Horoscope : आजचं राशीभविष्य ९ फेब्रुवारी, २०२२, नावलौकिकात भर पडणाऱ्या घटना घडतील, जनसंपर्क वाढेल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2022 07:35 AM2022-02-09T07:35:10+5:302022-02-09T07:35:55+5:30

Today's Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी...

Today's horoscope for February 9, 2022, will add to the notoriety, public relations will increase | Horoscope : आजचं राशीभविष्य ९ फेब्रुवारी, २०२२, नावलौकिकात भर पडणाऱ्या घटना घडतील, जनसंपर्क वाढेल

Horoscope : आजचं राशीभविष्य ९ फेब्रुवारी, २०२२, नावलौकिकात भर पडणाऱ्या घटना घडतील, जनसंपर्क वाढेल

Next

मेष - जमिनीच्या व्यवहारात सावधानता बाळगा. कागदपत्रे सांभाळून ठेवा. आर्थिक व्यवहार जपून करा. ज्येष्ठांचा सल्ला मोलाचा ठरेल. नोकरीत तुमचे वर्चस्व राहील. जीवनसाथीशी किरकोळ वाद होतील. आहाराचे तंत्र सांभाळा. सकारात्मक विचार करा.  

वृषभ - जीवनसाथीची काळजी घ्या. क्रोधावर नियंत्रण ठेवा. अन्यथा तणाव निर्माण होईल. काहींना अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. मात्र थोडी दगदग सहन करावी लागेल. नोकरीमध्ये साधक-बाधक स्थिती राहील. 
 
मिथुन - महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. थोडे तणावाचे वातावरण राहील. आपला हेका सोडणे आवश्यक आहे. क्रोधाला आवर घातला पाहिजे. जीवनसाथी चांगली साथ देईल. काही कारणाने गैरसमज होतील. एखादा अवचित लाभ होईल. समाजजीवनात समंजसपणे वागा.  

कर्क - आर्थिक आवक चांगली राहील. इतरांनी सल्ला दिल्यास तावून सुलाखून निर्णय घ्या. समोरच्या व्यक्तीचा उद्देश काय आहे ते लक्षात घ्या. त्यानुसार निर्णय घ्या. समाजसेवेत पुढाकार घ्याल. जवळच्या लोकांशी संवाद साधल्यामुळे मन मोकळे होईल.   

सिंह - नोकरीत बदल होतील. दगदग होईल. कामाचा ताण वाढेल. मित्र, सहकारी यांचे महत्त्व लक्षात येईल. महत्त्वाचे निरोप येतील. मुलांच्या प्रगतीच्या बातम्या कळतील. त्यांचे सर्वत्र कौतुक होईल. तुमचा नावलौकिक वाढेल.  

कन्या - प्रवासाचे योग येतील मात्र थोडी काळजी घेतली पाहिजे. प्रवासात अनोळखी व्यक्तीपासून सावध राहा. अनावश्यक खर्चाला आवर घातला पाहिजे. आरोग्याची काळजी घ्या. खाण्याचे तंत्र सांभाळा. नोकरीत संयमाने वागणे आवश्यक आहे. सहकारी वर्गाला सांभाळून घ्या.  

तूळ - महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. आरोग्याची काळजी घ्या. प्रवासात अडचणी येतील. शक्यतो प्रवास टाळलेलाच बरा. अकल्पित लाभ होतील. जुनी येणी अनपेक्षितपणे वसूल होतील. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. व्यवसायात विक्री चांगली होईल.  

वृश्चिक - धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल. सोशल मीडियावर फार सक्रीय राहू नका. व्यवसायात नवीन संधी मिळेल. विचार करून निर्णय घ्या. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. भावंडांच्या भेटीगाठी होतील.

धनू - नोकरीमध्ये लाभदायक काळ आहे. अधिकारीवर्गाचे सहकार्य मिळेल. महत्त्वाच्या कामात अडथळा येऊ शकतो. थोडे संयमाने बोलणे आवश्यक आहे. आरोग्याची काळजी घ्या. प्रवास शक्यतो टाळा. जीवनसाथीची साथ राहील. आर्थिक आवक चांगली राहील.  

मकर - भाग्याची चांगली साथ राहील. काहींना प्रवास करावा लागेल. नवीन ओळखी होतील. मौजमजा करण्यासाठी वेळ मिळेल. मुलांच्या मनातील भावना समजून घ्या. त्यांच्याशी संवाद साधा. खर्चाचे प्रमाण नियंत्रणात ठेवा. नोकरीत वादापासून दूर राहा.  

कुंभ - विविध मार्गांनी धनप्राप्ती होईल. सर्वांचे सहकार्य मिळेल. तुमच्या कार्यपद्धतीची प्रशंसा केली जाईल. कामात उत्साह राहील. घरी पाहुणे येतील. थोडी धावपळ करावी लागेल. नोकरीमध्ये दगदग होईल. कामात व्यस्त राहावे लागेल.  

मीन - नावलौकिकात भर पडणाऱ्या घटना घडतील. मित्र, सहकारी यांची भेट होईल. जनसंपर्क वाढेल. प्रवासात काळजी घ्या. भावंडांच्या भेटीगाठी होतील. त्यांच्या सुख-दु:खात सहभागी व्हाल. महत्त्वाचे काम मार्गी लागेल. 

Web Title: Today's horoscope for February 9, 2022, will add to the notoriety, public relations will increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.