राशीभविष्य - ८ डिसेंबर २०२० - वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ मिळेल, आनंदाचे वातावरण राहील
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2020 09:33 PM2020-12-07T21:33:28+5:302020-12-07T21:34:09+5:30
कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...
मेष
स्वभावातील तापटपणा आणि हट्टीपणावर संयम ठेवण्याचा सल्ला. शारीरिक आणि मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. खूप परिश्रमानंतर कमी यश प्राप्त झाल्याने नैराश्य येईल. संततीविषयक काळजी निर्माण होईल. आणखी वाचा
वृषभ
आज प्रत्येक काम दृढ़ आत्मविश्वास आणि खंबीर मनोबलासह कराल आणि त्यात यश मिळेल. वडिलांकडून व वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ मिळेल. सरकारकडून किंवा सरकारी कामातून आर्थिक लाभ होईल. विद्यार्थी अभ्यासात चमकतील. आणखी वाचा
मिथुन
नवीन योजना अमलात आणण्यासाठी दिवस शुभ असल्याचा संकेत श्रीगणेश देतात. नोकरदारांना वरिष्ठ अधिकार्याकडून किंवा सरकारकडून परिश्रमाचा यथोचित मोबदला मिळेल. आणखी वाचा
कर्क
गैरसमज आणि नकारात्मक व्यवहार आपल्या मनात ग्लानी निर्माण करतील. तब्बेतीचा विशेषतः डोळ्यांचा त्रास होईल. कुटुंबातील सदस्यांशी मतभेद होतील. कामासंबंधी समाधानाची भावना निर्माण होईल. धन खर्च होईल. आणखी वाचा
सिंह
आज कोणत्याही कामासंबंधी आत्मविश्वासाने त्वरित निर्णय घेऊ शकाल. वडील आणि वडीलधार्यांचा सहवास लाभेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. स्वभावात संताप आणि वागण्यात तापटपणा राहील. आणखी वाचा
कन्या
आपल्या अहंपणामुळे आज भांडण होण्याची शक्यता आहे. शारीरिक आणि मानसिक चिंतेत दिवस जाईल. स्वभावातील उतावळेपणामुळे काम बिघडण्याची शक्यता आहे. कुटुंबीय आणि मित्रांशी पटणार नाही. अचानक पैसा खर्च होईल. आणखी वाचा
तूळ
क्रोधावर नियंत्रण ठेवा. शक्यतो वाद टाळावेत. घरातील व्यक्तींशी एखाद्या विषयावर वादविवाद होतील. तब्बेत बिघडेल. विशेषतः डोळ्यांची निगा राखा. आणखी वाचा
वृश्चिक
गृहस्थी जीवनाची सार्थकता आज आपल्या लक्षात येईल. घरात आनंदाचे वातावरण राहील. प्रत्येक काम विनासायास पार पडेल. व्यापार्याना व्यापारात चांगल्या संधी प्राप्त होतील. उत्पन्न वाढेल. नोकरी धंद्यात प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. आणखी वाचा
धनु
आज आपणाला तब्बेतीकडे लक्ष द्यायला सांगतात. कामात उत्साह आणि आवेशाचा अभाव राहील. मन चिंतायुक्त राहील. संततीची समस्या हे त्याचे कारण असू शकते. नोकरी व्यवसायात त्रास होईल. आणखी वाचा
मकर
नकारात्मक विचार प्रभावी होऊ न देण्याचा सल्ला. भागीदारां बरोबर संबंध बिघडतील. अचानक प्रवास करावा लागेल. त्यावर खर्च करावा लागला. नवे संबंध प्रस्थापित करणे हितकर ठरणार नाही. संतापावर काबू ठेवल्यामुळे अनेक संकटांपासून वाचाल. आणखी वाचा
कुंभ
आजचा दिवस प्रसन्नतेमध्ये जाईल. आपला आत्मविश्वास वाढेल. त्यामुळे कामात यश मिळणे सहज बनेल. स्वभावातील मौजवृत्ती मनाला स्फूर्ती देईल. भिन्न लिंगीय व्यक्तींशी परिचय होईल व प्रणय, रोमान्स होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा
मीन
मनाचा खंबीरपणा आणि आत्मविश्वास आपले काम यशस्वी करील. कुटुंबात सुख- शांती, आनंदाचे वातावरण राहील. राग आणि बोलण्याची उद्धट पद्धत यांवर संयम ठेवा. नोकरीत वर्चस्व राहील. प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल. आणखी वाचा