ऑगस्ट 2020; कर्क, सिंह राशींसाठी आज क्लेशाचा दिवस, सांभाळा

आजचे राशीभविष्य - 5 ऑगस्ट 2020; कर्क, सिंह राशींसाठी आज क्लेशाचा दिवस, सांभाळा

Next

मेष - आजचा आपला दिवस मित्र आणि सामाजिक कार्ये यांच्यामागे धावपळ करण्यात जाईल. पैसाही खर्च होईल. नवीन मित्रांच्या ओळखी होतील. आणखी वाचा.

वृषभ- आजचा दिवस शुभफले देणारा आहे असे श्रीगणेश सांगतात. विशेषतः धंदाव्यवसाय करण्यार्‍यांना आज फारच लाभदायक दिवस आहे. आणखी वाचा.

मिथुन - आपल्याला आज प्रतिकूल दिवस आहे असे श्रीगणेश सांगतात. मानसिक व्यग्रता, शारीरिक शिथिलता अनुभवास येईल. काम करायला उत्साह वाटणार नाही. आणखी वाचा.

कर्क - वैचारिक नकारात्मकता मनात असल्याने दिवसभर अस्वस्थ राहाल. म्हणून तो दूर ठेवा असे श्रीगणेश सांगतात. रागावर आज संयम ठेवावा लागेल. आणखी वाचा.

सिंह - आज पति-पत्नींचे एकमेकांशी पटणार नाही. बेबनाव होईल, त्यामुळे क्लेश होतील असे श्रीगणेश सुचवितात. दोधापैकी एकाचे स्वास्थ्य बिघडणार नाही याकडे लक्ष द्या. आणखी वाचा.

कन्या - व्यवसाय धंद्यात आज यश मिळण्याची शक्यता अधिक आहे. सहकार्‍यांचे सहकार्य वाढेल. कुटुंबातील वातावरण सुखाचे असेल. आणखी वाचा.

तूळ - तुमची वैचारिक आणि मधुर वाणी लोकांना प्रभावित करेल व तसेच त्यामुळे इतर व्यक्तींशी संबंध दृढ होतील. चर्चा- वादविवाद यात ही तुमचा प्रभाव राहील. आणखी वाचा.

वृश्चिक - मित्रपरिवाराशी सावधपणाने वागा असे श्रीगणेश सांगतात. शारीरिक व मानसिक अस्वस्थता राहील. मातेचे स्वास्थ्य बिघडू शकते. आणखी वाचा.

धनु - प्रतिस्पर्ध्यांवर तुम्ही मात कराल असे श्रीगणेश म्हणतात. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य आज चांगले राहील. नवीन कामाची सुरूवात करण्याला अनुकूल दिवस. आणखी वाचा.

मकर - श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस मिश्रफल देणारा आहे. कुटुंबातील लोकांबरोबर गैरसमजातून मतभेदाचे प्रसंग गडतील. व मन दुःखी होईल. आणखी वाचा.

कुंभ - श्रीगणेश म्हणतात की आजचा दिवस तुम्हाला आर्थिक दृष्ट्या लाभदायी आहे. परिवारात आनंदी वातावरण असेल. मित्र आणि कुटुंबीय यांच्याबरोबर आनंदात दिवस घालवाल. आणखी वाचा.

मीन - स्थावर संपत्ती व कोर्ट- कचेरी याच्या झंझट मध्ये आज पडू नका असा सल्ला आज श्रीगणेश तुम्हाला देत आहेत. मनाच्या एकाग्रतेमुळे सर्व कामात फायदा होईल. आणखी वाचा.

 

Web Title: Today's horoscope - 5 August 2020

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.