आजचे राशीभविष्य - ६ डिसेंबर २०२० - मेषसाठी चिंतेचा अन् मकरसाठी आनंदाचा दिवस

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2020 10:02 PM2020-12-05T22:02:01+5:302020-12-05T22:02:41+5:30

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

Today's horoscope - 6 December 2020 | आजचे राशीभविष्य - ६ डिसेंबर २०२० - मेषसाठी चिंतेचा अन् मकरसाठी आनंदाचा दिवस

आजचे राशीभविष्य - ६ डिसेंबर २०२० - मेषसाठी चिंतेचा अन् मकरसाठी आनंदाचा दिवस

Next

मेष
कुटुंबातील व्यक्तींशी तीव्र मतभेद झाल्याने मन उद्विग्न राहील असे गणेशजींचे सांगणे आहे. छातीत दुखणे किंवा अन्य आजार यामुळे चिंताग्रस्त राहाल. निरर्थक आर्थिक खर्च होणार नाहीत याची काळजी घ्या, तरीही मन अस्वस्थ राहील.  आणखी वाचा

वृषभ
आज आपणांस प्रत्येक कामात यश मिळेल. विरोधकावर मात कराल. सामाजिक क्षेत्रात मान-सम्मान मिळेल. परंतु दुपारनंतर संघर्षाचे वातावरण निर्माण होईल. आपली तरतरी आणि प्रेरणा निराशेत बदलेल. आणखी वाचा

मिथुन
शारीरिक व मानसिक ताणतणाव राहील. अनाठायी खर्च होईल. विद्यार्थी वर्गाला अपेक्षित यश मिळणार नाही. दुपारनंतर मात्र मित्र आणि स्नेही यांच्या भेटीमुळे मन प्रसन्न होईल. अर्थप्राप्ती चांगली होईल. आणखी वाचा

कर्क
आज आपण अधिक संवेदनशील बनाल. आज शारीरिक व मानसिक सुख चांगले मिळेल. मित्र व स्नेही यांच्या भेटीमुळे सुख वाटेल. दुपारनंतर मात्र कुटुंबातील व्यक्तींशी चर्चेत कटुता येईल. आणखी वाचा

सिंह
आज आपण उक्ती आणि कृतींवर पूर्ण संयम ठेवा असे गणेशजी सांगतात. संबंधितांचे मन दुखावण्याचे प्रसंग घडू शकतील. अपेक्षेपेक्षा खर्च अधिक होईल. मानसिक चिंतांचा त्याग करा. तब्बेतीकडे लक्ष द्या. दुपारनंतर वातावरण अनुकूल राहील. आणखी वाचा

कन्या
आज आपणांस विविध माध्यमांतून लाभ होण्याची शक्यता आहे असे गणेशजी सांगतात. व्यवसाय क्षेत्रात फायदा होईल. सहकार्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. मित्रांसाठी केलेला खर्च फायदेशीर ठरेल. सहल प्रवासाचे योग. परंतु दुपारनंतर मनात अनिश्चितता राहील.  आणखी वाचा

तूळ
क्रोधावर नियंत्रण ठेवा. शक्यतो वाद टाळावेत. घरातील व्यक्तींशी एखाद्या विषयावर वादविवाद होतील. तब्बेत बिघडेल. विशेषतः डोळ्यांची निगा राखा. आणखी वाचा

वृश्चिक
आजचा दिवस आपणांस खूपच शुभ आहे. धार्मिक यात्रा आणि देवदर्शनाचा लाभ होईल. विविध स्तरांवर लाभ होण्याची शक्यता आहे. परदेश गमनाच्या संधी उपलब्ध होतील. वरिष्ठ अधिकारी आपल्या कामावर खुश होतील आणि आपणांस प्रोत्साहन देतील.  आणखी वाचा

धनु
कोणतेही नवीन कार्य आज सुरू न करण्याचा सल्ला गणेशजी देत आहेत. मनात निराशा व मरगळ निर्माण होईल. कुटुंबीयांशी वादविवाद करू नका. दुपारनंतर शारीरिक आणि मानसिक स्थिति सुधारेल. आणखी वाचा

मकर
आजचा दिवस आप्तेष्टांसोबत खूप आनंदात घालवाल असे गणेशजी सांगतात. मनोरंजना मुळे मन आनंदाने भरून जाईल. बागीदारीत फायदा होईल. प्रवासाच्या मधुर स्मृती मनात येतील. व्यापारी क्षेत्रात लाभ होईल.  आणखी वाचा

कुंभ
आजचा दिवस पूर्णतः शुभ फलदायी असेल असे गणेशजी सांगतात. धंदा- व्यावसायिकांना दिवस अनुकूल राहील. आणखी वाचा

मीन
अस्वास्थ्य आणि उद्वेगाचा मनावर पगडा असेल. काही कारणास्तव अचानक खर्च करावा लागेल. तब्बेतीच्याही तक्रारी राहतील. दुपारनंतर मात्र घरात आनंद आणि शांतता पसरेल. आणखी वाचा

Web Title: Today's horoscope - 6 December 2020

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.