आजचे राशीभविष्य - 6 एप्रिल 2020
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2020 07:01 AM2020-04-06T07:01:27+5:302020-04-06T07:02:09+5:30
कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...
मेष
काल्पनिक जगातून सहल करताना नवनवीन गोष्टींचा अनुभव घ्याल. साहित्य आणि कलेच्या क्षेत्रात तुम्ही नवनिर्मिती दाखवाल, विद्यार्थी अभ्यासात चमकतील. आणखी वाचा
वृषभ
आज आपण वाणी आणि वर्तन यावर संयम ठेवण्याची आवश्यकता आहे. जलाशयापासून दूर रहा. जमीन आणि संपत्ति यांच्या कागद-पत्रांवर सही करताना काळजी घ्या. आणखी वाचा
मिथुन
आजचा दिवस सुखा- समाधानात जाईल. भावंडांशी ताळमेळ साधल्याने आपला फायदा होईल. स्वजन व मित्र भेटतील. दुपारनंतर मात्र मनात नकारात्मक विचारांची गर्दी होऊन मन काळवंडेल. आणखी वाचा
कर्क
लाभ देण्यासाठी आजचा दिवस आहे. घरातील सर्वांचे सहकार्य मिळेल. बोलण्याच्या सुंदर शैलीमुळे आपली कामे सहज पार पडतील. आणखी वाचा
सिंह
आज आपली कार्य पद्धती खंबीर मनोबलपूर्ण राहील. मोठया लोकांकडून लाभ होतील. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे राहील. आणखी वाचा
कन्या
भावनेच्या भरात मन वाहू देऊ नका. गैरसमज दूर करणे आवश्यक आहे. कोणाशी उग्र वाद किंवा भांडण टाळा. कुटुंबातील व्यक्तींशी मतभेद टाळा. उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल. आणखी वाचा
तूळ
आज नवे कार्य हाती घेऊ नका. वैचारिक पातळीवर मन अडकून पडेल आणि मनाची खंबीरता कमी होईल. मित्रांकडून विशेष लाभ होतील. व्यापारात नफा संभवतो. आणखी वाचा
वृश्चिक
व्यावसायिक क्षेत्रात आपल्या कामाची खूप प्रशंसा होईल. कामे सहजगत्या पूर्ण होतील. स्थावर संपत्तीच्या व्यवहारासाठी दिवस अनुकूल आहे. सरकारी कामकाजात लाभ होईल. आणखी वाचा
धनु
आज स्वाभावात उग्रपणा आणि तब्बेत कमजोर राहील. धार्मिक यात्रा किंवा प्रवासाची शक्यता. व्यवसायात अडथळा किंवा विवाद होण्याची शक्यता. दुपारनंतर मात्र कामाच्या ठिकाणी वातावरण बदलेल. आणखी वाचा
मकर
आजारपणावर खर्च करावा लागेल. अचानक धन खर्चाची शक्यता. घरातील सदस्यांबरोबर खडाजंगी होणार नाही याचे भान ठेवा. शक्यतो बाहेरचे खाणे पिणे टाळा. आणखी वाचा
कुंभ
आज व्यापारी आणि भागीदार यांच्याबरोबर जपून काम करा. वैवाहिक जीवनात दुःखद प्रसंग अनुभवाल. विद्यार्थ्यांची प्रगती होईल. घरातील वातावरण शांततापूर्ण राहील. दैनंदिन कामात अडचणी येतील. आणखी वाचा
मीन
आजचा आपला दिवस मध्यम फलदायी आहे. कुटुंबातील व्यक्तींशी सुसंवाद राहील. दैनंदिन कामास विलंब होईल. सहकार्यांचे सहकार्य अल्प प्रमाणात मिळेल. आणखी वाचा