आजचे राशीभविष्य - 09 मे 2020

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2020 07:15 AM2020-05-09T07:15:29+5:302020-05-09T07:15:49+5:30

जाणून घ्या, कसा जाईल तुमचा आजचा दिवस

Todays horoscope 9 May 2020 kkg | आजचे राशीभविष्य - 09 मे 2020

आजचे राशीभविष्य - 09 मे 2020

Next

मेष - श्रीगणेशांच्या सांगण्यानुसार आजचा आपला दिवस आध्यात्मिक दृष्टीने वेगळा अनुभव देणारा ठरेल. गूढ आणि रहस्यमय विद्या आत्मसात करण्यात गोडी वाटेल. आणखी वाचा

वृषभ  - दांपत्यजीवनात विशेष आनंद मिळेल. आपण सहकुटुंब एखाद्या सामाजिक ठिकाणी फिरायला किंवा छोटा प्रवास करायला जाल आणि दिवस आनंदात घालवाल. आणखी वाचा

मिथुन - श्रीगणेश सांगतात की कार्यपूर्ती, यश आणि कीर्ती मिळविण्याच्या दृष्टीने आजचा दिवस शुभ आहे. घरात सुखाचे आणि शांतीचे वातावरण राहील. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य लाभेल. आणखी वाचा

कर्क - अगदी शांत राहून आजचा दिवस घालवा अशी सूचना श्रीगणेश देतात. शारीरिक आणि मानसिक अस्वास्थ्यामुळे बेचैन राहाल. अचानक खर्च उद्भवतील. प्रेमिकांमध्ये वादविवाद होऊन मतभेद होतील. आणखी वाचा

सिंह - श्रीगणेश सांगतात की आज परिवारात मतभिन्नतेचे वातावरण राहील. कुटुंबाशी मतभेदाचे प्रसंग उद्भवतील. आईची तब्बेत बिघडू शकते. मनात नकारात्मक विचार येतील. आणखी वाचा

कन्या- शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. प्रेमपूर्ण संबंधांमुळे अगदी भारावून जाल. भावंडांसमवेत वेळ आनंदात जाईल. त्यांच्याकडून लाभ पण होतील. आणखी वाचा

तूळ- आज द्विधा मनःस्थिती राहील. त्यामुळे कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेऊ नका असे श्रीगणेश सांगतात. नवीन काम सुरू करू नका. वाणीवर संयम ठेवा. आणखी वाचा

वृश्चिक- श्रीगणेश सांगतात की आज कुटुंबात आनंदात दिवस घालवाल. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य राहील. प्रिय व्यक्तींशी भेट सफल आणि आनंददायक ठरेल. एखादी शुभवार्ता मिळेल. आणखी वाचा

धनु- आजचा दिवस कष्टप्रद जाईल. कुटुंबातील सदस्यांशी मतभेद होतील. स्वभावात क्रोध आणि आवेश राहील. त्यामुळे कोणाशी तीव्र स्वरुपाचे भांडण होईल. आणखी वाचा

मकर - श्रीगणेश म्हणतात की आजच्या लाभप्राद दिनी एखाद्या शुभ प्रसंगाचा बेत आखाल. एखाद्या वस्तूची खरेदी करण्यास दिवस शुभ आहे. शेअर- सट्टा या मध्ये धन लाभ होईल. आणखी वाचा

कुंभ - श्रीगणेशाच्या आशीर्वादा बरोबरच वरिष्ठ अधिकारी आणि वयोवृद्धांची आपणावर कृपादृष्टी राहील. आपली सर्वकामे अगदी सरळपणे पूर्ण होत असल्याचा अनुभव येईल. आणखी वाचा

मीन - श्रीगणेश सांगतात की आज शरीर आणि मन बेचैन राहील. संतती विषयक समस्या काळजीत टाकील. नोकरीत उच्च पदाधिकार्‍यांशी वादविवाद होतील आणि त्यांची नाराजी ओढवून घ्याल. आणखी वाचा

Web Title: Todays horoscope 9 May 2020 kkg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.