आजचे राशीभविष्य - 18 जानेवारी 2021 : भाग्योदयासोबतच अचानक धनलाभ होईल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2021 07:38 AM2021-01-18T07:38:26+5:302021-01-18T08:52:45+5:30
Todays Horoscope 18 January 2021: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
मेष - आज धार्मिक- आध्यात्मिक कल राहील. द्विधा मनामुळे ठोस निर्णय घेऊ शकणार नाही. पैशाची देवाण- घेवाण व आर्थिक व्यवहार न करण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. आणखी वाचा.
वृषभ - व्यापारात वृद्धी होण्याबरोबरच व्यापार विषयक सौदे लाभदायक ठरतील. उत्पन्नाच्या साधनांत वाढ होईल. आणखी वाचा.
मिथुन - शारीरिक व मानसिक सुख मिळेल. नोकरी- व्यवसायात आपल्या श्रमाचे चीज होत आहे असे वाटेल. अधिकारी प्रोत्साहन देतील. आणखी वाचा.
कर्क - श्रीगणेश सांगतात की आज भाग्योदया बरोबरच अचानक धनलाभ होईल. विदेशी जाण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील. आणखी वाचा.
सिंह - आज तब्बेतीकडे लक्ष पुरवावे लागेल. तब्बेतीसाठी खर्च करावा लागेल. निषेधार्ह विचार आपणाला चुकीच्या मार्गावर नेणार नाहीत याची काळजी घ्या. आणखी वाचा.
कन्या - श्रीगणेश कृपेने दांपत्य जीवनात सुखाचे क्षण अनुभवाल. सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रात सन्मान व प्रतिष्ठा लाभेल. मनोरंजनाच्या कार्यक्रमात भाग घ्याल. आणखी वाचा.
तूळ - श्रीगणेशांच्या मते आज सामान्यतः तब्बेत चांगली राहील. आजारी व्यक्तींना पण आराम वाटेल. घरातील सुख शांतीच्या वातावरणात वेळ घालवाल. आणखी वाचा.
वृश्चिक - आज यात्रा प्रवासाचे आयोजन न करण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. तब्बेतीची काळजी राहील. संतती विषयक समस्या निर्माण होतील. आणखी वाचा.
धनु - आज जास्त संवेदनशीलते मुळे घरगुती गोष्टींत मानसिक तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. द्विधा मनःस्थिती मुळे मनात चलबिचल वाढेल. आणखी वाचा.
मकर - आज आपण डावपेचातून शत्रूला पराभूत कराल. नवीन कार्यारंभासाठी तयार राहा. सफलता मिळेल. प्रत्येक काम जीव लावून कराल. आणखी वाचा.
कुंभ - द्विधा मनःस्थिती मुळे कोणताही ठोस निर्णय घेऊ शकणार नाही. महत्वाचे निर्णय घेऊ नका. वाणीवर ताबा न राहिल्याने कुटुंबातील व्यक्तीशी मतभेद होतील. आणखी वाचा.
मीन - आनंद, उत्साह व प्रसन्न तन-मन यामुळे आज चैतन्य आणि स्फूर्तीचा संचार होईल. नवीन कामे हाती घ्याल. त्यात यश मिळेल. धार्मिक- मंगल कार्याला हजेरी लावाल. आणखी वाचा.