आजचे राशीभविष्य - 11 जून 2020; वृश्चिक राशीच्या लोकांनी स्त्रियांपासून जपावे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2020 07:35 AM2020-06-11T07:35:00+5:302020-06-11T07:35:31+5:30

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

Today's horoscope - June 11, 2020; Scorpio people should beware of women | आजचे राशीभविष्य - 11 जून 2020; वृश्चिक राशीच्या लोकांनी स्त्रियांपासून जपावे

आजचे राशीभविष्य - 11 जून 2020; वृश्चिक राशीच्या लोकांनी स्त्रियांपासून जपावे

Next

मेष - श्रीगणेशाच्या कृपेने दिवस शुभ राहील. स्नेही, स्वकीय आणि मित्रांसमवेत सामाजिक कार्यात मग्न राहाल. मित्रांकडून लाभ होतील. आणखी वाचा.

वृषभ - श्रीगणेशाच्या मते आजचा दिवस आपणाला चांगला जाईल. नवीन कामाच्या योजना आखाल. नोकरदार आणि व्यावसायिकांना दिवस चांगला जाईल. आणखी वाचा.

मिथुन - मानसिक दृष्टया आजचा दिवस द्विधा अवस्था आणि कटकटीचा राहील असे श्रीगणेशांना वाटते. शरीराने थकाल आणि आळसामुळे कामात उत्साह वाटणार नाही. आणखी वाचा.

कर्क - श्रीगणेशांच्या मते प्रतिकूल परिस्थितीचा दिवस आहे. वैवाहिक जीवनात वाद होतील. तसेच व्यापारात भागीदारांबरोबर मतभेद होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा.

सिंह - मध्यमफलदायी दिवस. धंदा व्यवसायात मतभेद राहतील. तुमची तब्बेत चांगली राहील पण जोडीदाराच्या प्रकृती अस्वास्थ्या मुळे मनात काळजी राहील. आणखी वाचा.

कन्या - श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस शुभ आहे. घरात सुख शांतीचे वातावरण पसरेल. त्यामुळे मनही प्रसन्न राहील. सुखद प्रसंग घडतील. आणखी वाचा.

तूळ - आजचा दिवस अत्यंत सुखात जाईल. बौद्धिक कामे व चर्चेत दिवस खर्च होईल. आज कल्पनाशक्ती व सृजनशक्तीचा उपयोग आपण करू शकाल. आणखी वाचा.

वृश्चिक - आजचा दिवस शांततेत घालवा असे श्रीगणेश सुचवतात कारण मन चिंतीत राहील व संबंधीतांशी पटणार नाही. आरोग्या विषयी काळजी लागून राहील. आणखी वाचा.

धनु - गूढविद्या आणि अध्यात्मिकता यात तुम्ही आज मग्न राहाल. भावंडांबरोबर चांगले वर्तन राहील. नवीन कार्यारंभ करण्यासाठी चांगली वेळ आहे. आणखी वाचा.

मकर - आज आपण शेअर मार्केट किंवा लॉटरी यात पैसा अडकवाल. अचानक धनलाभ होईल. कुटुंबातील वातावरण वादामुळे बिघडू शकते. आणखी वाचा.

कुंभ - गणेशांच्या सांगण्यानुसार आज तुमचे शरीर आणि मन उत्साही असेल. दिवस लाभदायक आहे. मित्र- कुटुंबियांसमवेत एखाद्या सहलीला जाल. आणखी वाचा.

मीन - श्रीगणेश सांगतात की आज मन अशांत राहील त्यामुळे एकाग्रता कमी असेल. धार्मिक कार्यासाठी पैसा खर्च होईल. पैसा गुंतवणूकीकडे आज जास्त लक्ष द्या. आणखी वाचा.
 

Web Title: Today's horoscope - June 11, 2020; Scorpio people should beware of women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.