आजचे राशीभविष्य - ६ जून २०२० - सिंहसाठी चिंतेचा, मिथुनसाठी आनंदाचा दिवस

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2020 06:39 AM2020-06-06T06:39:30+5:302020-06-06T07:42:01+5:30

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

Today's horoscope - 6 June 2020 | आजचे राशीभविष्य - ६ जून २०२० - सिंहसाठी चिंतेचा, मिथुनसाठी आनंदाचा दिवस

आजचे राशीभविष्य - ६ जून २०२० - सिंहसाठी चिंतेचा, मिथुनसाठी आनंदाचा दिवस

Next

मेष
गूढ विद्या तसेच रहस्यमय विषय समजून घेण्याचा आज प्रयत्न करा. उक्ती आणि कृतीवर संयम ठेवा, तेच आपल्या फायदयाचे आहे. दुपारनंतर नवीन कार्यारंभ करू शकता. प्रकृतीकडे लक्ष द्या. आणखी वाचा

वृषभ
दिवसाची सुरुवात आनंदाने व मित्रभेटीने होईल. नवीन माणसे भेटतील. सहलींचे आयोजन होऊ शकते. परंतु दुपारनंतर सावध राहण्याचा सल्ला. भाषेचा दुरुपयोग करू नका नाहीतर वादविवाद होतील. आणखी वाचा

मिथुन
आजचा दिवस मनोरंजनातून आनंद घेण्याचा आहे. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. कार्यालयात सहकार्याचे वातावरण असेल. आणखी वाचा

कर्क
प्रतिकूलतेतून कष्टाने काम कराल तर पुढे रहाल. पोटाच्या तक्रारी निर्माण होतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. परंतु दुपारनंतर परिस्थिती अनुकूल बनेल. स्वास्थ्य सुधारेल.  आणखी वाचा

सिंह
मानसिक स्थिती तणावपूर्ण राहील व शारीरिकदृष्टया अस्वस्थता जाणवेल. कुटुंबियांशी एखादा खटका उडू शकतो म्हणून संयम ठेवण्याचा सल्ला. धन व कीर्ती यांची हानी संभवते मुलांबद्दल चिंतित रहाल.  आणखी वाचा

कन्या
आपल्याला भाग्यवृद्धि आणि लाभाचा योग. आप्तांकडून फायदा. आपसातील संबंधात प्रेम आणि सन्मानाचे वातावरण असेल. परंतु दुपारनंतर चिंतीत रहाल त्याचा शरीर व मनाच्या स्वास्थ्य वर परिणाम होऊ शकतो. आणखी वाचा

तूळ
शारीरिक व मानसिक स्वास्थ्य बिघडू शकते. कौटुंबिक वादात बोलण्यावर संयम ठेवा. नकारात्मक मानसिकता सोडून द्या. घरच्या सदस्याना चिंता होणार नाही याकडे लक्ष द्या. आणखी वाचा

वृश्चिक
आजचा आपला मध्यम दिवस आहे. सुख व समाधान अनुभवाल. कुटुंबियासमवेत आनंदात वेळ घालवाल. शुभ समाचार येतील..  आणखी वाचा

धनु
आनंद व सुख यासाठी अधिक खर्च होईल. स्वभाव तापत बनेल. संबंधितांशी मनाविरुद्ध घटना घडतील. दुपारनंतर शारीरिक व मानसिक प्रसन्नता प्राप्त करू शकता. आणखी वाचा

मकर
आजचा दिवस व्यापार धंद्यासाठी लाभदायक आहे. पत्नी आणि पुत्र यांच्याकडून फायदा होईल. पारिवारिक जीवनात घडणारे सुखदायी प्रसंगामुळे मन आनन्दी राहील. आणखी वाचा

कुंभ
आजचा दिवस लाभदायक आहे. व्यवसाय धंदयात प्राप्ती होईल. मानसम्मान होईल. नोकरी व्यवसायात पदोन्नती. वरिष्ठ आपल्यावर प्रसन्न राहतील. स्वास्थ्य ठीक राहील.  आणखी वाचा

मीन
बौद्धिक विषयात व त्या संबंधी लेखनात आज आपण मग्न रहाल. नवीन कार्याची सुरुवात करू शकता. दूरचे प्रवास व तीर्थयात्रा यांचे योग आहे, मोठया प्रतिष्ठानला भेट द्याल. आणखी वाचा

Web Title: Today's horoscope - 6 June 2020

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.