राशीभविष्य - ९ डिसेंबर २०२० - वृश्चिकसाठी लाभाचा अन् तूळसाठी चिंतेचा दिवस

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2020 09:12 PM2020-12-08T21:12:43+5:302020-12-08T21:13:25+5:30

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

Today's horoscope - 9 December 2020 | राशीभविष्य - ९ डिसेंबर २०२० - वृश्चिकसाठी लाभाचा अन् तूळसाठी चिंतेचा दिवस

राशीभविष्य - ९ डिसेंबर २०२० - वृश्चिकसाठी लाभाचा अन् तूळसाठी चिंतेचा दिवस

Next

मेष
आजचा दिवस परोपकार आणि सद्भावना यातच जाईल. सेवा- पुण्य यांची कामे हातून घडतील. मनाने खूप कामे ठरवलेली असतील.  आणखी वाचा

वृषभ
आज तुम्हाला विदविवादात मोठे यश मिळेल. आपले बोलणे कोणाला मोहून टाकेल. तेच आपल्याला फायदायाचे ठरेल. त्यामुळे नवीन संबंधात सद्भाव वाढेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात गोडी वाढेल. आणखी वाचा

मिथुन
भावना आणि संवेदनशीलता यांच्या आहारी जाऊन स्त्रीवर्गाशी संबंध न ठेवण्याचे श्रीगणेश सांगत आहेत. पाणी किंवा प्रवाही पदार्थापासून घात होऊ शकतो, म्हणून त्यापासून दूर राहा. काही आजारामुळे मन द्विधा बनेल व एखादा निर्णय घेण्यात बाधा येईल. आणखी वाचा

कर्क
आजचा दिवस प्रफुल्लतेने भरलेला असेल. नवीन कार्याची सुरूवातही आज करू शकता. मित्र- स्नेही भेटल्याने आनंद होईल. कामात मिळालेल्या यशामुळे आपला उत्साह वाढेल. प्रतिस्पर्ध्यावर मात कराल.  आणखी वाचा

सिंह
आजचा दिवस आपल्याला मिश्र फल देणारा आहे असे श्रीगणेश सांगतात. कुटुंबियांसोबत चांगला वेळ घालवाल. त्यांचे चांगले सहकार्य देखील मिळेल. आर्थिक क्षेत्रात मिळकतीपेक्षा खर्च अधिक होईल.  आणखी वाचा

कन्या
आपण वाकचातुर्याने चांगले संबंध निर्माण कराल की जे भविष्यात उपयोगी व फायदयाचे ठरतील. वैचारिक समृद्धी वाढेल. शरीर, स्वास्थ्य आणि मन प्रसन्न राहील.  आणखी वाचा

तूळ
क्रोधावर नियंत्रण ठेवा. शक्यतो वाद टाळावेत. घरातील व्यक्तींशी एखाद्या विषयावर वादविवाद होतील. तब्बेत बिघडेल. विशेषतः डोळ्यांची निगा राखा. आणखी वाचा

वृश्चिक
आजचा दिवस लाभदायक आहे असे श्रीगणेश सांगतात. आज मित्र भेटतील. आणि त्यांच्यासह हिंडण्या- फिरण्यात व मौजमजा करण्यात पैसा खर्च होईल. नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल.  आणखी वाचा

धनु
कार्य साफल्याचा दिवस आहे. नवे काम सुरू कराल. व्यापारी आपल्या व्यवसायाचे नियोजन आणि विस्तार करू शकतील. मैत्रिणींकडून लाभ होईल. नोकरीत वरिष्ठ अधिकारी आपल्या बढतीचा विचार करतील. आणखी वाचा

मकर
बौद्धिक कार्य आणि व्यवसायात आपण नवी शैली वापराल. साहित्य व लेखन कार्याला गती मिळेल. शारीरिक अस्वास्थ्य व थकवा जाणवेल. संततीची समस्या चिंता वाढवील. दूरचे प्रवास घडतील.  आणखी वाचा

कुंभ
अनेकविध विचारांमुळे मानसिक थकवा जाणवेल असे श्रीगणेश सांगतात. मनातील संताप आवरण्याच्या प्रयत्नात काही अनिष्ट घडणार नाही यांकडे लक्ष द्या. चोरी, अनैतिक काम, निषेधार्ह काम व नकारात्मक विचारांपासून दूर राहण्याचा सल्ला. वाणीवर संयम ठेवा. आणखी वाचा

मीन
व्यवसायात भागीदारी करण्यास शुभ दिवस. दैनंदिन कार्ये व्यवस्थित पार पाडल्याने दिवस आनंदात जाईल. आप्तेष्टांसह पार्टी किंवा सहलीचे बेत आखाल. नाटक, चित्रपट, मनोरंजनाच्या ठिकाणांना भेट देऊन त्यांच्याशी जवळिक निर्माण कराल.  आणखी वाचा

Web Title: Today's horoscope - 9 December 2020

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.