आजचे राशीभविष्य - 8 एप्रिल 2020
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2020 07:02 AM2020-04-08T07:02:46+5:302020-04-08T07:03:31+5:30
कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...
मेष
कुटुंबातील आनंददायी वातावरण पण आपल्या मनाला प्रफुल्लित ठेवण्यात मदत करेल. घरात सुखदायक प्रसंग घडतील. आणखी वाचा
वृषभ
विद्यार्थ्यांसाठी खडतर काळ आहे. मनाला काळजी लागून राहील. पोटाच्या तक्रारीमुळे मन अस्वस्थ राहील. दुपारनंतर या तक्रारीपासून मुक्तता मिळेल. मानसिक दृष्ट्या पण तणाव दूर झाल्याचा अनुभव येईल. आणखी वाचा
मिथुन
आज उत्साहाचा अभाव राहील. कुटुंबातील व्यक्तींशी वादावादी होण्याची शक्यता. स्थावर संपत्ती, संबंधित व्यक्तींपासून सावध राहा. अचानक धन खर्च करावे लागेल. आणखी वाचा
कर्क
आप्तस्वकीयांच्या भेटीने आनंद वाटेल. त्यांच्याशी प्रेमपूर्ण संबंधामुळे आपला आनंद वृद्धिंगत होईल. मनोबल चांगले असल्याने प्रतिस्पर्ध्यासमोर टिकून राहाल. आणखी वाचा
सिंह
घरातील सदस्यांबरोबर वेळ चांगला जाईल. आर्थिक लाभाची शक्यता. दुपारनंतर मात्र सांभाळून राहण्याचा सल्ला. भावंडांकडून लाभ होईल. आणखी वाचा
कन्या
आपल्या वाणीच्या प्रभावाने आज आपणाला लाभ होईल. इतर लोकांशी असणार्या संबंधात प्रेमवृद्धी होईल. प्रवास आनंददायी होईल. व्यावसायिक क्षेत्रातही लाभ होईल. आणखी वाचा
तूळ
बोलण्यावर संयम ठेवल्यामुळे वातावरण शांत करण्यात सफल व्हाल. कायद्याशी संबंधित बाबी आणि निर्णय विचारपूर्वक ठरवा. गैरसमज दूर करा. खर्चाचे प्रमाण वाढेल. आणखी वाचा
वृश्चिक
उत्पन्न आणि व्यापारात वाढ होण्याचे योग आहेत. मित्रांसमवेत प्रवासाला, फिरायला जाल. तेथे आपला वेळ आनंदात जाईल. आणखी वाचा
धनु
व्यवसायिक यश प्राप्ती होईल. कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल राहील. श्रमाच्या अपेक्षानुरूप वरचे पद मिळेल. कुटुंबात आनंद उल्हासाचे वातावरण असेल. आणखी वाचा
मकर
धार्मिक यात्रेमुळे आज धर्मप्रवणतेचा अनुभव येईल. कुटुंबीयांमध्ये आनंद उत्हासाचे वातावरण राहील. व्यावसायिक क्षेत्रात पदोन्नती मिळेल. आणखी वाचा
कुंभ
आरोग्य संवर्धनाच्या हेतूने खाण्यापिण्याकडे लक्ष द्या. वाणीवर संयम ठेवलात तरच कोणाशी उग्र चर्चा अथवा मतभेद टाळू शकाल. दुपारनंतर प्रसन्नता वाढेल तब्बेतीतही सुधारणा जाणवेल. आणखी वाचा
मीन
व्यापारात भागीदारीमध्ये आपणाला लाभ होईल. एखादया मनोरंजक स्थळी स्नेह्यांसोबत आनंदात वेळ घालवल्याने मन प्रफुल्लित होईल. आणखी वाचा