आजचे राशीभविष्य - 30 नोव्हेंबर 2021; आर्थिक लाभ आणि भाग्यवृद्धी होऊ शकते, मान सन्मान वाढेल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2021 07:18 AM2021-11-30T07:18:21+5:302021-11-30T07:36:38+5:30

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Today's horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya Tuesday 30 November 2021 | आजचे राशीभविष्य - 30 नोव्हेंबर 2021; आर्थिक लाभ आणि भाग्यवृद्धी होऊ शकते, मान सन्मान वाढेल

आजचे राशीभविष्य - 30 नोव्हेंबर 2021; आर्थिक लाभ आणि भाग्यवृद्धी होऊ शकते, मान सन्मान वाढेल

Next


मेष - दूरगामी आर्थिक योजनेसाठी अनुकूल दिवस आहे. श्रीगणेश सांगतात की आर्थिक आणि व्यावसायिक दृष्ट्या फायदेशीर दिवस आहे. शारीरिक आणि मानसिक उत्साह आज अनुभवाल. मित्र- स्वकीयांकडून भेटवस्तू मिळतील. त्यांच्याबरोबर आनंदात वेळ जाईल. तसेच त्यांच्याबरोबर एखादा समारंभ किंवा सहलीस जाण्याचा योग आहे. आणखी वाचा

वृषभ - आज आपल्या बोलण्याच्या जादूने कोणी प्रभावीत होऊन तुम्हाला फायदा देईल तसेच मधुर व सौम्य भाषणाने नवे संबंध प्रस्थापित व्हायला मदत होईल. शुभकार्य करण्याची प्रेरणा मिळेल. वाचन- लेखन या सारख्या साहित्य प्रकारात अभिरुची वाढेल. विद्यार्थी अभ्यासात चांगली प्रगती दाखवतील. प्रिय व्यक्तीशी भेट होऊ शकते. पोटाच्या तक्रारीने त्रस्त राहाल. आणखी वाचा

मिथुन - द्विधा अवस्थेतील आपले मन महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ शकणार नाही. वैचारिक वादळामुळे मानसिक अस्वस्थता अनुभवाल. अधिकतम हळवेपणा तुमच्या दृढतेला कमजोर करेल. कुटुंब किंवा जमीन या संबंधी विषयावर चर्चा किंवा प्रवास टाळा असा श्रीगणेशांचा सल्ला आहे. आणखी वाचा

कर्क - शारीरिक आणि मानसिक उत्साहा बरोबर घरातील वातावरणही आनंदी असेल. मित्र- स्नेहीजन यांच्या भेटी होतील. मित्रांकडून लाभ होईल. शुभ कार्याची सुरूवात करायला आजचा दिवस अनुकूल असल्याचे श्रीगणेश सांगतात. कामातील यश व प्रियव्यक्तीचा सहवास यामुळे आपण आनंदी राहाल. आर्थिक लाभ आणि भाग्यवृद्धी होऊ शकते. आणखी वाचा 

सिंह - कुटुंबियासमवेत सुख शांती मध्ये दिवस घालवाल. त्यांचे सहकार्य मिळेल. स्त्रीमित्रांकडून विशेष मदत प्राप्त होईल. दूरचे मित्र आणि स्नेही यांच्याशी संपर्क फायदेशीर ठरेल. आपल्या प्रभावी संभाषणाने लोकांचे लक्ष वेधून घ्याल. मिळकतीपेक्षा खर्च जास्त होईल. उत्कृष्ट भोजन मिळेल. आणखी वाचा

कन्या - श्रीगणेश सांगतात की आजच्या लाभदायक दिवसाने वैचारिक समृद्धी वाढेल. वाकचातुर्य आणि मधुरवाणी यांच्या साह्याने मैत्रीपूर्ण संबंध विकसीत करू शकाल. उत्तम भोजन, भेटवस्तू, वस्त्र इ. प्राप्ती होईल. शारीरिक तसेच मानसिक स्वास्थ्य टिकून राहील. आणखी वाचा

तूळ - आज थोडा सुद्धा असंयम व अनैतिक व्यवहार तुम्हाला अडचणीत आणेल. दुर्घटनेपासून सावध राहा. बोलण्यातील शिथीलता उग्र तक्रार वाढवण्याची शक्यता आहे. कामेच्छा प्रबळ राहील. शारीरिक व मानसिक व्यग्रता कमी करण्यासाठी अध्यात्मिकतेचा उपयोग होईल.आणखी वाचा

वृश्चिक - नोकरी धंद्यात व व्यवसायात लाभप्राप्ती होईल. मित्रांबरोबर गाठीभेटी, प्रवास ठरवाल. विवाहोत्सुक तरूण तरूणींसाठी चांगली संधी आहे. पुत्र किंवा पत्नीकडून लाभ होईल. स्नेही मित्र यांच्याकडून भेटवस्तू मिळतील. उच्चपदस्थांची कृपादृष्टी राहील. सांसारीक जीवनात आनंद उपभोगाल असे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा

धनु - शुभफलदायक दिवस राहील असे श्रीगणेश सांगतात. गृहस्थी जीवनात आनंदाची छटा पसरेल. प्रत्येक कार्यात यश मिळेल. वरिष्ठांची आपणावर मर्जी राहील. व्यावसायिक क्षेत्रात प्रवास होईल. कामाचा व्याप वाढेल. आर्थिक योजना चांगल्या प्रकारे करू शकाल. आणखी वाचा

मकर - अनुकूलता प्रतिकूलता असा संमिश्र फलदायक दिवस राहील. बौद्धिक कार्य आणि व्यावसायिक क्षेत्रात आपण नव्या विचारांनी प्रभावित व्हाल. सृजनात्मक क्षेत्रात नवीन रचना क्षमतेचा परिचय करून द्याल. तरीही मानसिक स्वास्थ्य मिळणार नाही. संततीविषयक प्रश्न आपणाला दुःख देतील. सरकारी आपत्ती येऊ शकते. आणखी वाचा

कुंभ - अनैतिक कृत्यांपासून दूर राहण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. वाणीवर संयम ठेवा. त्यामुळे पारिवारिक संघर्ष टाळू शकाल. प्रत्येक घटना व्यक्ती आणि वस्तू याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पहाल. खर्च वाढल्याने धन संकट येईल. शारीरिक आणि मानसिकदृष्टया अस्वास्थ्य राहील. आणखी वाचा

मीन - दैनंदिन कामातून मोकळीक मिळून बाहेर हिंडण्या- फिरण्याला जाणे आणि मनोरंजनासाठी वेळ काढाल. कुटुंबातील व्यक्ती आणि मित्रांना पण त्यात समाविष्ट करून घ्याल. त्यांनाही त्याचा आनंद वाटेल. आपली प्रतिष्ठा वाढेल. आणखी वाचा

Web Title: Today's horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya Tuesday 30 November 2021

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.