आजचे राशीभविष्य - 06 जानेवारी 2020
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2020 06:59 AM2020-01-06T06:59:35+5:302020-01-06T07:01:29+5:30
कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...
मेष
स्फूर्ती आणि उत्साहपूर्ण दिवसाची सुरूवात कराल. घरात मित्र आणि सगेसोयरे यांच्या येण्याजाण्याने आनंदाचे वातावरण राहील. आणखी वाचा
वृषभ
आज कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय सांभाळून घ्या. कोणाबरोबर गैरसमज होण्याची शक्यता श्रीगणेशांना दिसते आहे. आणखी वाचा
मिथुन
सामाजिक, आर्थिक तसेच पारिवारिक क्षेत्रात लाभ होण्याचे संकेत श्रीगणेश देतात. समाजात मान व प्रतिष्ठा वाढेल. आणखी वाचा
कर्क
नोकरी व्यवसायात उच्च पदस्थांच्या प्रोत्साहनाने आपला उत्साह द्विगुणित होईल. पगारवाढ किंवा पदोन्नती याची बातमी म्हणजे आश्चर्य वाटायला नको. आणखी वाचा
सिंह
आळस, थकवा आणि ऊबग कामाचा वेग कमी करतील. पोटाच्या तक्रारीमुळे अस्वस्थता अनुभवाल. आणखी वाचा
कन्या
मनावर संयम' हा आजच्या दिवसाचा मंत्र बनवा, असा सल्ला श्रीगणेश देताहेत. स्वभावांतील उग्रता कोणा बरोबर मतभेद करण्याची शक्यता आहे. आणखी वाचा
तूळ
रोजच्या कामाच्या व्यापातून जरा हलके वाटावे म्हणून तुम्ही पार्टी, सिनेमा किंवा पर्यटन याची योजना आखून मित्रांना आमंत्रित कराल. आणखी वाचा
वृश्चिक
श्रीगणेश म्हणतात की पारिवारिक शांतीचे वातावरण तुमच्या तनमनाल स्वस्थ ठेवील. ठरविलेल्या कामात यश मिळेल. आणखी वाचा
धनु
संततीच्या अभ्यास आणि स्वास्थ्य याविषयीच्या चिंतेने मन कष्टी राहील. पोटाच्या तक्रारी सतावतील. कामातील अपयशाने तुम्ही निराश व्हाल. आणखी वाचा
मकर
उत्साह आणि स्फूर्ती यांचा अभाव असल्याने अस्वस्थता वाटेल. मनाला चिंता लागून राहील. कुटुंबातील सदस्या बरोबर पटणार नाही किंवा तक्रार होईल ज्यामुळे मन खिन्न होईल. आणखी वाचा
कुंभ
श्रीगणेश सांगतात की, आज आपण चिंतामुक्त होऊन जरा हायसे वाटेल. उत्साह वाढेल. वाडवडील व मित्र यांच्याकडून फायद्याची अपेक्षा ठेवू शकता. आणखी वाचा
मीन
आर्थिक नियोजन करण्यासाठी आज शुभ दिवस आहे. ठरविलेली कामे पूर्ण होतील. मिळकत वाढेल. कुटुंबात सुख शांतीचे वातावरण असेल. आणखी वाचा